मोदी है तो मुमकिन है | आज मध्यरात्रीपासून CNG, घरगुती पाईपलाईन गॅसच्या दरात मोठी वाढ जाहीर

मुंबई, १३ जुलै | देशभरात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये विक्रमी वाढ झाल्याने सर्व सामान्य माणूस पोळलेला असताना आता सीएनजी आणि घरगुती पाईपलाईन गॅसच्या दरात देखील मोठी वाढ होणार आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
गॅस पाइप लाईन वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे परिचालन खर्च आणि अतिरिक्त खर्चाचे नियोजन करण्यासाठी ही दरवाढ करण्यात येणार असल्याचे महानगर गॅस लिमिटेडने स्पष्ट केले आहे. हे नवे दर १३ जुलै २०२१ च्या मध्यरात्री, १४ जुलै २०२१ रोजी सकाळी मुंबईत लागू होतील.
कंपनीच्या या जाहीर नव्या दरवाढीनुसार मुंबई आणि आसपासच्या सीएनजी, घरगुती पीएनजीच्या सुधारित किंमती या ५१.९८ प्रति किलोग्रॅम आणि ३०.४०/ एससीएम (स्लॅब 1) आणि ३६.००/ एससीएम (स्लॅब 2) अशा होणार आहेत. अंतरानुसार यामध्ये कमी अधिक फरक असणार आहे. असे असले तरी देखील मुंबईत सध्या पेट्रोल आणि डिझेल दरांच्या तुलनेत सीएनजी अनुक्रमे ६७% आणि ४७% कमी असणार आहे. तसेच घरगुती एलपीजी सिलिंडरच्या तुलनेत पीएनजीचे दर ३५ टक्क्यांनी कमी असणार आहेत.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Mahanagar Gas Limited increase in CNG Rates and PNG Rate from 13th July midnight news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं