महत्वाच्या बातम्या
-
पंतप्रधान पदानंतरचं गृह खातं अमित शहांकडे; तर राजनाथ सिंह संरक्षण मंत्री
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि नव्या मंत्रिमंडळाने शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच बहाल करण्यात आले आहे. शिवसेनेच्या वाट्याला नेहमीप्रमाणेच अवजड उद्योग खात्याचे मंत्रिपद आले असून रावसाहेब दानवे यांना ग्राहक संरक्षण खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
शपथविधी दिवशीच दिल्ली भाजपाची वेबसाईट हॅक, बीफ डिशची पोस्ट
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या बहुमतानंतर मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यात एकूण २४ कॅबिनेट मंत्री, ९ स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान एकीकडे राष्ट्रपती भवनात शपथविधीचा शाही कार्यक्रम सुरु असताना दुसऱ्याबाजूला दिल्ली भारतीय जनता पक्षाची वेबसाईट हॅक करण्यात आली होती. यावेळी हॅकर्सनी वेबसाईटच्या होमपेजवर गोमांस म्हणजेच बीफ रेसिपी पोस्ट केली. या रेसिपीसोबत Hacked by ‘Shadow_V1P3R’ असा मेसेजही लिहिण्यात आला होता.
6 वर्षांपूर्वी -
कोचिंग क्लासेसचे मालक व विनोद तावडेंमध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण: राष्ट्रवादीचा आरोप
खाजगी कोचिंग क्लासेसचे मालक आणि राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यामध्ये मोठया प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याने खाजगी शिकवणीबाबतचा मसुदा तयार असून देखील तो मंत्रालयात केवळ धूळखात पडून असल्याचा थेट आरोप एनसीपीचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केला आहे. तसेस याकडे शिक्षणमंत्री विनोद तावडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून खाजगी शिकवणी मसुद्याला तात्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी देखील अनिल देशमुख यांनी केली.
6 वर्षांपूर्वी -
मोदींचा चमत्कारी विजय ही भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत चिंतेची बाब: द वॉशिंग्टन पोस्ट
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात मोदी लाट नसताना देखील प्रत्यक्षात मोदी त्सुनामी आली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मोदींच्या या यशानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं तसेच लोकांमध्ये सुद्धा आता २-३ दिवसानंतर वेगळीच चर्चा चौकाचौकात रंगल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने या संदर्भात एक लेख प्रसिद्ध केला आहे. भारतासारख्या विशाल लोकशाहीत मोदींचा आश्चर्यकारक विजय अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारताने पुरवलेल्या ‘EVM’वर बोत्स्वाना देशात संशय; थेट निवडणूक आयोगाला कोर्टात हजेरीचे आदेश होते
देशभरातील लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि देशभरात मोदी त्सुनामी आल्याचे दिसले. त्यात अनेकांनी या निकालावर आश्चर्य व्यक्त करत वेगळीच शंका व्यक्त केली होती. दरम्यान अनेकांनी देशात मोदी लाट नक्कीच नव्हती असं जाहीर पणे म्हटलं आणि अनेक भाजप नेत्यांनी देखील ते पडद्याआड मान्य केलं. विशेष म्हणजे मुस्लिम बहुबल भागात देखील भाजपच्या उमेदवारांना भरभरून मतं पडल्याने त्यात शंका अधिक दुणावल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
'PM नरेंद्र मोदी' सिनेमाकडे भक्तांसहित प्रेक्षकांची पाठ; कार्टून सिनेमाची कमाई पण अधिक
भारताच्या राजकीय इतिहासात बहुमताने निवडून येणारे मोदींना त्याच्या जीवनपटावर आधारित सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक अल्पमतात देखील हजेरी लावताना दिसत नाही. देशाची सत्ता पुन्हा एकदा मिळवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्रपटाकडं सिनेरसिकांनी अक्षरशः पाठ फिरवल्याचे चित्र आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटानं केवळ २.२५ ते २.५० कोटींची कमाई केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
जीएसटी'मुळे मलेशिया, कॅनडा, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये सरकार पराभूत, तर भारतात?
जगात जीएसटी म्हणजे ‘वस्तू आणि सेवा कर’ लागू करणाऱ्या सरकारचे दारुण पराभव झाले आहेत. मात्र आपल्या देशात नेमकं त्याच्या विरुद्ध होताना दिसत आहे. स्वतः उद्योगधंदे करणाऱ्या राज्याच्या जनतेचे म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री असताना सुरुवातील नरेंद्र मोदी यांनी जीएसटी’ला प्रचंड विरोध केला होता आणि तेव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. मात्र सत्तेत येताच विरोध करणाऱ्या नरेंद्र मोदींनी भारतात जीएसटी लागू केल्याचे सर्वश्रुत आहे.
6 वर्षांपूर्वी -
मतदान झालं राष्ट्रवाद व धर्मावर; आता बेरोजगारी व महागाईवर तरुणांचा व सामान्यांचा वाली कोणीच नसेल?
काळाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकाल राष्ट्रवाद आणि धर्म हेच आपल्या देशातील मुख्य आणि महत्वाचे प्रश्न असल्याचं अधोरेखित केलं आहे. त्यामुळे यापुढे सामान्यांशी आणि प्रत्येक घराशी निगडित असणारे महागाई आणि रोजगार सारखे अत्यंत महत्वाचे प्रश्न आता निडणूकीचे विषय राहिले नाहीत हे सत्य आहे. कारण मागील ५ वर्ष महागाईने होरपळणाऱ्या सामान्यांनी आणि बेरोजगारांनी स्वतः सरकारला भासगोस मतदान करून, सरकारला आम्ही बेरोजगार आणि महागाईने होरपळून मेलो तरी चालेल, परंतु धर्म आणि राष्ट्रवाद महत्वाचा आहे संदेश दिला आहे. त्यामुळे आता त्याच विषयावर आधारित खाद्य सामान्यांना सरकार देत राहील.
6 वर्षांपूर्वी -
आरआयसॅट-२बी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
आज सकाळी पहाटे ५.३० वाजता आरआयसॅट-२बी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. त्याच्या उड्डाणाची पंचवीस तासांची उलटगिणती मंगळवारी पहाटे ४.३० वाजता सुरू झाली होती. दरम्यान सदर उपग्रह सर्व प्रकारच्या हवामानात रडार इमेजिंगद्वारे निगराणी करणारा आहे. पीएसएलव्ही-सी४६ ची ही ४८वी मोहीम असून, सतीश धवन अंतराळ केंद्रातून हा ६१५ किलोग्रॅम वजनाचा उपग्रह प्रक्षेपण केल्यानंतर १५व्या मिनिटाला पृथ्वीच्या कक्षेत सोडला गेला.
6 वर्षांपूर्वी -
'एक्झिट पोल'खेळ: झटपट शेअर मार्केट नफा; पण निकाल वेगळेच असतील आणि ही आहे रणनीती
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी एवघा केवळ दिवस शिल्लक आहे. लोकसभेसाठी शेवटच्या म्हणजे ७व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आणि देशभरातील टीव्ही वृत्त वाहिन्यांनी एकप्रकारे पैसे घेऊन ‘एक्झिट पोल’खेळ केल्याचं अनेक तज्ज्ञांशी संपर्क साधल्यावर समोर येत आहे. कारण यामागे देखील ४-५ दिवसात शेअर बाजारातून मोठा नफा कमावून स्वतःच भांडवली मूल्य वाढवणे, इंट्रा-डे शेअर खरेदी विक्रीतून ४-५ दिवस बक्कळ नफा कमावणे आणि एक कोणालाही न समजणारी राजकीय गणितं आखणे असं सिद्ध होतं आहे. कारण मुळात देशात मोदी लाट नसताना देखील जे चित्र अचानक एका दिवसात उभं केलं गेलं आहे त्यामागे देखील मोठं षडयंत्र आहे, ज्यामध्ये विरोधक अडकल्याचे दिसत आहे. कारण निकाल देखील ‘एक्झिट पोल’खेळच्या वेगळेच लागणार आहेत हे दुसरं सत्य आहे.
6 वर्षांपूर्वी -
निवडणुका संपताच भक्तांसकट सगळ्यांनाच टोप्या लावून ‘नमो टीव्ही’ गायब
लोकसभा निवडणुका संपताच सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेला ‘नमो टीव्ही’ हे चॅनल दूरचित्रवाणीवरुन अचानक गायब झालं आहे. ‘नमो टीव्ही’वरून केवळ भारतीय जनता पक्षाशी संबंधित कार्यक्रम प्रसारित केले जात होते. या चॅनलला भारतीय जनता पक्षाकडून निधी पुरवठा होत असल्याचा आरोप अनेकांनी केला होता. परंतु, लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबताच या चॅनचलं प्रसारण देखील लगेच बंद झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या असून, केवळ लोकसभा निवडणुकीत राजकीय फायदा आणि स्वतःचे मार्केटिंग करण्यासाठी तो सुरु करण्यात आल्याच्या संशयाला जागा आहे.
6 वर्षांपूर्वी -
ऑस्ट्रेलियात संसदीय निवडणुकीत प्रत्यक्ष निकाल एक्झिट पोलच्या विरुद्ध लागले
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर रविवारी सर्वच टीव्ही वृत्त वाहिन्यांवर प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजांनी काँग्रेससहित सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये चलबिचल पाहायला मिळाली. देशभरातील जवळपास सर्वच एक्झिट पोलमधून पुन्हा भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच सत्तेत विराजमान होणार असे संकेत देण्यात आले.
6 वर्षांपूर्वी -
एक्झिट पोलच्या अंदाजानंतर शेअर बाजार उसळला
लोकसभा निवडणुकांचे एक्झिट पोल काल सर्वच वृत्तवाहिन्यांनी जाहीर केल्यानंतर आज शेअर बाजाराने मोठी उसळी मारल्याचे समजते. आज सकाळी शेअर बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात सेन्सेक्स तब्बल ९०० अंकांनी वधारला. तर निफ्टी देखील ११,६४८ अंकांवर पोहोचला. यासह रूपया देखील ७३ पैशांनी मजबूत झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत ग्रीन कार्ड ऐवजी बिल्ड अमेरिका व्हिसा
अमेरिकेत मागील अनेक वर्ष विदेशी नागरिकांच्या अमेरिकेतील कायम वास्तव्यासाठी ग्रीन कार्ड दिले जात होते. मात्र आता ती पद्धत बंद करण्यात येणार असून त्याऐवजी ‘बिल्ड अमेरिका व्हिसा’ पद्धत लागू करण्याचे तेथील ट्रम्प प्रशासनाने निश्चित केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, जगातील कोणत्याही माणसाला अमेरिकेत येण्यास बंदी नसेल. तुम्ही कोणत्याही देशात जन्मलेले असा तुमच्याशी कसलाही भेदभाव न करता तुम्हाला अमेरिकेत कायम स्वरूपी राहण्यासाठी ही नवीन व्हिसा पद्धत सुरू केली जाणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
चुनावी जुमला! मतदान जवळपास संपण्याआधी शेतकऱ्यांच्या खात्यातील २,००० रुपये परत घेतले?
लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून केवळ ७व्या टप्प्याचे मतदान उरले आहे. मात्र त्यानंतर हळुवारपणे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात आलेले २,००० रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यातून काढून घेण्यात आल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडू लागले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संताप पसरला आहे.
6 वर्षांपूर्वी -
हुवेई कंपनी विरोधात? सायबर हल्ल्याची भीतीने ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेत आणीबाणी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषीत केली आहे. परकीय शत्रूंपासून अमेरिकेच्या कॉम्प्युटर नेटवर्क्सना वाचवण्यासाठी ट्रम्प यांनी हे तडकाफडकी पाऊल उचललं आहे. यामुळे अमेरिकेच्या स्थानिक कंपन्यांना राष्ट्रीय सुरक्षेत अडचणी आणणाऱ्या परदेशी टेलिकॉम कंपन्यांची सेवा वापरने शक्य होणार नाही. ट्रम्प यांनी याबद्दलच्या आदेशावर स्वाक्षरी केल्याची अधिकृत माहिती व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव सारा सँडर्स यांनी दिली.
6 वर्षांपूर्वी -
माझी एकच जात आहे ती म्हणजे 'गरिबी' : नरेंद्र मोदी
मी कधी सुद्धा देशातील गरिबांचे पैसे लुटण्याचं पाप केलं नाही, आमच्यासाठी गरिबांचे रक्षण करणं हेच संपूर्ण जीवन आहे. जे दुख गरीब सहन करतात ते दुखं मी स्वत: सहन केलं आहे. मी गरिबांचे दुखं दूर करण्यासाठी जगतो. माझी फक्त एक जात आहे आणि ती म्हणजे गरिबी. त्यामुळे या गरिबीपासून मुक्त होण्याचा संकल्प आपल्याला यशस्वी करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
6 वर्षांपूर्वी -
राधाकृष्ण विखेंच्या विविध संस्थांमधील घोटाळ्याप्रकरणी भावाचे उपोषण?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सध्या भाजपच्या वाटेवर असलेले राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विरोधात त्यांचे ज्येष्ठ बंधू डॉ. अशोक विखे हे उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान, विखे-पाटील कुटुंबियांच्या अधिपत्याखालील विविध संस्थांमधील अनेक प्रकरणांच्या चौकशीची मागणी डॉ. अशोक विखे यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन पाठवून येत्या २० मे रोजी लोणी प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पुतळ्यासमोर उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
व्हिडिओकॉन बँक कर्ज घोटाळा: ईडीकडून चंदा कोचर यांची ८ तास कसून चौकशी
बँक कर्ज घोटाळा प्रकरणी आयसीआयसीआयच्या बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची सोमवारी तब्बल ८ तासांहून अधिक काळ अंमलबजावणी संचालनालयाने कसून चौकशी केली. त्याच्याविरोधातील बँक कर्जघोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ते ईडीसमोर उपस्थित झाले होते. सकाळी ११ वाजता चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झालेल्या कोचर दाम्पत्यांनी सुटका रात्री ८च्या सुमारास करण्यात आली.
6 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत चीनी वस्तूंवर तब्बल २५% कर आकारला जाणार
अमेरिकेशी चीनची चर्चा फिस्कटली असून अमेरिका आणि चीनमधील व्यापारी युद्ध आता अधिकच विकोपाला जाण्याची शक्यता आहे. व्यापार व्यवहार वाचविण्यासाठी झालेल्या अंतिम बैठकीदरम्यान अमेरिकेने २०० अब्ज डॉलरच्या चीनी उत्पादनांवरील आयात कर १० टक्क्यांनी वाढवून तो तब्बल २५ टक्के इतका वाढवला आहे. त्यामुळे आता चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के आयातकर आकारला जाणार आहे. मात्र चीननेदेखील यावर योग्य ती कारवाई केली जाईल अशी थेट धमकी ट्रम्प प्रशासनाला दिली आहे.
6 वर्षांपूर्वी