महत्वाच्या बातम्या
-
जेट एअरवेज आणि एअर इंडिया खरेदीत रिलायन्सला रस
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने जेट एअरवेज आणि एअर इंडिया या २ बड्या नागरी विमान वाहतूक कंपन्या स्वतःच्या ताब्यात घेण्यात रस दाखविला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान, आर्थिक संकटात असलेली जेट एअरवेज बुधवारी बंद पडली असून, सरकारी मालकीची एअर इंडियाही अखेरच्या घटका मोजत आहे. दोन्ही कंपन्यांचा मिळून भारतीय हवाई उड्डाण क्षेत्रात एकूण २५ टक्के बाजार हिस्सा आहे.
6 वर्षांपूर्वी -
एमपी, राजस्थान व गुजरातमध्ये पावसाने ३५ जणांचा बळी, मोदींच केवळ गुजरातसाठी मदतीचं ट्विट
मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. सलग दोन दिवस म्हणजे सोमवारी आणि मंगळवारी सुसाट वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. देशभरात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि वीज कोसळून आतापर्यंत तब्बल ३५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमध्ये पावसामुळे एकूण १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर राजस्थान आणि गुजरातमध्ये देखील काही लोकांचा मृत्यू झाला आहे. अवकाळी पावसामुळे तिन्ही राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
6 वर्षांपूर्वी -
तब्बल ३६ उद्योगपती देशातून फरार झाले आहेत; ईडीची न्यायालयात माहिती
फौजदारी गुन्हे दाखल असलेले तब्बल ३६ उद्योगपती ज्याप्रमाणे देशातून पळून गेले आहेत, त्यामुळे ऑगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात अटक करण्यात आलेला संरक्षण क्षेत्रातील दलाल सुशेन मोहन गुप्ता देखील पळून जाण्याची शक्यता व्यक्त करत सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने सोमवारी त्याच्या जामीन अर्जाला विरोध केला. त्यामुळे केवळ विजय मल्या आणि नीरव मोदीच नव्हे, तर अलीकडच्या काळात तब्बल ३६ उद्योगपती देशातून पळून गेले असल्याची माहिती ईडीने सोमवारी विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांच्या न्यायालयाला दिली.
6 वर्षांपूर्वी -
तेव्हा राज ठाकरे आठवतील? मराठी युवकांच्या रोजगाराचा व मुंबईचा स्मार्ट गेम 'गिफ्ट'मार्गे होणार?
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांनी वातावरण ढवळून निघालं आहे. त्यात रोजगारासारखे महत्वाचे मुद्दे मोदींच्या भाषणातून लुप्त झाले आहेत आणि त्याची जागा हिंदुत्व आणि भारतीय लष्कराच्या शौर्याने घेतली आहे. देशात २ कोटी रोजगार निर्माण करण्याचं आमिष देशातील तरुणांना दाखवत प्रत्यक्षात ५ कोटीच्यावर तरुण देशभरात बेरोजगार केले गेले. केंद्र सरकारला त्याचं काहीच सोयर सुतक नाही अशीच एकूण परिस्थिती आहे. समाज माध्यमाच्या विकृतीतून अनेक तरुणांचे मेंदू धर्म आणि भारतीय लष्कराच्या शौर्याभोवती असे काही गोंगावात ठेवले आहेत की त्या ‘फेसबुक’ वरील फ्री नेटपॅकने आपल्याला कधीच बेरोजगार केलं आहे याची कल्पना देखील तरुणांना राहिलेली नाही.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: संरक्षण करार, अनिल अंबानी रशियाच्या दौऱ्यात देखील मोदींसोबत होते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रांसच्या कंपनीसोबत राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याची घोषणा केली. कालांतराने अनिल अंबानी आणि राफेल करारावरून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर आले. सुरक्षाविषयक महागड्या सौद्यांमध्ये केवळ फ्रान्स नसून रशियासोबत देखील एस-४०० मिसाईल डिफेन्स यंत्रणेसाठी तब्बल ४०,००० कोटींचा करारवर ऑक्टोबर २०१८ मध्ये अधिकृतपणे स्वाक्षऱ्या झाल्या जेव्हा रशियाचे पंतप्रधान २ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. मात्र तत्पूर्वी २४ डिसेंबर २०१५ मध्ये रशियाच्या दौऱ्यावर गेले होते आणि विशेष म्हणजे त्यात देखील अनिल अंबानी यांचा समावेश होता. त्यात भर म्हणजे रशियन प्रसार माध्यमांच्या केंद्रस्थानी देखील अनिल अंबानींचा होते हे स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि काही अंतरावर स्वतः नरेंद्र मोदी देखील उपस्थित विराजमान असल्याचे दिसत होते. तसेच काही दिवसांपूर्वी अनिल अंबानी यांनी देखील राफेल सौंदयापूर्वी फ्रान्सचा दौरा केल्याच्या बातम्या फ्रान्समधील प्रसार माध्यमांनी दिल्या होत्या.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: हे काय? मोदींच्या हेलिकॉप्टरमधून बॉक्स उतरवून ते पटापट इनोव्हामध्ये लोड केले?
काँग्रेस पक्षाने एक व्हिडिओ सार्वजनिक करून मोदींना कोंडीत पकडून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कर्नाटकातील सभेसाठी मोदी एका हेलिपॅडवर उतरले आणि त्याच दरम्यान काही घडलेला घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद झाल्याने खळबळ माजली आहे. त्यानुसार मोदींच हेलिकॉप्टर जमिनीवर उतरताच काही क्षणात एक मोठा बॉक्स उतरविण्यात आला आणि तो काही जणांनी धावत पळत एका जवळच उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हामध्ये लोड करण्यात आला.
6 वर्षांपूर्वी -
मोदींकडून १० एप्रिल २०१५ ला राफेल कराराची घोषणा, मग ६ महिन्यांत अंबानींच्या कंपनीला करमाफी
फ्रान्सकडून एकूण ३६ राफेल लढाऊ विमाने घेण्याचा सौदा भारत व फ्रान्स यांच्यात होत असतानाच दुसऱ्या बाजूला अनिल अंबानी यांच्या फ्रान्समध्ये व्यवसाय करणाऱ्या एका कंपनीस तेथील सरकारने सुमारे १,२६० कोटी रुपयांचा (१४३ दशलक्ष युरो) कर माफ केल्याचे वृत्त ‘ल मॉन्द’ या अग्रगण्य फ्रेंच वृत्तपत्राने दिल्यानंतर भारतात आधीपासून सुरु असलेल्या राफेल वादास शनिवारी नवी उकळी फुटली.
6 वर्षांपूर्वी -
भाजप चक्रव्यूहात? पक्षाला देणगी देणार्या प्रत्येकाची नावे सांगा: सर्वोच्य न्यायालय
सुप्रीम कोर्टाने ‘निवडणूक रोखे’ प्रकरणात दिलेल्या अंतरिम आदेशाने भारतीय जनता पक्षाला अक्षरश: घाम फुटला आहे. या रोख्यांद्वारे भारतीय जनता पक्षाने देणग्या मिळवून सर्वाधिक रक्कम पक्षाच्या तिजोरीत भरली आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने देणगी देणार्या प्रत्येकाच्या नावाची यादी तयार करून ती यादी मुख्य निवडणूक आयोगाला सादर करण्यास सांगितले आहे.
6 वर्षांपूर्वी -
सेनेकडून मुंबईकरांना टोप्या; ५०० चौरस फुटांचा कर माफ केल्याची घोषणा फसवी
शहरात ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा शिवसेनेने केली. त्यानंतर युतीसाठी शिवसेना राजी व्हावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०० चौरस फुटांचा कर माफ केल्याचे जाहीर केले. त्यानंतर शिवसेनेने आम्ही दिलेले वचन पाळतो, असे सांगत हा मालमत्ता कर माफ झाल्याचे सांगितले. परंतु ती निवडणुकीसाठीची फसवी घोषणा असल्याचे समोर आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर चीनच्या दुप्पट, आकडा १३६ कोटींवर
भारताच्या लोकसंख्येत वाढ झाली असून ती १३६ कोटींवर पोहोचली आहे. दरम्यान, २०१० ते २०१९ या दहा वर्षाच्या काळात १.२ टक्के वार्षिक दराने ही वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चीनच्या वार्षिक लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा ही वाढ निम्म्याने जास्त आहे. संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
स्मृती इराणी ग्रॅज्युएट नाहीत; निवडणूक शपथपत्रातून सत्य समोर आलं
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं शिक्षण, त्यांची पदवी नेहमीच वादात आणि चर्चेचा विषय राहिली. ५ वर्षांपूर्वी इराणी यांनी मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून शपथ घेतली. तेव्हा इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून गदारोळ निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आपण परदेशातील येल विद्यापठातून ग्रॅज्युएट असल्याचं स्मृती यांनी अनेकवेळा जाहीरपणे सांगितलं होतं. परंतु आता लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी वेगळीच माहिती दिली आहे. आपण ग्रॅज्युएशन पूर्ण न केल्याचं त्यांनी शपथपत्रात नमूद करत स्वतःच्या पदवीचा वाद कायमचा संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
दणका! कार्यक्रमांमधून विशिष्ट पक्षाच्या स्कीम्स प्रमोट केल्याने झी वाहिनीवर कारवाई
मागील काही दिवसांपासून झी वाहिनीवर आचारसंहितेचे सर्व नियम पायदळी तुडवत मालिकांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा प्रचार सुरू होता. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून पॉलिटीकल पार्टीच्या स्कीम्स प्रमोट करण्यात येत होत्या. यावर भारतीय निवडणूक आयोगाने आपला आक्षेप नोंदवत कडक कारवाई केली आहे. आचार संहिता लागु असताना अशा प्रकारे प्रचार करणे झी वाहिनीला महागात पडले आहे. त्यामुळे आज झी वाहिनीच्या कार्यक्रमांचे प्रसारण रात्री ८ ते १० यावेळेत बंद करण्यात आले होते. झी वाहिनीने प्रचार केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
6 वर्षांपूर्वी -
राफेल प्रकरण गुप्ततेच्या कारणास्तव गुंडाळण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
राफेल लढाऊ विमाने खरेदीच्या व्यवहारात ‘क्लीन चिट’ देण्याच्या आधीच्या निकालाचा फेरविचार करण्याचा विषय गुणवत्तेवर सुनावणी घेऊ नये आणि राष्ट्रीय सुरक्षा व गोपनीयतेच्या मुद्द्यांवर गुंडाळून टाकावा, ही विनंती अमान्य करून सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मोदी सरकारला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जोरदार दणका दिला.
6 वर्षांपूर्वी -
'द हिंदू' विजय? राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का
राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी करारा प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच जोरदार धक्का दिल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने राफेल करारातील पुराव्याच्या कागदपत्रांना घेतलेला आक्षेप सुप्रीम कोर्टाने स्पष्ट फेटाळला आहे. फ्रान्ससमवेत करण्यात आलेल्या राफेल कराराच्या निकालाची फेरतपासणी करण्यासाठी ज्या दस्तऐवजावर विशेषाधिकारी असे नमूद केले आहे त्यावर अवलंबून राहता येणं शक्य होणार नाही अशी प्राथमिक हरकत केंद्र सरकारने घेतली होती. त्याबाबत सुप्रीम कोर्टाने आज निकाल दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
आम्हाला मोदींचे दोन चेहरे पाहायला मिळणार, एक निवडणुकीपूर्वीचा व एक निवडणुकीनंतरचा
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा शांततेवर चर्चा होण्याची शक्यता आहे असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी सध्या विरोधी बाकावर असणारा काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास पुन्हा चर्चा होणं अशक्य असल्याचंही मत व्यक्त केलं आहे. राजकीय पक्षांकडून टीका होईल या भीतीने भारतातील काँग्रेस शांततेवर चर्चा करणार नाही असं इम्रान खान यांनी मत व्यक्त केलं आहे. गुरुवारपासून भारतात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात होणार आहे. लोकसभेच्या ९१ जागांसाठी ११ एप्रिलला मतदान होणार आहे. २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंचे आरोप खरे ठरले! नमामि गंगे केवळ देखावा: वॉटरमॅन राजेंद्र सिंह
सुप्रसिद्ध वॉटरमॅन, जलतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी राजेंद्र सिंह यांनी मोदी सरकारवर नमामि गंगे अभियानावरून सडकून टीका केली आहे. गंगा नदीच्या सद्यस्थितीवर बोलताना राजेंद्र सिंह म्हणाले की गंगा नदी पहिल्यापेक्षाही अधिक दूषित झाली आहे. नमामि गंगा अभियानाचा मूळ उद्देश हा गंगा नदी प्रदूषणमुक्त करणे हा होता, मात्र केंद्राची हि योजना केवळ सौंदर्यीकरण एवढंच असून प्रचंड पैसा खर्च करून देखील नदी पूर्वीपेक्षा देखील अधिक प्रदूषित झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेची धाकधुक वाढली! अंजली दमानिया खंबाटा कामगारांसह आज रत्नागिरीत
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया खंबाटा कामगारांसह आज रत्नागिरीत येऊन जाहीर पत्रकार परिषद घेणार आहेत. यामुळे खंबाटा ऐअरलाईन्स मुद्द्यावरून कोकणातील राजकारण प्रचंड तापण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
बुलेट ट्रेनसाठी निसर्गाचा विध्वंस! ५३,४६७ खारफुटींच्या कत्तलीस परवानगी
बुलेट ट्रेनसाठी ठाणे, नवी मुंबई व पालघर या पट्ट्यात तब्बल १३.३६ हेक्टर जागेवर पसरलेल्या एकूण ५३,४६७ खारफुटींची कत्तल करण्यास केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान मंत्रालयाने (एमओईएफ) परवानगी दिल्याची अधिकृत माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोेरेशन (एनएचएसआरसी)ने स्वतः हायकोर्टाला सोमवारी दिल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
उज्वला योजनेतील सिलिंडर परवडेना, ४ राज्यात ८५ टक्के लाभार्त्यांची चुलीला पसंती
लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारने आपल्या महत्वकांक्षी योजनांच्या यशाचा पाढा मोठी जाहिरातबाजी करत सुरू केला होता. यामध्ये प्रधानमंत्री उज्वला योजनेचा देखील समावेश आहे. दरम्यान, या योजनेवरुन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘द हिंदू’ ने दिलेल्या अधिकृत वृत्तानुसार मोफत एलपीजी गॅस जोडणी झालेल्या ४ राज्यातील सुमारे ८५ टक्के लाभार्थी अजूनही चुलीवर स्वयंपाक बनवत असून त्यांना संपलेला सिलिंडर पुन्हा घेणे परवडत नसल्याचे देखील समोर आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपच्या जाहीरनाम्यात २०२४ मधील लोकसभेची गाजर पेरणी?
आमागी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने नवी दिल्ली येथे आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्याला ‘संकल्पपत्र’ असे नाव दिले आहे. यावेळी नवी दिल्लीतील भाजपाच्या कार्यालयात यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
6 वर्षांपूर्वी