परतीच्या पावसाने सामान्यांच्या डोळ्यात पाणी येणार | कांदा शंभरी गाठणार

मुंबई, २० ऑक्टोबर : परतीच्या पावसाचा जसा शेतकऱ्यांना फटका बसला, तसाच सर्वसामान्य ग्राहकांनाही बसायला सुरुवात झाली आहे. भाजी बाजारातील दरवाढीची झलक दाखवायला कांद्याने सुरुवात केलीय. काही आठवड्यांपूर्वी २० ते २५ रुपये किलो दराने कांदा मिळत होता. मात्र सध्या कांद्याचे दर तब्बल ७० रुपयांच्या घरात पोहोचलेत. राज्यातील कांद्याची परिस्थिती पाहता येत्या काही दिवसांत कांद्याने शंभरी गाठली, तरी आश्चर्य वाटून घेऊ नका, असं राज्यातले अनुभवी व्यापारी सांगतायत.
परतीच्या पावसाचा फटका कांदा पिकालाही बसलाय. या पावसात कांद्याचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळं बाजारात कांदा येण्याचं प्रमाणही कमी होत चाललंय. मागणीपेक्षा पुरवठा घटत चालल्यामुळं साहजिकपणे कांद्याचे भाव वाढत चाललेत.
पावसामुळे अनेक ठिकाणी कांद्याचे पीक भिजले आहे. त्यामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. दिवाळीनंतर बाजारात येणारा कांदा पावसात भिजला आहे. त्यामुळे चांगल्या कांद्याची पुढे टंचाई भासणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत. परिणामी मुंबई बाजारात कांद्याचे दर वाढले असल्याचे व्यापारी मनोहर तोतलानी यांनी सांगितले.
घाऊक बाजारात कांदा २० ते २५ रुपये किलो असतानाच, किरकोळ बाजारात कांदा ४० ते रुपये किलो झाला होता. त्यामुळे घाऊक बाजारात ७० रुपये किलोने विकला जाणारा कांदा किरकोळ बाजारात ८० रुपये किलो झाला आहे. परिणामी गृहिणींचे स्वयंपाकघराचे गणित बिघडले आहे.
News English Summary: As the return rains hit the farmers, so did the general consumers. Onions have started showing a glimpse of price rise in the vegetable market. A few weeks ago, onions were available at Rs 20 to 25 per kg. But now the price of onion has reached Rs. Experienced traders in the state say that even if the number of onions in the state reaches 100 in the next few days, don’t be surprised.
News English Title: Onion Prices are likely to hit 100 rupees News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं