१५३ रुपयांत १०० टीव्ही चॅनेल दाखवाः दूरसंचार नियामक प्राधिकरण

नवी दिल्ली : TV वरील आवडीचे चॅनेल निवडण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ‘ट्राय’ ने ग्राहकांना ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ग्राहकांचे हित लक्षात घेवून ट्रायने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रति महिना १५३ रुपयांत १०० चॅनेल दाखवण्याचे थेट निर्देश ट्रायने केबल ऑपरेटर आणि डीटीएच’सेवा देणाऱ्यांना दिले आहेत. तसेच ग्राहकांनी TV वरील १०० चॅनेलची निवड ३१ जानेवारीपर्यंत करण्याच्या सूचना सुद्धा दिल्या आहेत.
पुढील महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे १ फेब्रुवारीपासून सदर नियम अमलात येणार आहे. केबल ऑपरेटर आणि DTH सेवा पुरवठादारांनी ग्राहकांना प्रति महिना १५३.४० रुपयांप्रमाणे १०० चॅनेल दाखवावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यात GSTचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. मात्र या शंभर चॅनेलमध्ये एकाही HD चॅनेलचा समावेश नसणार आहे. २ चॅनेलसोबत १ HD चॅनेल निवडता येवू शकतो, असे काही मीडिया एजन्सीने म्हटले होते. एका चॅनेलसाठी १९ रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजण्याचा आणखी एक निर्णय TRAI ने रद्द ठरवला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं