सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी इस्रो भारतीय लष्कराला मदत करणार, विशेष उपग्रह सोडणार

नवी दिल्ली: भारत पाकिस्तानच्या सीमेवरुन होणारी दहशतवाद्यांची आणि पाकिस्तानी नागरिकांच्या घुसखोरी या नित्याच्या गोष्टी झाल्या आहेत. त्यामुळे लष्कराला सुद्धा अनेक मर्यादा येत आहेत. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय लष्कराचे सैनिक दिवस-रात्र सीमेवर जागता पहारा देतात, परंतु तरी घुसखोरीला रोखताना अनेक अडथळे येत आहेत.
परंतु, आता ही घुसखोरी रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी इस्रो (ISRO) ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था भारतीय लष्कराला मदत करणार आहे. यामुळे नियंत्रण रेषेवरील सर्व बारीक हालचालींवर लक्ष ठेवणं भारतीय लष्कराला शक्य होणार आहे.
पाकिस्तान, बांग्लादेश आणि इतर आजूबाजूच्या देशांच्या सीमांवर थेट अवकाशातून नजर ठेवण्यासाठी इस्रो एक खास उपग्रह लॉन्च करणार आहे. यामुळे गृह मंत्रालयाला सुद्धा मोठा दिलासा मिळणार आहे. याबद्दलची अधिकृत माहिती काल सरकारकडून प्रसार माध्यमांना देण्यात आली. सीमा सुरक्षेसाठी अंतराळ तंत्रज्ञानाची मदत घेण्याची सूचना एका समितीनं केंद्राकडे केली होती. दरम्यान सदर सूचना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्वीकारली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं