अनिल अंबानींच्या या दोन कंपन्यांच्या खात्यात १९.३४ कोटीच शिल्लक, विरोधकांचा दावा खरा ठरतो आहे?

नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी हे सध्या देशभर राफेल घोटाळ्यातील आरोपांमुळे चर्चेत आले असताना, विरोधकांनी सुद्धा त्यांच्या कंपन्या प्रचंड कर्जात असल्यामुळे मोदी त्यांना मदत करत असल्याचे आरोप केले होते. त्या आरोपांना अप्रत्यक्षरित्या दुजोरा मिळत आहे. कारण रिलायन्स टेलिकॉम आणि यूनिट रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड या दोन्ही कंपन्यांच्या एकूण १४४ बँक खात्यात आता १९.३४ कोटी रुपये इतकी रक्कमच शिल्लक असल्याची माहितीसमोर येत आहे. कारण एका खटल्याप्रकरणी नवी दिल्ली हायकोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे.
कारण बोस्टनच्या अमेरिकन टॉवर कॉर्पने अनिल अंबानी यांच्या आरकॉमवर तब्बल २३० कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. संबंधित दाखल याचिकेवर उत्तर देताना अनिल अंबानी समूहाच्या रिलायन्सने दिल्ली हायकोर्टात स्वतः ही माहिती दिली आहे. दरम्यान, अनिल अंबानींच्या या कंपनीवर एकूण ४६ हजार कोटींचं कर्ज आहे. त्यामुळेच आरकॉमने मागीलवर्षी त्यांचा वायरलेस बिझनेस पूर्ण बंद केला. तसेच सातत्याने नुकसान होत असल्यामुळे त्यांना हा व्यवसाय विचाराअंती अखेर बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यामुळेच आरकॉमला याच वर्षी बँकरप्टसी प्रोसिडिंग्जमध्ये खेचण्यात येत होते.
विशेष म्हणजे त्यातून ही कंपनी थोडक्यात बचावली होती. रिलायन्सने त्यांच्या एकूण ११९ बँक खात्यात केवळ १७.८६ कोटी रुपये शिल्लक असल्याचं आणि आरटीएल कंपनीने त्यांच्या २५ बँक खात्यात एकूण १.४८ कोटी रुपये शिल्लक असल्याचं दिल्ली हायकोर्टासमोर प्रतिज्ञापत्र ठेवलं आहे. परंतु, ते प्रतिज्ञापत्र सादर करताना या दोन्ही कंपन्यांनी बँक स्टेटमेंट्स देण्यासाठी कोर्टाकडून अधिक वेळ मागितला होता. दरम्यान, या प्रकरणावर आता आता पुढील सुनावणी येत्या १३ डिसेंबर रोजी होणार आहे असे वृत्त आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं