रुपयाची घसरण व पेट्रोल-डिझेलच्या चढ्या किंमतींमुळे शेअर बाजारात एक लाख कोटींची हानी

मुंबई : डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची नव्याने झालेली पडझड तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतींचा मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने मोठा धसका घेतल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या एक लाख कोटींचा चुराडा झाल्याचं वृत्त आहे.
देशांतर्गत अर्थकारणातील नकारात्मक घडामोडी आणि त्यात आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या घडामोडींमुळे गुंतवणूकदार पुरते रडकुंडीला आले आहेत. सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ५०५ अंकांची आपटी खाल्ली व दिवसअखेरीस तो ३७५८५ पर्यंत घसरून स्थिरावला. त्यात बाजाराने अर्थात गुंतवणूकदारांनी एक लाख कोटीं रुपये गमावले आहेत.
त्यात अमेरिका तसेच चीनमधील व्यापारयुद्ध अजून तीव्र होण्याचे संकेत मिळाल्याने ते सुद्धा निर्देशांकासाठी मारक ठरले. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही १३७ अंकांची घसरण झाली व तो ११३७७वर स्थिरावला. निर्देशांकाच्या या घसरणीमुळे बाजारातील गुंतवणूकदारांचे तब्बल एक लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे असे वृत्त आहे. बहुतांश सूचिबद्ध कंपन्यांना या घसरणीचा जबर फटका बसला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं