महत्वाच्या बातम्या
-
देशात दुफळी निर्माण करणारे मोदी भारतातील प्रमुख नेते; टाइम’च्या कव्हरस्टोरीत मोदींबद्दल उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकले आहेत. परंतु यावेळी नरेंद्र मोदींचा मुखपृष्ठावरील फोटो हा सकारात्मक लेखासंदर्भात नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘टाइम’ने थेट दुफळी निर्माण करणारा भारतातील प्रमुख नेता असा केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी हिंदुत्वावर आधारित राजकारण करत असल्याने देशात ध्रुवीकरण झाल्याचा आरोप मोदींसंदर्भात लेख लिहिणाऱ्या आतिश तासीर यांनी प्रसिद्ध केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
नौदलाच्या गणवेशाचा जाहीर लिलाव करून वर्दीचा अपमान करणारा अक्षय मोदींना माहित आहे का?
माजी पंतप्रधान राजीव गांधींनी आयएनएस विराटचा वापर टॅक्सीसारखा केला, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानामुळे भाजपा-काँग्रेसमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे. राजीव गांधींनी सुट्टीसाठी आयएनएस विराटचा वापर केला, असा दावा मोदींनी केला होता. वास्तविक हे जर त्यांना आधीच माहित होतं आणि त्यांना भारतीय नौदलाबद्दल नितांत आत्मीयता होती तर मोदींनी नौदलाच्या गणवेशाचा जाहीर लिलाव करून त्यांच्या भावनांचा अपमान करणाऱ्या अभिनेता अक्षय कुमारला INS सुमित्रावर रॉयल ट्रीटमेंट का दिली होती असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे. वास्तविक अगदी नुकत्याच आलेल्या ‘फणी’ वादळामुळे देशातील अनेक राज्यात मोठी हानी झाली होती. त्याचा फटका अनेक राज्यांना बसला होता. मात्र भाजप किंवा भाजपच्या सहकाऱ्यांशी पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यांना मदत करून त्याने समाजसेवेचा नवा पायंडा पाडला. तसा तो भाजपचा अघोषित ब्रँड अँबेसिडर आहे हे लपून राहिलेलं नाही. त्यामुळे अक्षय कुमार जे करेल ते अंतिम सत्य आणि खरी देशभक्ती असाच भाजप प्रेमींचा समज.
6 वर्षांपूर्वी -
'फिंच' या दुर्मिळ पक्षांसाठी ऑस्ट्रेलियात अदाणींच्या खाण उद्योगाला स्थगिती, पण भारतात?
परदेशात नागरिक निसर्गाप्रती तसेच पशुपक्षांप्रती किती जागृत आहेत यांचं अजून एक उदाहरण समोर आलं आहे. कारण भारतातील मोठे उद्योगपती तसेच मोदींचे मित्र गौतम अदानी यांना ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड सरकारने चांगलाच झटका दिला आहे. क्वीन्सलँडच्या स्थानिक सरकारने देशातील दुर्मिळ सफेद गळ्याच्या फिंच पक्षांच्या संरक्षणासाठी अदाणींच्या अब्जावदीच्या प्रकल्पाला स्थगिती दिली आहे. तसेच तेथील स्थानिक नागरिक देखील अडणींच्या या खाण प्रकल्पाविरुद्ध रस्त्यावर उतरत आहेत आणि त्यामुळे सरकारवर देखील प्रचंड दबाव वाढला होता.
6 वर्षांपूर्वी -
लँडिंग दरम्यान बोइंग ७३७ विमान फ्लोरिडाच्या नदीत कोसळलं, कोणतीही जीवितहानी नाही
फ्लोरिडामधील जॅक्सनविलेच्या सेंट जॉन नदीत शुक्रवारी बोइंग ७३७ प्रवासी विमान कोसळलं. नेव्हल एअर स्टेशन जेक्सनविलेच्या एका प्रवक्त्यानं सांगितलं की, विमान लँडिंग करत असताना ही दुर्घटना घडली आहे. विमान नदीत कोसळलं, त्यादरम्यान विमानातून १३६ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.
6 वर्षांपूर्वी -
आज सात राज्यांमधील प्रचाराच्या तोफा थंडावणार
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज शनिवारी संध्याकाळी थंडावणार आहेत. ६ मे रोजी युपी, राजस्थान, जम्मू-काश्मीर, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड या ६ प्रमुख राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ७ राज्यांमधील ५१ मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. दरम्यान यामध्ये उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या अमेठी आणि रायबरेली मतदारसंघांचा समावेश आहे.
6 वर्षांपूर्वी -
सर्जिकल स्ट्राईक भारतीय लष्करानं केला, मोदींनी नव्हे: राहुल गांधी
वायुदलाने केलेला सर्जिकल स्टाईक, नोटाबंदी, राफेल घोटाळ्यावरुन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला नसून तो भारतीय लष्करानं केलं आहे. नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राईक आपल्या सरकारनं केल्याचं सांगत लष्कराचा अपमान करत आहेत, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.
6 वर्षांपूर्वी -
बेरोजगारीचा दर वाढून ८.४ टक्क्यांवर, देश भविष्यात बेरोजगारांची भूमी होतो कि काय?
एप्रिलमध्ये देशातील बेरोजगारीचा दर पूर्वीपेक्षा वाढून ८.४ टक्क्यांवर गेला आहे. ऑक्टोबर २०१६ नंतरचा हा सर्वोच्च बेरोजगारी दर ठरला आहे. मार्चमध्ये बरोजगारीचा दर ६.७ टक्के होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
6 वर्षांपूर्वी -
तेलंगणा: मोदींविरोधात मैदानात उतरलेल्या २४ शेतकऱ्यांचा उमेदवारी अर्ज बाद
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीमधून निवडणूक लढण्यासाठी मैदानात उतरलेल्या तेलंगणाच्या तब्बल २४ शेतकऱ्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. निवडणूक आयोगाने एका शेतकऱ्याचा अर्ज स्विकारला आहे. आयोगाने ज्या एकमेव शेतकऱ्याचा अर्ज स्विकारला आहे त्यांचं नाव इस्तारी सुन्नम नरसईया असं आहे.
6 वर्षांपूर्वी -
‘फनी’ चक्रीवादळ ओडिशा किनाऱ्यावर थडकलं! लाखोंचे स्थलांतर
सर्वाधिक घातक असे ‘फनी’ चक्रीवादळ आज सकाळी नऊच्या सुमारास ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार ताशी १७५ किलोमीटरच्या वेगाने ‘फनी’ चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले असून अकरा नंतर फनीचा वेग कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ओडिशासह आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांना ‘फनी’चा फटका बसण्याचा अंदाज आहे. गृहमंत्रालयाकडून १९३८ हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. पुरी आणि भुवनेश्वरमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे.
6 वर्षांपूर्वी -
अमरिकेचे परराष्ट्र सेक्रेटरी पॉम्पीओ यांच्या मसूद अझहर विषयक ट्विटने मोदी तोंडघशी
अमेरिकेचे विद्यमान परराष्ट्रमंत्री आणि अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएचे माजी अध्यक्ष माईक पॉम्पीओ यांनी मसूद अझहर विषयक एक ट्विट केल्याने नरेंद्र मोदी तोंडघशी पडल्याची चर्चा रंगली आहे. भारतात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आणि विशेष करून मोदी ‘जैश ए मोहम्मद’चा प्रमुख मसूद अझहर याला आमच्या प्रयत्नाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीने आंतरराष्ट्रीय दहशदवादी घोषित केल्याच्या बाता मारून, प्रचारात स्वतःची पाट थोपटून घेत असल्याचे काल पासून पाहायला मिळत आहे.
6 वर्षांपूर्वी -
संतापजनक: कर्जमाफीमुळे शेतकरी सुस्तावतात; भाजप हरियाणाचे मुख्यमंत्री
एखाद्याला मोफत देण्याची सवय लावली, की मग ती व्यक्ती आळशी होते, अशा शब्दांत त्यांनी कर्ममाफीवर भाष्य केलं. ‘हरियाणातल्या शेतकरी समुदायाला त्यांच्या पुढील आर्थिक संकटं संपवायची आहे. एकदा लोकांना फुकटात काही मिळायची सवय लागल्यावर ते सुस्तावतात. ते इथून तिथून कर्ज घेऊ लागतात. ते आर्थिक नियोजन करत नाहीत. या प्रकारची योजना अनेक राज्यांमध्ये यशस्वी होऊ शकते. कारण तिथली परिस्थिती तशी आहे. परंतु हरियाणात ही योजना यशस्वी होऊ शकत नाही,’ असं खट्टर म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
भाजपानं २२०-२३० जागा जिंकल्यास मोदी पंतप्रधान होणार नाहीत: सुब्रमण्यम स्वामी
भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात एक मोठं भाकीत केलं आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत २२०-२३० जागा जिंकल्यास नरेंद्र मोदी कदाचित पुढचे पंतप्रधान होणार नाहीत, असं सूचक विधान भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर सध्याचं भाजपच्या नैत्रुत्वतही बदल केले जातील, असा थेट दावाही स्वामींनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडून मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित
भारतातील अनेक महत्वाच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या तसेच कुख्यात दहशदवादी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात भारताच्या कुटनितीला यश आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (UNSC) बुधवारी (दि.१) मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. भारताचा हा मोठा विजय मानला जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज्यात निवडणूक संपताच भाजप-सेना सरकारकडून घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ
लोकसभा निवडणुकीदरम्यान सामान्य व्यक्तीला सरकारनं जोराचा धक्का दिला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. घरगुती एलपीजी सबसिडी असलेल्या सिलिंडर गॅसची किंमत ६ रुपयांनी वाढवण्यात आली आहे. तर सबसिडी नसलेल्या सिलिंडरच्या किमतीत २२.५ रुपयांची वाढ झाली आहे, असं वृत्त द हिंदू बिझनेस लाइननं प्रसिद्ध केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
राफेलची सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्याची केंद्राची विनंती; लोकसभा निवडणुकांमुळे?
सुप्रीम कोर्टाने राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहाराबाबत १४ डिसेंबर २०१८ रोजी दिलेल्या निर्णयाच्या फेरविचाराची मागणी करणाऱ्या याचिकांची सुनावणी आज होणार आहे. परंतु ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केंद्र सरकारने केली आहे. याबाबतचे पत्र संबंधित पक्षकारांनाही देण्याची परवानगी न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला दिली. परंतु सुनावणी पुढे ढकलण्याबाबत न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नाही.
6 वर्षांपूर्वी -
राज यांचा दावा सत्यात तर भाजप तोंडघशी, देशात बेरोजगारी २ वर्षांच्या उच्चांकावर: CMIE अहवाल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारची अनेक गुपित भर सभेत उघड केली होती. त्यातील सर्वात महत्वाचा दावा म्हणजे नोटबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर प्रचंड प्रमाणात वाढलेली बेरोजगारी आणि बंद पडलेले उदयोग. दरम्यान, काल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी हा दावा खोटा असल्याचं म्हणत नोटबंदीच समर्थन करताना त्याचे कोणतेही दुष्परिणाम झाले नसल्याचं म्हटलं होतं. मात्र सीएमआयई अर्थात सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’द्वारे अधिकृतरीत्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आकडेवारीवरून राज ठाकरे सत्यात उतरले आहेत तर आशिष शेलार आणि संपूर्ण भाजप तोंडघशी पडली आहे.
6 वर्षांपूर्वी -
तब्बल सहा तासांच्या खोळंब्यानंतर एअर इंडियाचा सर्व्हर सुरु
एअर इंडियाचे तांत्रिक बाबी सांभाळणारे ‘सिता सर्व्हर’ डाऊन झाल्याने देशभरातील विमानसेवा विस्कळीत झाली होती. तब्बल सहा तासांच्या खोळंब्यानंतर एअर इंडियाचा सर्व्हर सुरु झाला आहे. त्यामुळे विमानतळांवर अडकून राहिलेल्या प्रवाशांनी अखेर निश्वास सोडला आहे.
6 वर्षांपूर्वी -
चलनात २५ पैशांचं नाणंच नाही, मग मोदींच्या आई आजही त्यांना सव्वा रुपया देतात कुठून?
नरेंद्र मोदी यांची अभिनेता अक्षय कुमारने अराजकीय मुलाखत घेतली खरी, मात्र ती मुलाखत फिल्मी असल्याचं आता समोर येतं आहे आणि त्याला तास ठोस पुरवा देखील मिळत आहे आणि तो देखील मोदींच्याच तोंडून असं म्हणावं लागेल. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अक्षय कुमारने घेतलेली मुलाखत सध्या चांगलीच गाजतेय. अनेकांनी या मुलाखतीवर टीका केली तर अनेक जण मोदींची स्तुती करण्यात व्यस्त आहेत. या मुलाखतीत मोदींच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक बाबी समोर आल्या आहेत. नरेंद्र मोदींनी आपल्या आईविषयी देखील अनेक गोष्टी या मुलाखतीत सांगितल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मी मतदान केलं, पण VVPAT ची पावती दुसऱ्याच उमेदवाराच्या नावाची: आसामचे माजी डीजीपी
काल देशभरात एकूण ११७ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र अनेक ठिकाणी EVM मशीनमध्ये बिघाड झाल्याचे पाहायला मिळाले. २०१४ पासून मोदी सरकारच्या निवडणुकीतील यशामागे ईव्हीएम’मधील छेडछाड देखील एक मुख्य कारण असल्याचा आरोप देखील विरोधकांनी नेहमीच केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
श्रीलंकेतील कोलंबोमध्ये ८ बॉम्बस्फोट, २०७ जणांचा मृत्यू
श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये तब्बल ८ ठिकाणी एकामागे एक साखळी बॉम्बस्फोट झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यातील ३ बॉम्बस्फोट हे चर्चमध्ये तर 3 बॉम्बस्फोट हे हॉटेलमध्ये झाल्याची माहिती मिळाली होती. परंतु, त्यानंतर आता आणखी २ बॉम्बस्फोट करण्यात आले आहेत. ७व्या बॉम्बस्फोटात २ जणांचा मृत्यू झाला आहे तर ८व्या बॉम्बस्फोटात ३ जणांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी ७ जणांना अटक केल्याची माहिती मिळत आहे.
6 वर्षांपूर्वी