बेस्ट संपात सामील झालेल्या कामगारांचा पगार कापला

मुंबई : पगारवाढ तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेलेल्या बेस्ट कामगारांच्या जानेवारी महिन्याच्या पगारात वाढ झाली. परंतु, दुसऱ्या बाजूला बेस्ट प्रशासनाने कामगारांचा संपकाळातील ९ दिवसांचा पगार कापला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे कामगारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
दरम्यान, बेस्ट कामगारांना आज जानेवारी महिन्याच्या वेतनाची रीतसर स्लिप मिळाली. त्यात पगारवाढ झाल्याचे दिसून आल्यामुळे कर्मचारी देखील सुखावला. परंतु, त्याचवेळी दुसऱ्याबाजूने संपकाळातील पगार एकूण पगातून वजा केल्याने कर्मचार्यांचा राग अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. बेस्ट कामगारांच्या पगारात सरासरी ३ ते ४ हजार रुपयांची एकूण वाढ झाली आहे. परंतु, जानेवारी महिन्याचा पगार हा अवघ्या २२ दिवसांचा आला आहे. संपकरी कामगारांच्या सुट्ट्या मंजूर करण्यात येऊ नयेत. त्यांचे वेतन कापण्यात यावे, अशी सूचना बेस्टच्या अधिकार्यांनी संबंधितांना केली होती. त्यानुसारच हे वेतन कापण्यात आले आहे, असे बोलले जात आहे. संपकाळातील सुट्टी मंजूर केली असती तर प्रशासनाविरुद्धचा कामगारांचा आक्रोश कमी झाला असता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं