संरक्षण संस्थांमधील तब्बल ४ लाख कर्मचारी सरकार विरोधात तीव्र आंदोलनाच्या तयारीत?

नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या विविध संस्थांमधील तब्बल चार लाख कर्मचारी पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारीत तीन दिवसीय आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. भारतीय लष्कर, हवाई दल, वर्कशॉप, नवल डॉक्स तसेच ४१ दारुगोळा फॅक्टरी इथं काम करणारे कर्मचारी २३ ते २५ जानेवारी दरम्यान आंदोलन पुकारणार आहेत. संरक्षण क्षेत्रातील मोदी सरकारच्या धोरणांविरोधात हे आंदोलन पुकारण्यात येणार आहे.
ऑल इंडिया डिफेंस एम्पॉईज फेडरेशनचे (AIDEF) जनरल सेक्रेटरी सी. श्रीकुमार यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, आज कर्मचाऱ्यांनी केवळ जेवण सोडलं. परंतु, मोदी सरकारने जर आमचे म्हणणे ऐकून न घेतल्यास जानेवारी महिन्यांत आम्ही सर्व संघटना मिळून मोठा मेळावा घेऊ असं म्हटलं आहे. दरम्यान, डायरेक्टर जनरल ऑफ क्वालिटी अॅशुरन्सच्या कंपनीत कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नेत्याने स्पष्ट केले की, मोदी सरकार आम्हा कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या चोरत आहे. तसेच रणनिती क्षेत्राच्या खासगिकरणाचा घाट सुद्धा घातला आहे.
मोदी सरकारकडून संरक्षण क्षेत्रामध्ये खासगीकरणाला मोठी संधी मिळावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. केंद्र सरकारच्या योजनांमधील निर्णयांपैकी दोनशे पेक्षा अधिक संरक्षणविषयक उपकरणांना नॉन कोर करण्यात येणार किंवा नाही. त्यामुळे या संस्था ते थेट बाजारातून खरेदी करु शकतात असं म्हटलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं