टॅक्सचोरीसाठी इतर राज्यांमध्ये नोंदणीकृत केलेल्या गाड्या मुंबईत 'मै भी चौकीदार' अभियानासाठी?

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैं भी चौकीदार ही मोहिम सुरू केली. त्यानंतर देशभर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या मोहिमेला मोठा प्रतिसाद दिल्याचे चित्र उभे केले गेले. मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाला समर्थन देण्यासाठी १० वॉलेंटियर्सच्या वतीने कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.
दरम्यान, या रॅलीत केवळ एक-दोन नव्हे तर तब्बल ५०० कार सहभागी झाल्या होत्या. या सगळ्या कारवर ‘मैं भी चौकीदार’ अशी मराठी, हिंदी आणि गुजराती भाषेत स्टिकर्स चिटकविण्यात आली होती. परंतु, विषय ‘मैं भी चौकीदार’ या विषयाला अनुसरून असला तरी यात अनेक स्वयंघोषित चौकीदार जरी सामील झाले असले तरी, सहभागी होणाऱ्या अनेक कारचे मालक टॅक्स वाचवण्यासाठी किंवा सरकारला चकवा देत मुंबईमध्ये वास्तव्यास असून देखील गाड्यांची नोंदणी इतर राज्यात करणारे होते हे गाड्यांच्या नंबरवरून स्पष्ट होत आहे.
त्यामुळे या अभियानात सहभागी होणारे खरंच चौकीदार आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. त्यामुळे केवळ अफाट पैसा या अभियानावर खर्च करून केवळ खोटी हवा निर्मिती करण्याचा केविलवाणा प्रयत्न होता का अशी बघ्यांमध्ये चर्चा रंगली होती. त्यामुळे ही केवळ श्रीमंतांनी केलेली स्वतःची चमकोगिरी होती असंच म्हणावं लागेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं