इस्रोकडून सर्वात हलक्या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरीकोटा: भारतीय अंतराळ संधोधन संस्थेनं अर्थात इस्रोने भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. काल रात्री उशिरा आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून इस्रोनं जगातील वजनाने सर्वाधिक हलक्या उपग्रहाचं अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केलं. काल रात्री ११ वाजून ३७ मिनिटांनी इस्रोनं मायक्रोसॅट-आर आणि कलामसॅटचं यशस्वी प्रक्षेपण केलं. दरम्यान, मायक्रोसॅट या उपग्रहामुळे भारतीय लष्कराला सर्वात मोठी मदत मिळणार आहे. तर कलामसॅट हा उपग्रह विद्यार्थ्यांनी बनवला आहे. PSLV- C ४४ च्या मदतीनं या दोन्ही उपग्रहांचं अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केलं आहे.
या प्रक्षेपणामुळे भारताच्या प्रभावशाली विद्यार्थ्यांनी मेहनतीने निर्माण केलेल्या कलामसॅटनं कक्षेत अखेर यशस्वीपणे प्रवेश केला आहे,’ अशा शब्दांमध्ये पंतप्रधानांनी इस्रो आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. इस्रोच्या प्रमुखांनी सुद्धा देशातील वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासणाऱ्या प्रभावशाली विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव केला. दरम्यान, इस्रो देशातल्या अशा प्रभावशाली विद्यार्थ्यांसाठी नेहमीच खुली आहे असा होकारात्मक संदेश दिला आहे.
Andhra Pradesh: #ISRO launches #PSLVC44 mission, carrying #Kalamsat and #MicrosatR from Satish Dhawan Space Centre, Sriharikota. pic.twitter.com/yBI7xlKARK
— ANI (@ANI) January 24, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं