अनिल अंबानींचा रिलायन्स नेवल अॅन्ड इंजिनियरिंग लिमिटेडच्या संचालक पदाचा राजीनामा

मुंबई : कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार अनिल अंबानी यांना रिलायन्स नेवल अॅन्ड इंजिनियरिंग लिमिटेडच्या संचालक पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. अनिल अंबानी यांच्या कंपनीकडून तशी अधिकृत माहिती शेयर मार्केटला दिली आहे.
कंपनी कायद्यातील कंपनी अॅक्ट २०१३ च्या कलम १६५ च्या तरतुदींनुसार अनिल अंबानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. कंपनी कायद्यातील या तरतुदीनुसार एकाच वेळी एकापेक्षा जास्त कंपन्यांमध्ये कंपनीचे संचालक म्हणून कोणीही राहू शकत नाही. रिलायन्स नेवल या कंपनीकडे युद्धनौका आणि करार तयार करण्यासाठी परवाना असून ती देशातील सर्वात मोठी शिपिंग कंपनी आहे.
याआधी अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहाने नॅशनल हेराल्डविरूद्ध ५,००० कोटी रूपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. नॅशनल हेराल्डमध्ये छापण्यात आलेल्या एका लेखामुळे कंपनीने हा खटला दाखल केला होता. त्यानंतर महत्वाच्या राफेल लढाऊ विमानाच्या करारात गैरव्यवहार झाला असल्याचे म्हटले होते. नॅशनल हेराल्डने लिहिलेल्या एका बातमीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल कराराची घोषणा करण्याच्या केवळ अवघ्या दहा दिवस आधी अनिल अंबानींनी रिलायन्स डिफेन्सची सुरूवात केली असल्याचे त्या लेखात म्हटले होते.
Anil D Ambani resigned as the Director of Reliance Naval and Engineering Ltd (RNAVAL)
Read @ANI story | https://t.co/3AItW7y78I pic.twitter.com/Q8nmwbYjmA
— ANI Digital (@ani_digital) August 25, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं