कर्मचारी कपातीची कुऱ्हाड आता आयटी क्षेत्रावर; कॉग्निझंट करणार सुरुवात

बेंगळुरू: मंदीची झळ आता आयटी क्षेत्रावर देखील पडली आहे. कॉस्ट कटिंगची कारणं पुढे रेटून आता आयटी कंपन्यांनी देखील कर्मचारी कपातीचा मार्ग अवलंबला आहे. विशेष म्हणजे भारतात मोठा रोजगार हा आयटी क्षेत्रातील असून यामध्ये उच्च शिक्षित तरुणांचा मोठा वाटा असून केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरात स्थायिक झालेले भारतीय लोकं आयटी क्षेत्रात नोकरीला आहे.
मंदीची झळ विशेषकरून बांधकाम, टेक्सटाईल्स, ऑटो आणि इतर क्षेत्रांना अधिक जाणवत होती. मात्र त्यात आता आयटी क्षेत्राने डोकं वर काढल्याने उच्च शिक्षित तरुणांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. काही दिवसांपूर्वी इन्फोसिस’सारख्या बलाढ्य कंपनीत देखील गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर शेअरचे भाव गडगडून कंपनीचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे आयटी क्षेत्रात देखील आर्थिक चणचण जाणवणार याची चुणूक लागली होती.
दरम्यान, अमेरिकन आयटी कंपनी कॉग्निझंट आगामी काही महिन्यांत कॉस्ट कटिंगच्या नावाखाली ७,००० मध्यम आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार आहे. याशिवाय कंपनी कंटेट मॉडरेशन बिझनेसमधून बाहेर पडण्याचा विचारही करत आहे. कंपनीनं बुधवारी तशी अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. आगामी काही महिन्यांत जगभरातून १२,००० मध्यम आणि वरिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतल्याचंही कंपनीनं सांगितलं.
कॉग्निझंटचे नवे सीईओ ब्रायन हम्फ्रिज यांनी मागील काही दिवसांत कंपनीला नफा मिळवून देण्यासाठी पुनर्गठणची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी कॉस्ट कटिंगचा मार्ग स्वीकारला होता. या कंपनीत जवळपास २.९ लाख कर्मचारी काम करतात. त्यात तब्बल २ लाख कर्मचारी हे भारतीय आहेत. ३० सप्टेंबर २०१९ रोजी कंपनीत कर्मचाऱ्यांची एकूण संख्या २, ८९, ९९० होती. तर ३० जून २०१९ रोजी कंपनीत एकूण २, ८८, २०० कर्मचारी होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं