PMC बॅंकेनंतर लक्ष्मी विलास बँकेवर आरबीआयचे निर्बंध

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेवर कडक कारवाई केली आहे. या बँकेला PCA यादीत टाकण्यात आलं आहे. PCA म्हणजेच प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन. या श्रेणीतल्या बँकांची आर्थिक स्थिती जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत बँक नवं कर्ज देऊ शकत नाही. याआधीही आणखी काही सहकारी बँका PCA मध्ये आल्या आहेत.
लक्ष्मी विलास बँकेच्या संचालकांवर आर्थिक फसवणुकीचे आरोप आहेत.या संचालकांच्या विरुद्ध तक्रारी करण्यात आल्यानंतर पोलिसांनी खटला दाखल केला होता. या बँकेत ७९० कोटी रुपयांची एफडी करण्यात आली होती. त्यामध्ये गैरव्यवहार करण्यात आले आहेत. हा रिपोर्ट शुक्रवारी समोर आला. बँकेच्या संचालकांवर खटला दाखल झाल्यानंतर बँकेचा शेअर घसरला.
खासगी क्षेत्रातील लक्ष्मी विलास बँकेच्या संचालकांविरुद्ध दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करण्यात आल्याच्या दोन दिवसांनंतर लगेचच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आर्थिक अनियमिततेचे कारण देऊन लक्ष्मीविलास बँकेवरही (एलव्हीबी) आर्थिक निर्बंध (पीसीए) घातले आहेत. त्यामुळे आता नव्याने कर्जे देणे, लाभांश जाहीर करणे आणि शाखांचा विस्तार करण्यात लक्ष्मीविलास बँकेला अडचणी येणार आहेत.
पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेवरील रिझव्र्ह बँकेच्या आर्थिक र्निबधानंतर देशातील सहकार क्षेत्रात गुंतवणूकदार, ग्राहक, खातेदारांमध्ये संतापाची भावना असतानाच लक्ष्मी विलास बँकेच्या घडामोडींची भर पडली आहे. लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध घालण्यामागे, कोणत्याही आर्थिक संकटाशी सामना करण्याची कुवत नसणे, मोठ्या प्रमाणातील थकीत कर्जे आणि दोन वर्ष सातत्त्याने ‘अॅसेट क्वालिटी’त झालेली घसरण ही तीन मुख्य कारणं असल्याचं आरबीआयने म्हटलं आहे.
एकीकडे रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक निर्बंध घालण्यात येत असतानाच दुसरीकडे दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने निधीच्या गैरव्यवहारप्रकरणी ‘एलव्हीबी’च्या संचालक मंडळाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेवर ७९० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. वित्तीय क्षेत्रातील कंपनी ‘रेलिगेअर फिनक्वेस्ट’च्या तक्रारीनुसार दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बँकेने आमच्या ७९० कोटी रुपयांच्या मुदतठेवीत गैरव्यवहार केल्याचे ‘रेलिगेअर’ने तक्रारीत नमूद केले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं