सीबीआय'ची चंदा कोचर यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस, देश सोडून जाण्यास मनाई

नवी दिल्ली : व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणात दोषी आढळलेल्या चंदा कोचर यांच्याविरोधात CBIने लूकआऊट नोटीस जारी केली आहे. चंदा कोचर यांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. सीबीआयने सर्व विमातळांवरील इमिग्रेशन विभागाला चंदा कोचर यांनी देश सोडून जाण्याचा प्रयत्न केल्यास तशी माहिती आम्हाला दिली जावी असं सांगितलं आहे.
दरम्यान, कार्यकाळात पदांचा गैरवापर करत मर्जीतल्या लोकांचा आर्थिक फायदा केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) चंदा कोचर, वेणूगोपाल धूत यांच्यासह इतर ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चंदा कोचर यांच्या सोबत त्यांचे पती, त्यांच्या सहकारी व्हिडीओकॉन कंपनीचे २ युनीट आणि कोचर यांच्या न्यूपॉवर रेनेवेबल्स तसेच सुप्रीम ऊनर्जी या कंपन्यांचाही यामध्ये समावेश आहे.
२००९ मध्ये चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेचा व्यवस्थापकीय संचालक पदावर असताना नियम डावलून तसेच पदाचा गैरवापर करत वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉन उद्योगसमूहाला ३०० कोटींचे कर्ज दिले होते. ज्यानंतर धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या व्यवसायात ६४ कोटी रुपयांचे भांडवल गुंतवले. त्यानंतर २००९ ते २०११ या काळात चंदा कोचर यांनी वेगवेगळी कारणे दाखवत १५७५ कोटी रु.चे कर्ज दिले होते. कर्ज घेताच व्हिडीओकॉन उद्योग समुहाने ३० जून २०१७ ला कंपनीचे दिवाळे निघाल्याचे जाहीर केले. सीबीआयने याप्रकरणी चंदा कोचर, वेणूगोपाल धूत यांच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं