मेक्सिकोत गॅस पाइपलाइन फुटून ७१ जणांचा मृत्यू

मेक्सिको : मेक्सिकोमधील हिडाल्गो शहरात चोरी करण्याच्या प्रयत्नात मुख्य गॅस पाइपलाइन फुटून शुक्रवारी भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अग्नी तांडवानंतर झालेल्या भीषण स्फोटात तब्बल ७१ निरपराधांचे प्राण गेले आहेत. भीषण आगीमुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे आणि अजून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत असे वृत्त आहे. दरम्यान, या धक्कादायक दुर्घटनेतील मृतांचे मृतदेह जवळपास १०० टक्के जळाल्याने अनेकांना ओळखणेच कठीण होऊन बसले आहे.
मेक्सिकोतील हिडाल्गो शहरात स्थानिकांनी तेल चोरी करण्याच्या नादात मुख्य पाइपलाइनला छिद्र केले. त्यामुळेच हा भीषण अपघात झाला आहे. हा अति भीषण आगीनंतर आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात इंधनाची गळती सुद्धा झाली होती. दरम्यान, मेक्सिकोमध्ये इंधन चोरीचा भस्मासुर प्रशासकीय त्यातूनच इंधन सुरक्षा प्रश्न सरकारसाठी डोकेदुखीचा ठरला आहे. दरम्यान, याआधी २०१७ मध्ये मेक्सिकोला इंधन चाेरीमुळे तब्बल ३ अब्ज डॉलर्सचा आर्थिक फटका सुद्धा बसला होता. त्यावेळी या प्रकरणात १३,००० खटले दाखल करण्यात आले होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं