केंद्रीय अर्थसंकल्प २०१९: काय महाग आणि काय स्वस्त?

नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला. दरम्यान या अर्थसंकल्पातून शेतकरी तसेच मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देणाऱ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक सामान्यांशी निगडित असलेला विषय म्हणजे घर खरेदीसाठी मिळत असलेली २ लाखांची सूट ३.५ लाखांवर आणण्यात आली असून, एकूण ४५ लाख रुपयांपर्यंत घर खरेदी करणाऱ्यांना त्याचा थेट फायदा मिळणार आहे. मात्र पेट्रोल आणि डिझेलचे भाव १ रुपयानं वाढणार असून, त्याचा वाहन चालकांना फटका बसणार हे निश्चित झालं आहे.
मात्र महिलांसाठी दुःखाची बातमी म्हणजे सोने तसेच इतर धातूंवरील १० ते १२.५ टक्क्यांपर्यंत एक्साईज ड्युटी वाढवण्याची तरतूद सरकारने यंदाच्या बजेटमध्ये केली आहे. इलेक्ट्रीक कार खरेदी करणाऱ्यांनाही करात विशेष सूट देण्यात आली आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळेच इलेक्ट्रिक वाहनांवरील १२% GST ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. या वाहनांच्या खरेदीसाठी कर्ज घेतल्यास सरकारकडून सवलत दिली जाईल.
आजच्या बजेटमध्ये या वस्तू महाग होणार:
परदेशी तेल, प्लास्टिक, रबर, पेपर छपाई, पुस्तकांची कव्हर आणि छपाई, ऑप्टिकल फायबरसाठी वापरले जाणारे वॉटर ब्लॉकिंग टेप्स, टाईल्सच्या वस्तू (सिरेमिक उत्पादने), स्टेनलेस स्टील, मिश्र धातूचं वायर, एसी, रस्ते बांधकामासाठीचं क्रशर मशिन, लाऊडस्पीकर, डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर, सीसीटीव्ही आणि आयपी कॅमेरा, ऑप्टिकल फायबर बंडल, ऑटोमोबाईल साहित्य, ऑटो पार्ट्स, सिंथेटिक रबर, पीवीसी, टाइल्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सॉकेट, प्लग्स, सोने, सिगारेट, तंबाखू
तर नव्या तरतुदीनुसार या वस्तू स्वस्त होणार:
साबण, शॅम्पू, केसाचं तेलं, टूथपेस्ट, पंखा, लॅम्प, ब्रीफकेस, प्रवासी बॅग, सेनिटरी वेअर, बोटल, कंटेनर, भांडी, गादी, बिछाना, चष्म्याची फ्रेम, फर्निचर, पास्ता, अगरबत्ती, नारळ, सॅनिटरी नॅपकिन
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं