गुडविन ज्वेलर्सचा मालक फरार; ग्राहकांना करोडोचा गंडा

ठाणे: ऐन दिवाळीत गुडविन ज्वेलर्स दुकानाला टाळे लागल्याने ग्राहकांचे धाबे दणाणले असून आत्तापर्यंत या ज्वेलर्स विरोधातील तक्रारींचा आकडा वाढत ५० च्या पुढे गेला आहे. फसवणुकीची रक्कम जवळपास तीन कोटी रुपयांच्या आसपास असून यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
डोंबिवलीतलं गुडविन ज्वेलर्स..अनेक शहरांमध्ये त्यांच्या शाखा आहेत. २१ ऑक्टोबरला दुकान दोन दिवस बंद राहील, अशी पाटी दुकानाबाहेर लावण्यात आली होती. मात्र आता ७ दिवसांनंतरही दुकान उघडलेलं नाही. त्यामुळे ग्राहकांना धक्का बसला मोठा आहे. गुडविन ज्वेलर्समध्ये भिशी, फिक्स डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझीट्स यामध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्यामुळे शेकडो ग्राहकांच्या तोंडचं पाणी पळालंय.
सोमवारी शेकडो गुंतवणूकदारांनी दुकानाबाहेर गर्दी केली. यापूर्वीही डोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्स अशाचप्रकारे बंद करण्यात आलं होतं. त्यातही कोट्यवधी रुपये अडकले होते. सध्या पीएमसी घोटाळा गाजत असून त्यानंतर आता गुडविन ज्वेलर्सकडूनही अशीच फसवणूक होते का? अशा विवंचनेत गुंतवणूकदार सापडले आहेत. गुंतवणूकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणूक झाल्याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करीत दुकानाला सील लावला असून, तपास सुरू केला आहे.
गुडविन ज्वेलर्सचे मालक आणि मॅनेजरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या शोधासाठी घरी पोलीस पाठवण्यात आले. मात्र ते घर रिकामं करून गायब झाल्याचं समोर आलं आहे. या तक्रारींनुसार फसवणुकीचा आकडा एक कोटी १३ लाख असून एकूण फसवणुकीचा आकडा दोन कोटी ९३ लाखावर गेला आहे. वास्तविक जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार वारंवार घडतात, पण लोकांचे डोळे उघडत नाहीत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं