‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ धोरणामुळे अनेक भारतीयांना अमेरिका सोडावी लागेल?

नवी दिल्ली : अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ या धोरणानुसार नव्या प्रस्तावावर विचार सुरू केलेला. त्यामुळे अमेरिकेतील भारतीय नोकरदारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. या धोरणामुळे अनेक भारतीयांवर अमेरिका सोडण्याची वेळ येऊ शकते.
ट्रम्प प्रशासनाच्या या धोरणानुसार व्हिसाच्या मुदतीचा कालावधी संपल्यानंतर मुदतवाढ किंवा नूतनीकरणासाठी केलेला अर्ज प्रशासनाकडून फेटाळला गेला तर अमेरिकास्थित त्या भारतीयांवर अमेरिका सोडण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे जर आता ‘एच -१ बी’ व्हिसाचा नूतनीकरण अर्ज फेटाळल्यास थेट भारतात रवानगी होणार आहे. त्यामुळे अमेरिकास्थित भारतीयांमध्ये चिंतेच वातावरण आहे.
ट्रम्प प्रशासनाच ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ हे धोरण २८ जूनपासून लागू झालं असून त्यासंबंधित सूचना गेल्याच आठवड्यात अमेरिकन सरकारच्या वेबसाईटवर पोस्ट करण्यात आली आहे. त्यानुसार व्हिसाच्या मुदतीचा कालावधी संपल्यानंतर मुदतवाढ किंवा नूतनीकरण तसेच ‘चेंज ऑफ स्टेटस’साठी केलेला अर्ज जर फेटाळला गेला, तर त्या भारतीय व्यक्तीवर अमेरिकेतून हद्दपार करण्याची कारवाई केली जाऊ शकते. यात आणखी भर म्हणून एनटीए म्हणजे ‘नोटीस टू अपिअर’ बजावल्यानंतर कोर्टापुढे हजेरी न लावल्यास अमेरिकेत पुनर्प्रवेशासाठी ५ वर्षांची बंदी लागू केली जाऊ शकते.
अमेरिकेतील व्हिसाधारक भारतीय २०१७
१. २५ ते ३४ वयोगटातील ६६.२ टक्के
२. नोकरीबरोबरच पदवी घेणारे ४५.२ टक्के
३. एम.एस. बरोबरच नोकरी करणारे ४४.५ टक्के
४. डॉक्टरेट करणारे नागरिक ६.८ टक्के
५. संगणकक्षेत्राशी निगडित ६९.८ टक्के
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं