ओला उबर ७ वर्षांपासून सेवा देते, मंदीला ते जवाबदार नाहीत: मारुती सुझुकीची प्रतिक्रिया

नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून ऑटोक्षेत्रात मोठी मंदी आल्याचं पाहायला मिळाले. टाटा मोटर्स, महिंद्रा आणि अशोक लेलँड सुरक्षा मोठ्या कंपन्यांना काही दिवस प्लांट बंद ठेवण्याची वेळ होती आणि आजही तेच प्रकार वरचे वर सातत्याने होताना दिसत आहेत. ग्राहकाने मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदीकडे पाठ फिरवल्याने कंपन्यांकडे कामच नव्हतं आणि परिणामी प्लांट बंद ठेवण्याची वेळ कंपन्यांवर आली होती.
विशेष म्हणजे या क्षेत्रातील मंदीमुळे मोठ्याप्रमाणावर बेरोजगारी वाढली असून ऑटोशेत्राशी संबंधित लघुउद्योगांवर देखील मोठं संकट ओढवलं आहे. परिणामी याचे पडसाद राजकारणात देखील उमटले आणि केंद्र सरकारला काय उत्तर द्यावं या पेचात सापडलं होतं. मात्र त्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अधिकृत प्रतिक्रया दिली खरी, मात्र त्यानंतर त्यांची सर्वच बाजूने खिल्ली उडवली गेल्याच पाहायला मिळालं.
सदर विषयावर बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रवासी वाहतूक क्षेत्रातील मंदीसाठी ओला उबरसारख्या कंपन्या जबाबदार असल्याचं म्हटलं. दरम्यान याच क्षेत्रातील मोठी कंपनी मारुती सुझुकीनं प्रतिक्रिया आल्यानंतर अर्थमंत्री तोंडघशी पडल्याचं म्हटलं जातं आहे. मारुती सुझुकी कंपनीचे विपणन आणि विक्री विभागाचे संचालक शशांक श्रीवास्तव म्हणाले की, मंदीच्या कारणांचा अभ्यास करायला हवा.
त्यावर सविस्तर बोलताना शशांक श्रीवास्तव म्हणाले की, कार खरेदीबद्दल लोकांची मानसिकता बदलेली नाही. ‘लोक गरज म्हणून, चैन म्हणून कार खरेदी करतात. अद्याप देखील लोकांच्या मानसिकतेत जराही बदल झालेली नाही. मात्र सध्या बाजारात असलेल्या मंदीमागील विविध कारणांचा अभ्यास करायला हवा. परंतु या मंदीमागे ओला, उबर हे मोठं कारण नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
विशेष म्हणजे पुढे त्यांनी जे सांगितलं त्यानंतर अर्थमंत्री पूर्णपणे तोंडघशी पडल्या आहेत असंच म्हणावं लागेल. ते म्हणाले, ओला उबर असूनही मागील ६ वर्षांमध्ये ऑटोमोबाईलची स्थिती उत्तम होती. ‘ओला, उबर मागील ६-७ वर्षांपासून चिरंतर सेवा देत आहेत. परंतु या काळात अनेकदा कंपन्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे हे आकडेवारी सिद्ध करत. परंतु मागील काही महिन्यांपासून मंदीचा प्रचंड मोठा सामना संबंधित कंपन्यांना करावा लागत आहे. मात्र ओला, उबरमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं मला अजिबात वाटत नाही,’ असं श्रीवास्तव यांनी सांगितलं. आपलं म्हणणं स्पष्ट करण्यासाठी त्यांनी अमेरिकेचं उदाहरण दिलं. उबर अमेरिकेतील अॅप बेस्ड सेवा देणारी सर्वात मोठी कंपनी आहे. मात्र तरी देखील मागील काही वर्षांमध्ये अमेरिकेत कारची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं