अग्नी-४ बॅलेस्टिक मिसाइलचे यशस्वी परीक्षण

ओडिशा : ओडिशाच्या भूमीवरून काल रविवारी सक्षम परमाणू घेऊन जाणारे आणि ४,००० किमी पर्यंत मारा करण्याची क्षमता असणाऱ्या ‘अग्नी ४’या बॅलेस्टिक मिसाइलची लष्कराने प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी चाचणी केली आहे. डॉ. अब्दुल कलाम द्वीपावरील एकीकृत परीक्षा केंद्रावरून (आयटीआर) रविवारी सकाळी ८.३५ मिनिटांनी ही चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्रामुळे ४,००० किलोमीटर अंतरावरील जमिनीवर मारा करता येणे शक्य होणार आहे, अशी माहिती लष्कराच्या अधिकृत सूत्रांनी प्रसार माध्यमांना दिली.
या वेळी सर्व रडार, ट्रॅकिंग सिस्टीम आणि रेंज स्टेशनवर लक्ष ठेवण्यात आले होते. त्यानंतर एका मोबाइल लॉँचरच्या साह्याने ‘अग्नी ४’ चे प्रक्षेपण करण्यात आले. ‘अग्नी ४’चे हे ७वे परीक्षण होते. यापूर्वी आर्मीने स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड (एसएफसी) ने याच ठिकाणावरून २ जानेवारी २०१८ मध्ये क्षेपणास्त्राचे परीक्षण केले होते. अग्नी १, अग्नी २, अग्नी ३ आणि पृथ्वी यासारखी बॅलेस्टिक मिसाइलचा उपयोग लष्करात समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे भारत प्रभावी प्रतिबंध क्षमता निर्माण करू शकेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं