शेअर बाजारात तेजी; गुंतवणूकदारांना २.७३ लाख कोटींचा नफा

मुंबई: शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी मंगळवारी अक्षरश: दिवाळी साजरी केली. सोमवारच्या सुटीनंतर मंगळवारी उघडलेल्या बाजारात गुंतवणूकदारांनी सुरुवातीपासून समभागखरेदीचा सपाटा लावल्याने सेन्सेक्स उसळत गेला. दिवसभरात ५८१ अंकांनी वधारलेल्या सेन्सेक्सने दिवसअखेरीस ३९८३१चा स्तर गाठला. तर, १५९ अंकांची वाढ साधलेला निफ्टी ११७८६वर स्थिरावला. सेन्सेक्सच्या या दमदार कामगिरीमुळे गुंतवणूकदारांच्या बाजार भांडवलात तब्बल २.७३ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
अमेरिका-चीन दरम्यान व्यापार वाटाघाटी सुरू होण्याची सकारात्मक आणि देशांतर्गत बँका आणि कंपन्यांची लक्षणीय सुधारणा दर्शविणारी तिमाही कामगिरी बाजारातील खरेदीचा उत्साह दुणावणारी ठरली. तिमाही तोटय़ात मोठय़ा कपातीसह विक्री कामगिरीत चांगली सुधारणा दर्शविणाऱ्या टाटा मोटर्सच्या समभाग मूल्यात सलग दुसऱ्या व्यवहारात १७ टक्क्यांची मुसंडी गुंतवणूकदारांनी मंगळवारी अनुभवली. मागील काही महिन्यांत मोठी मूल्य-हालचाल दर्शविणाऱ्या टाटा स्टील, येस बँक, अॅक्सिस बँक, मारुती सुझुकी, टेक महिंद्र आणि टीसीएस या समभागांना खरेदीचे पाठबळ मिळाल्याने, त्या समभागांमध्ये ७ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीजचा भावही २.३० टक्क्यांनी वधारला. त्या उलट भारती एअरटेल, कोटक बँक, पॉवरग्रिड आणि स्टेट बँक या समभागांना नफावसुलीचा फटका बसला.
सकाळी ९.१४ वाजता शेअर मार्केट हिरव्या निशाणावर होता. त्यावेळी सेन्सेक्समध्ये २२३.७९ अंक म्हणजेच ०.५६ टक्के वाढ झाली होती, त्यामुळे सेन्सेक्स ४००५५.६३च्या स्तरावर पोहोचला होता. तर निफ्टीतही ९७.०५ अंक म्हणजेच ०.८२ टक्के वाढीसह ११८८३.९० स्तरावर पोहोचला आहे. मंगळवारी सेन्सेक्स ५८२ अंकांनी मजबूत होऊन बंद झाला होता. बाजारात चहूबाजूंनी खरेदीचा उत्साह होता. वाहन कंपन्यांचे शेअर्सही निफ्टीत हिरव्या निशाणावर बंद झाले होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं