पश्चिम रेल्वेवरील तब्बल अकरा तासांचा मेगाब्लॉक संपला

मुंबई : लोअर परळच्या डिलाईल रोड पुलाच्या पाडकाम तसेच बांधकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते दादर दरम्यान तब्बल अकरा तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला. या मेगा ब्लॉकदरम्यान चर्चगेट ते दादर दरम्यान एक सुद्धा लोकल धावली नाही. हा ब्लॉक आता पूर्ण झाला असून पश्चिम रेल्वेवरील वाहतुकीला सुरुवात झाली आहे. आता पश्चिम रेल्वेवरील मेल आणि एक्स्प्रेसची वाहतूक सुद्धा पूर्णपणे सुरळीत झाल्याचे वृत्त आहे. आज सकाळी ८ वाजून ३५ मिनिटांनी पहिली चर्चगेट-विरार लोकल रवाना झाली.
दरम्यान, आज मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंडदरम्यान डाऊन जलद मार्गावर व हार्बरवर मानखुर्द ते नेरुळ दोन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०.३० ते दुपारी ३.०० पर्यंत माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक घेतला जाणार आहे. तर हार्बर मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत मानखुर्द ते नेरुळ दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक असेल वृत्त आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं