जेट एअरवेज आणि एअर इंडिया खरेदीत रिलायन्सला रस

नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने जेट एअरवेज आणि एअर इंडिया या २ बड्या नागरी विमान वाहतूक कंपन्या स्वतःच्या ताब्यात घेण्यात रस दाखविला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान, आर्थिक संकटात असलेली जेट एअरवेज बुधवारी बंद पडली असून, सरकारी मालकीची एअर इंडियाही अखेरच्या घटका मोजत आहे. दोन्ही कंपन्यांचा मिळून भारतीय हवाई उड्डाण क्षेत्रात एकूण २५ टक्के बाजार हिस्सा आहे.
सुमारे २५ वर्षे उड्डाण करणाऱ्या जेट एअरवेजला गेल्या वित्त वर्षात मोठा तोटा सहन करावा लागला होता. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) तातडीची मदत म्हणून ९८३ कोटी रुपये देण्यास नकार दिल्यानंतर कंपनी बंद पडली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील कर्जदात्या बँक समूहाने जेट एअरवेज विकण्याची प्रक्रिया याआधीच सुरू केली आहे. बँक समूहाने इच्छुक कंपन्यांकडून इच्छापत्रेही (एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) मागितली आहेत. मात्र इच्छापत्रे सादर करणाºया कंपन्यांत रिलायन्स नाही. कंपनी यूएईस्थित एतिहाद एअरवेजच्या निविदेत नंतर सहभागी होणार आहे.
भारत सरकारने एअर इंडियाच्या विक्रीचा प्रयत्न गेल्या वर्षी केला होता. तथापि, खरेदीदारच न मिळाल्याने हा प्रयत्न फसला. त्यानंतर आता मात्र रिलायन्स इंडस्ट्रीजने एअर इंडियात रस दाखविला आहे. कंपनीच्या एकात्मिक योजनेंतर्गत एअर इंडियाची खरेदी करण्याचा विचार केला जात आहे. एका अधिकाºयाने सांगितले की, ही बोर्डरूम रणनीती असून, नंतरच्या टप्प्यात यावर विचार केला जाईल. चर्चा हळूहळू गती घेत आहे. इच्छुक पक्षांना माहिती आहे की, त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे. एअर इंडियावर तब्बल ४८,७८१ कोटी रुपयांचे कर्ज आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं