महत्वाच्या बातम्या
-
चांद्रयान २: भारतीय शास्त्रज्ञांना श्रेष्ठ म्हणत त्यांचे पगार मोदी सरकारने कापले
दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आज(दि.२८) आकाशवाणीवरील कार्यक्रम ‘मन की बात’द्वारे देशवासियांशीही दुसऱ्यांदा संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो ISRO) शास्त्रज्ञांचं आणि चांद्रयान-२ मोहिमेचं कौतुक केलं. याशिवाय त्यांनी अन्य अनेक विषयांवरही भाष्य केलं.
6 वर्षांपूर्वी -
विवो'चा नवीन बजेट स्मार्टफोन : विवो Y90
ह्या महागाईच्या जगात जिथे मोठमोठ्या कंपन्या महागडे असे स्मार्टफोन मार्केट मध्ये आणत आहेत तिथेच विवो’ने आणला आहे, आपल्या खिशाला परवडणारा असा स्मार्टफोन विवो Y90. हा स्मार्टफोन तब्बल ६,६९० रुपयांना भारतीय मार्केट मध्ये उपलब्ध होणार आहे. विवो Y90 हा विवो च्या Y सिरीज मधील सर्वात स्वस्त मोबाईल असून ह्या स्मार्टफोन फेस-अनलॉक फिचर सुद्धा आहे.
6 वर्षांपूर्वी -
पीक विमा कंपन्यांनी राज्यात २,२५५ कोटी नफा कमावला; ९८% शेतकरी मदतीविना: सीएसई रिपोर्ट
पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होऊन देखील, विमा कंपनीने फसवणूक केल्याची तक्रार घेऊन नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील चांदोरे येथील शेतकरी बाबूराव सुर्वे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दार ठोठावले. पंतप्रधान कार्यालयाने तत्काळ दखल घेऊन ही तक्रार केंद्रीय कृषी खात्याकडे ती वर्ग केली. केंद्रीय कृषी खात्यानेही ती कंपनीकडे पाठवण्याचे कागदी घोडे नाचवले. परंतु, या तक्रारीला ८ महिने उलटून गेल्यावरही विमा कंपनीने त्यावर काहीही कार्यवाही केलेली नाही. दरम्यान, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा कंपन्यांनी महाराष्ट्रातून सर्वाधिक प्रीमियम गोळा केल्याचे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट या संस्थेने केलेल्या अभ्यासात पुढे आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
आंध्रप्रदेश: भूमिपुत्रांना खाजगी नोकरीत ७५% आरक्षण; महाराष्ट्रात ५ वर्ष केवळ निर्धाराच्या मुठी आवळल्या
देशात रोजगाराच्या बाबतीत प्रथमच ऐतिहासिक गोष्ट घडली आहे. कारण आंध्र प्रदेशच्या अधिनियमातील महत्वाची तरतूद अशी आहे की, सरकारने एखाद्या उद्योगाला आर्थिक किंवा जमीन वगैरे अन्य सहाय्य दिलं असो की नसो, त्यांना या स्थानिक भूमिपुत्रांसाठी ७५ टक्के आरक्षणाचं धोरण राबवावंच लागणार आहे आणि सर्वांना काटेकोरपणे अमलात आणावं लागणार आहे. आंध्र प्रदेश सरकारने तसा आदेशच प्रसिद्ध केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मदत मागितली नाही : परराष्ट्र मंत्रालय
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान पाकिस्तानची अर्थव्यवस्था मोठ्या संकटाचा सामना करत असताना पंतप्रधान इम्रान खान यांना अमेरिकन सकारकडून मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. मात्र अमेरिकेतील ट्रम्प सरकार देखील पाकिस्तानवर दहशतवादी कारवाई रोखण्यात तिथल्या विद्यमान सरकारला अपयश येत असल्याच्या करणारे ट्रम्प सरकार इम्रान खान यांच्यावर प्रचंड नाराज आहे. परिणामी जेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेच्या दौऱ्यावर आपल्या शिष्टमंडळासोबत गेले असता त्यांना भेटण्यासाठी विमानतळावर कोणीही फिरकले नाहीत. धक्कादायक म्हणजे पाकिस्तानच्या पंतप्रधान आणि शिष्टमंडळाला चक्क ट्रेनने प्रवास करावा लागला.
6 वर्षांपूर्वी -
मिशन चांद्रयान २: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; वैज्ञानिकांची 'उत्तुंग' भरारी
भारताची चांद्रयान-१ ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर ‘चांद्रयान-२’ या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात (इस्रो) सज्ज झाली आहे. ‘चांद्रयान-२’ मोहिमेवर जाणाऱ्या ‘जीएसएलव्ही-मार्क-३’ या शक्तिशाली रॉकेटचे सोमवारी दुपारी २.४३ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण होणार होते.
6 वर्षांपूर्वी -
आज दुपारी प्रक्षेपणासाठी ‘चांद्रयान-२’ पूर्णपणे सज्ज
भारताची चांद्रयान-१ ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर ‘चांद्रयान-२’ या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात (इस्रो) सज्ज झाली आहे. ‘चांद्रयान-२’ मोहिमेवर जाणाऱ्या ‘जीएसएलव्ही-मार्क-३’ या शक्तिशाली रॉकेटचे सोमवारी दुपारी २.४३ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण व्हायचे आहे.
6 वर्षांपूर्वी -
5G मुळे मेंदूचा कर्करोग, नपुंसकत्व व अल्झायमर असे भयंकर विकार होण्याची भीती: रशियन टाईम्स
भारतासह जगभरातील आघाडीच्या देशांमध्ये आता 5G च्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. कारण त्यामुळे करोडो उपभोक्ते काही क्षणांत काही जीबी डेटा जलदगतीने डाऊनलोड करू शकतील. दरम्यान सध्या जगभरात मोबाईल कंपन्यांसोबत ऑटोमोबाईल कंपन्यांनी देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. भारतात तर इंटरनेटवाली कारही लाँच झाली आहे. दक्षिण कोरियामध्येतर 5Gचा वापर देखील वापर सुरू झाला आहे. तर चीनमध्ये परवानगी मिळाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सुविधा हव्या तर पैसे मोजावेच लागतील, आयुष्याभर टोल बंद होणार नाही: गडकरी
एकीकडे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष सरकार टोलमुक्तीच्या बाता मारत सत्तेवर आलेले असताना महाराष्ट्राचे खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. लोकांना चांगल्या सुविधा हव्या असतील तर पैसे मोजावेच लागतील, असे सांगितले आहे.
6 वर्षांपूर्वी -
तांत्रिक अडचणींमुळे चांद्रयान-२ चं प्रक्षेपण रद्द, लवकरच नवीन वेळ जाहीर करणार
भारताच्या अत्यंत महत्वाकांक्षी मोहीमेपैकी एक मानल्या जाणाऱ्या चांद्रयान-२ चं प्रक्षेपण काही तांत्रिक कारणामुळे थांबवण्याचा निर्णय इस्रो’ने घेतला आहे. ‘इस्रो’या संदर्भातली अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. पूर्वनियोजित योजनेप्रमाणे आज मध्यरात्री २ वाजून ५१ मिनीटांनी भारताचं हे यान अवकाशात झेपावणार होतं. परंतु ऐनवेळी आलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे हे प्रक्षेपण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाची नवीन वेळ आणि तारीख इस्रो लवकरच अधिकृतपणे जाहीर करणार आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून हे चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार होतं.
6 वर्षांपूर्वी -
चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार, काउंटडाऊन सुरू
भारताच्या स्पेस मिशनमधील नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. भारताच्या महत्वाकांक्षी मिशन चांद्रयान-२ मोहीमेला अवघे काही तास शिल्लक आहेत. उद्या १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-३च्या मदतीने चांद्रयान-२ अवकाशात झेपवणार आहे. लौंचिंग नंतर ५२ दिवसाने चांद्रयान-२ चंद्रावर पोहोचेल. इस्रोच्या या महत्त्वकांशी मोहीमेकडे केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचेही लक्ष लागले आहे.
6 वर्षांपूर्वी -
गोपनीयता व सुरक्षेमधील त्रुटी; फेसबुकला ५ बिलियन अमेरिकी डॉलर्सचा दंड
अमेरिकेतील नियामक प्राधिकरणानं फेसबुक या जागतिक पातळीवरील लोकप्रिय समाज मध्यामाला, माहितीची गोपनीयता आणि सुरक्षेमधील त्रुटींसंबंधित कारणांमुळे तब्बल ५ बिलियन अमेरिकी डॉलर्स एवढा प्रचंड दंड प्रस्तावित केला आहे. संबंधित निर्णयाला न्यायिक विभागाची अधिकृत मान्यता मिळाल्यास या प्रकरणी ठोठावण्यात आलेला आतापर्यंतचा हा इतिहासातील सर्वाधिक दंड असेल.
6 वर्षांपूर्वी -
औरंगाबादेत चोरट्यांनी चक्क एटीएम लंपास केलं
बीड : चोरटे नेमकं काय चोरी करतील याचा नेम नाही. यापूर्वी अनेकांनी एटीएम फोडून पैसे लुटण्याचे प्रकार केले आहेत. मात्र आता चोरट्यांनी कळसच गाठल्याचे दिसत आहे. हा प्रकार घडला आहे चक्क सर्वाधिक वर्दळीच्या बीड बायपासच्या दोन्ही बाजूने मोठी नागरी वसाहत आणि व्यापारी संकुल तसेच मंगल कार्यालय असलेल्या ठिकाणी.
6 वर्षांपूर्वी -
भारताने १० वर्षात २७ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर आणलं: संयुक्त राष्ट्राकडून कौतुक
भारतात नेहमीच श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये दरी वाढत असून, देशाच्या संपत्तीचा सर्वात मोठा हिस्सा हा मूठभर श्रीमंतांकडे आहे अशी बोंब अनेकांनी केली तरी काही संस्थांना ते मान्य नाही असंच म्हणावं लागेल. सदर रिपोर्ट जाहीर करण्यापूर्वी नक्की कोणते मापदंड लावण्यात आले ते समजायला मार्ग नाही. देशातील ग्रामीण पट्यातील दारिद्राची परिस्थिती अत्यंत विदारक असताना त्याला छेद देणारा अहवाल सध्या प्रसिद्ध झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
केंद्रीय अर्थ मंत्रालयात पत्रकारांच्या प्रवेशावर निर्बंध; ‘एडिटर्स गिल्ड’कडून निषेध
प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी अर्थात पत्रकार हे मंत्रालयात नियमित जात असतात. वास्तविक पत्रकारांनी देखील जबाबदारीने आणि विशिष्ट मर्यादेत राहणे अपेक्षित आहे. परंतु, त्यासाठी पत्रकारांच्या मंत्रालयातील प्रवेशावर एकूणच निर्बंध आणणे हा त्यामागील उपाय नव्हे, अशी ठाम भूमिका ‘एडिटर्स गिल्ड’ने घेतली असून बुधवारी गिल्डच्या वतीने एक अधिकृत निवेदन जाहीर करण्यात आले. केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा आदेश म्हणजे पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर आणलेली गदा आहे आणि ही लोकशाहीची गळचेपी आहे असं त्यात म्हटलं आहे. पत्रकारांच्या व्यावसायिक स्वातंत्र्याच्या जागतिक क्रमवारीत भारताचा क्रमांक अजूनच घसरला आहे. अर्थ मंत्रालयाने काढलेल्या या आदेशाचे आता अन्य मंत्रालये देखील तेच अनुकरण करण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे देखील गिल्डने नमूद केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
कॉर्पोरेट: कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीत कंजूसी; अन भाजपाला ९१५.५९ कोटी दान: एडीआर रिपोर्ट
कंपनीच्या वाढीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी दरम्यान आखडता हात घेणारे कोर्पोरेट्स सध्या सत्ताधारी भाजपवर भलतेच मेहेरबान असल्याचं दिसत आहे. कारण सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर कॉर्पोरेट विश्व मोठ्या प्रमाणावर पैसे उधळत असल्याचं एका रिपोर्टमध्ये सिद्ध झालं आहे. २०१६ ते २०१८ या कालावधीत भारतीय जनता पक्षाला तब्बल ९१५.५९ कोटी रुपये देणगी स्वरुपात मिळाली आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या देणग्यांची रक्कम दुसरा महत्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या देणग्यांच्या तब्बल १६ पट असल्याचं समोर आलं आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सनं ही आकडेवारी प्रसिद्ध केली.
6 वर्षांपूर्वी -
अर्थसंकल्पानंतर २ दिवसात गुंतवणूकदारांचे शेअर बाजारात ५ लाख कोटी बुडाले
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा अर्थसंकल्प मांडण्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत मांडल्यापासून शेअर बाजारात मोठी पडझड सूर आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे. अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात दोन दिवसांपासून मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांचे तब्बल ५ लाख कोटी रुपये पाण्यात बुडाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार अत्यंत चिंतेत असल्याचं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
पेट्रोल ९, तर डिझेलचे दर ४ रुपयांनी वाढण्याची शक्यता; पुन्हा महागाईचा भडका उडणार?
काल संसदेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रुपयांनी वाढ करण्याचे स्पष्ट केले आहे. परंतु त्यामुळे इतर देखील दुष्परिणाम सामान्य माणसाच्या आयुष्यावर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कारण संबंधित निर्णयामुळे आगामी काळात पेट्रोलचे दर ९ रुपये तर डिझेलचे दर ४ रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. असं असला तरी ही वाढ टप्प्याटप्प्याने केली जाईल असं म्हटलं जातं आहे.
6 वर्षांपूर्वी -
केंद्रीय अर्थसंकल्प २०१९: काय महाग आणि काय स्वस्त?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला. दरम्यान या अर्थसंकल्पातून शेतकरी तसेच मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देणाऱ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक सामान्यांशी निगडित असलेला विषय म्हणजे घर खरेदीसाठी मिळत असलेली २ लाखांची सूट ३.५ लाखांवर आणण्यात आली असून, एकूण ४५ लाख रुपयांपर्यंत घर खरेदी करणाऱ्यांना त्याचा थेट फायदा मिळणार आहे. मात्र पेट्रोल आणि डिझेलचे भाव १ रुपयानं वाढणार असून, त्याचा वाहन चालकांना फटका बसणार हे निश्चित झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
ब्रिफकेस गेली, कारण अर्थसंकल्पाला आपण 'चोपड्या' म्हणतो: कृष्णमूर्ती सुब्रमणियन
अर्थमंत्री निर्मला सीतारामन थोड्याच वेळात संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकार-२ च्या पहिला अर्थसंकल्पात सामन्यांसाठी आणि उद्योगांसाठी नेमकं काय असणार आहे याकडे संपूर्ण देशाचं लक्ष केंद्रित झालं आहे. त्यात भर म्हणजे अर्थमंत्री म्हणून हा निर्मला सीतारामन यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून त्या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत. पुढील आर्थिक वर्षात देशाचा GDP ७ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज देखील काल आर्थिक पाहणी अहवाल सादर करताना सीतारामन यांनी व्यक्त केला.
6 वर्षांपूर्वी