जिओनीचा नवा स्मार्टफोन विक्रीसाठी लॉन्च. ३ व्हॉट्सअॅप ते ही एकाच मोबाईलमध्ये.

मुंबई : जिओनी कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षात परवडणारा स्मार्टफोन घेऊन आली आहे. फोनचं नाव ‘जिओनी S10 लाईट’ असून तो भारतात विक्रीसाठी खुला झाला आहे. या स्मार्टफोन मध्ये विशेष आकर्षणाचं केंद्र बिंदू म्हणजे यात ग्राहकाला फ्लॅशसोबत १६ मेगा पिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. त्यामुळे सेल्फी प्रेमींसाठी हि खूपच आनंदाची बातमी आहे.
या स्मार्टफोन मधलं अजून एक वैशिष्ट म्हणजे यात व्हॉट्सअॅप क्लोन फीचर देण्यात आले आहे. म्हणजे तुम्ही एकाच वेळी ३ व्हॉट्सअॅप अकाऊंट ऑपरेट करू शकता जे आधी शक्य न्हवतं.
भारतीय बाजारात ‘जिओनी S10 लाईट’ स्मार्टफोन ची किंमत १५ हजार ९९९ निश्चित करण्यात आली असून तो आज म्हणजे २३ डिसेंबर पासून भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. या स्मार्टफोनचे मॉडेल सोनेरी आणि काळ्या रंगात बाजारपेठेत उपलब्ध असेल.
जाणून घेऊया काय आहेत ‘जिओनी S10 लाईट’ ची वैशिष्ठे:
- 32 जीबी स्टोरेज
- 256 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा
- होम बटनवर फिंगरप्रिंट सेन्सर
- 3100 mAh क्षमतेची बॅटरी
- 4G, VoLTE, वायफाय 11, ब्लूटूथ, मायक्रो-यूएसबी
- ड्युअल नॅनो सिम स्लॉट
- अँड्रॉईड 7.1 नुगा सपोर्टिव्ह (एमिगो 4.0 यूआय)
- 5.2 इंचाचा स्क्रीन (720×1280 पिक्सेल रिझॉल्युशन
- 4GHz स्नॅपड्रॅगन 427 प्रोसेसर
- 4 जीबी रॅम
- 13 मेगापिक्सेल रिअर सेन्सर कॅमेरा
- 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, सोबत फ्लॅशन
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं