Bhuvikas Bank | भूविकास बँकेची 348 कोटींची कर्जे माफ | 33,895 शेतकऱ्यांना लाभ - उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई, २० ऑगस्ट | अवसायनात निघालेल्या भूविकास बँकेची सरसकट थकीत शेती कर्जे माफ करण्याचा तसेच कामगारांची देणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचा लाभ ३३ हजार ८९५ शेतकऱ्यांना आणि ३ हजार २९६ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
भूविकास बँकेची 348 कोटींची कर्जे माफ, 33,895 शेतकऱ्यांना लाभ – उपमुख्यमंत्री (348 crore loan waved by Bhuvikas Bank deputy chief minister Ajit Pawar order) :
या संदर्भात मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy chief minister Ajit Pawar) यांनी बैठक घेतली. या बैठकीस सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ तसेच बच्चू कडू, विश्वजित कदम हे राज्यमंत्री हजर होते. बैठकीत पवार यांनी सहकार विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. भरपाईच्या माेबदल्यात राज्य सरकार बँकेच्या सर्व मालमत्ता ताब्यात घेणार आहे. बँकेची मालमत्ता ताब्यात घेऊन देणी देता येणार नाहीत का, अशी राज्य बँकेला विचारणा करण्यात आली होती.
१९३५ मध्ये स्थापन झालेली भूविकास बँक २०१६ मध्ये अवसायनात निघाली होती. तेव्हापासून कर्ज आणि कामगार देणी दोन्ही थकलेली आहेत. कर्मचाऱ्यांनी अनेकदा आंदोलन करत याप्रकरणी तोडगा काढण्याची विनंती केली होती. या बँकेची शेतकऱ्यांकडे ३४८ कोटीची कर्जे थकीत आहेत, तर कर्मचाऱ्यांची २८३ कोटींची देणी बाकी आहेत. यापूर्वी अनेकदा विधिमंडळात भूविकास बँकेबाबत तोडगा काढण्याची चर्चा झाली. सरकारने आश्वासने दिली, मात्र अद्याप तोडगा निघू शकलेला नाही.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: 348 crore loan waved by Bhuvikas Bank deputy chief minister Ajit Pawar order news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं