कर्नाटकात मतदान झालं, लगेच पेट्रोल-डिझेलचा भडका

नवी दिल्ली : देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा संबंध थेट कर्नाटक विधानसभा निवडणुकीशी जोडला जात आहे. कारण मतदान प्रक्रिया पूर्ण होताच पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचं बोललं जात आहे.
काही दिवस पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर होते. परंतु कर्नाटक निवडणूक पार पडताच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. आज पासून मुंबईत पेट्रोल ८२ रुपये ६५ पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा दर ७० रुपये ४३ पैसे प्रतिलिटर झाला आहे. तर दिल्लीतही पेट्रोल दर ७४ रुपये ८० पैसे प्रतिलिटर, तर डिझेल ६६.१४ रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे.
केंद्र सरकारच्या सांगण्यावरून, पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात बाजारानुसार बदल करण्यास हात आखडते घेतले होते, असे वृत्त निवडणूक प्रचारादरम्यान धडकले होते. मात्र कर्नाटक निवडणूक पार पडताच लगेच दुसऱ्यादिवशी पेट्रोल-डिझेलचे दर देशभर भडकले आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं