इंधन दरवाढीने लवकरच महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता | सामान्य लोकं हैराण होणार

मुंबई, १९ फेब्रुवारी: कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्यांच्या अडचणीं कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. वाढत्या महागाईमुळे त्यांच्या समस्या वाढल्या आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमती आज पुन्हा वाढल्या आहेत. दरम्यान, तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सलग 11 व्या दिवशी वाढ केली आहे. ज्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर 90 रुपयांच्या पुढे गेले आहे. सध्या अनेक शहरांत पेट्रोलचे दर शंभरच्या पुढे गेले आहेत.
पेट्रोलियम कंपन्यांनी आज शुक्रवारी सलग ११ व्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ केली. या दरवाढीने दिल्लीत पेट्रोलने ९० रुपयांची तर डिझेलने ८० रुपयांची पातळी ओलांडली आहे. मुंबईत साधे पेट्रोल ९७ रुपयांच्या नजीक गेले आहे. दरम्यान, पेट्रोलने शंभरी ओलांडलेल्या शहरांची संख्या आज वाढली आहे.
Petrol and diesel prices in Delhi stand at Rs 90.19 per litre (increase by 31 paise) and Rs 80.60 per litre (increase by 33 paise), respectively
(file photo) pic.twitter.com/UY34H7HdSy
— ANI (@ANI) February 19, 2021
पेट्रोलियम कंपन्यांचा इंधन दरवाढीचा धडका कायम आहे. आज देशभरात पेट्रोल ३१ पैसे आणि डिझेल ३३ पैशांनी महागले आहे. इंधन दरवाढीने लवकरच महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल ३१ पैसे तर डिझेल ३३ पैशांनी वाढलं आहे. यासोबतच दिल्लीत पेट्रोलच्या दराने ९० चा आकडा गाठला असून लोकांनी प्रतिलीटरमागे ९० रुपये १९ पैसे मोजावे लागत आहेत. तर डिझेलसाठी ९० रुपये १९ पैसे मोजावे लागत आहेत. तर मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलीटर ९६ रुपये ६२ पैसे आणि डिझेलचा दर ८७ रुपये ६७ पैसे इतका झाला आहे.
News English Summary: Petroleum companies hiked petrol and diesel prices for the 11th consecutive day on Friday. With this hike, petrol in Delhi has crossed the Rs 90 level and diesel Rs 80. In Mumbai, simple petrol has gone close to Rs 97. Meanwhile, the number of cities where petrol has crossed hundreds has increased today.
News English Title: Inflation may reach on highest level after increased fuel rates news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं