मोदी है तो मुमकिन है | सामान्य लोकांचा खिसा कापणं सुरूच | गॅस सिलिंडर 25 रुपयांनी महागला

मुंबई, १५ ऑगस्ट | सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्यात. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) ने विनाअनुदानित 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ केलीय. आता दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलिंडर 859.5 रुपये झालाय. तर तो पूर्वी 834.50 रुपये मिळत होता. यापूर्वी 1 जुलै रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. या महिन्याच्या सुरुवातीला IOC ने 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 73.5 रुपये प्रति सिलिंडर वाढवली होती. या काळात कंपनीने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्या नाहीत.
दिल्लीमध्ये 14.2 किलो सिलिंडरची सबसिडीशिवाय किंमत 834.50 रुपयांवरून 859.50 रुपये झालीय. कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत आता 886 रुपये आहे. मुंबईतील सिलिंडरसाठी 834.5 ऐवजी 859.5 रुपये मोजावे लागतील. चेन्नईमध्ये सिलिंडरसाठी ग्राहकांना 850.50 ऐवजी 875.5 रुपये द्यावे लागतील.
15 फेब्रुवारीला किंमत वाढवून 769 रुपये करण्यात आली. यानंतर 25 फेब्रुवारी रोजी एलपीजी सिलिंडरची किंमत 794 रुपये करण्यात आली. मार्च महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 819 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. एप्रिलच्या सुरुवातीला 10 रुपयांची कपात केल्यानंतर दिल्लीतील घरगुती एलपीजी सिलिंडरचा दर 819 रुपये प्रति सिलिंडरवरून 809 रुपये करण्यात आला. एलपीजी सिलिंडरच्या किमतीत एका वर्षात 165.50 रुपयांची वाढ झाली.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: LPG cylinder price hike by 25 rupees news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं