#Alert: सामान्यांच्या PF'चे २० हजार कोटी रुपये बुडण्याची शक्यता, IL&FS दिवाळखोरीच्या उबरठयावर?

मुंबई : लाखो पगारदार सामान्य लोकांचा आधार असलेली भविष्य निर्वाह तसेच निवृत्ती वेतनाची करोडोची रक्कम बुडण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. आर्थिक क्षेत्रातील तज्ञांच्या मते इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग फायनान्शियल सर्विसेस अर्थात “IL&FS” या ग्रुपमध्ये जवळपास १५ ते २० हजार कोटीच्या भविष्य निर्वाह तसेच निवृत्ती वेतनाच्या निधीची प्रचंड मोठी गुंतवणूक करण्यात आलेली आहे.
आर्थिक गुंतवणूक तज्ञांच्या मते, IL&FS वर तब्बल ९१,००० कोटीचे कर्ज आहे. त्यामुळे त्यांना कर्ज स्वरुपात निधी देणाऱ्यांना त्याचा सर्वात मोठा फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येते आहे. रेग्युलेटरी फाइलिंगच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, IL&FS कडे ९१,००० कोटीचे कर्ज असून यातील तब्बल ६१ टक्के रक्कम ही केवळ बँकांची आहे. तर बाकीची रक्कम कर्जरोखे तसेच कमर्शिअल दस्तावेजावरील कर्जातून प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे भविष्य निर्वाह आणि निवृत्ती वेतन फंड्समधील एकूण रक्कमेचा अधिकृत आकडा जरी समजू शकला नसला तरी ही रक्कम IL&FS ला बँक, म्यूचुअल फंड आदी योजनांकडून प्राप्त निधीपेक्षा भिन्न असल्याचे वृत्त आहे. यामुळे भविष्य निर्वाह आणि निवृत्ती वेतन फंड्सच्या मार्फत गुंतवणूक झालेल्या २०,००० कोटीवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
IL&FS या कंपनीला ‘AAA’ अर्थात गुंतवणुकीस सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. तसेच अशा कंपनीमधील गुंतवणूक नेहमी चांगला परतावा सुद्धा देते. त्यामुळे भविष्य निर्वाह आणि निवृत्ती वेतन निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या अनेक फंड्सने IL&FS चे काही बॉंडस मोठ्या प्रमाणावर खरेदी केले. परंतु, आता सदर कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याने या बॉड्सच्या माध्यमातून गुंतवलेली २०,००० कोटीची रक्कम बुडण्याची मोठी भीती व्यक्त करण्यात येते आहे. त्यामुळे त्यांना कर्जदेणाऱ्या बँकासुद्धा बुडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यात सर्वात मोठी रक्कम येस बँक, PNB, इंडसइंड बँक आणि बँक ऑफ बडोदा यांची मोठी कर्ज अडकली आहेत.दरम्यान, याबाबत IL&FSकडून कुठलीही अधिकुत माहिती अजून प्रसार माध्यमांना मिळू शकली नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं