इंधनाचे दर, महागाई, बेरोजगारीवर भाष्य न करणारे पंतप्रधान म्हणाले, केंद्र सरकारच्या कामाबद्दल लोकांना सांगा

नवी दिल्ली, २० जुलै | संसदेच्या पावसाळी अधिवेशनचा आज दुसरा दिवस आहे. हेरगिरी प्रकरणातील विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभा 2 वाजेपर्यंत तर राज्यसभेचा कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाची बैठक झाली.
दरम्यान, बैठकीत पंतप्रधान मोदी आपल्या पक्षातील नेत्यांना सांगितले की, सत्याला वारंवार जनतेपर्यंत पोहोचवा, सरकारच्या कामाबद्दल लोकांना सांगा. काँग्रेस पक्ष सर्वत्र संपत चाललेला असून त्यांना आपल्यापेक्षा भारतीय जनता पक्षाची जास्त चिंता असल्याचा टोला मोदी यांनी यावेळी लगावला.
मोदी पुढे म्हणाले की, कोरोना आपल्यासाठी राजकारणाचा नसून तो मानवतेचा विषय आहे. यापूर्वीच्या महामारीत लोक महामारीने कमी आणि भूकेने जास्त मरायचे. परंतु, आपल्या सरकारने तसे होऊ दिले नाही असे मोदी यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, लसीकरण केंद्रावर जाऊन लोकांना पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ ऐकवा. पंतप्रधान गरीब कल्याण योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊन पोहोचवा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी नड्डा यांनी आपल्या पक्षातील खासदारांना धार्मिक नेत्यांची भेट घेण्यास सांगितले आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: BJP Parliamentary committee meeting at New Delhi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं