महत्वाच्या बातम्या
-
२०१४ मधील आश्वासनं केवळ थापा ठरल्या, आज नवा जाहीरनामा प्रसिद्ध होणार
आमागी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आपला अधिकृत जाहीरनामा आज प्रसिद्ध करणार आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्याचे नाव ‘संकल्पपत्र’ असे दिले आहे. नवी दिल्लीतील भाजपा कार्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज नेतेही उपस्थित राहणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
सत्ताकाळात शिवसेना-भाजप खासदारांची संपत्ती ६० टक्क्यांनी वाढली
भारतीय जनता पक्षाच्या खासदार पूनम महाजन यांच्या संपत्तीमध्ये तब्बल १०६ टक्क्यांची घट झाल्याची आकडेवारी समोर आली होती. पण, आता शिवसेना-भाजप खासदारांच्या संपत्तीमध्ये तब्बल ६० टक्क्यांची वाढ झाल्याचे समजते. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवीत असलेल्या शिवसेना-भाजप खासदारांच्या संपत्तीमध्ये सरासरी ३.२० कोटींची वाढ झाली आहे. ADRच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. २०१४ आणि २०१९ मधील आकड्यांची तुलना केल्यानंतर ही आकडेवारी देण्यात आली.
6 वर्षांपूर्वी -
भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार आणि बॉलिवूडचे ज्येष्ठ कलाकार शत्रुघ्न सिन्हा यांनी आज नवी दिल्ली येथे काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. मागील ५ वर्षात मोदी सरकारच्या कारभारावर त्यांनी वारंवार टीका केली होती. तसेच अनेकदा त्यांनी थेटपणे पंतप्रधान मोदींविरोधातही भाष्य केले होते. त्यामुळे ते भाजपापासून दुरावले होते. त्यातच भाजपाने त्यांचे लोकसभेचे तिकीटही कापल्याने अखेर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याची घोषणा केली होती.
6 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानचं F-16 पडलंच नाही? अमेरिकन मासिक 'फॉरेन पॉलिसी'
पाकिस्तानी हवाई दलाच्या ताफ्यातील सर्व एफ-16 हे अमेरिकन लढाऊ विमानं सुरक्षित असल्याचा दावा अमेरिकेच्याच एका प्रसिद्ध मासिकानं केल्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचं एफ-16 पाडल्याचा भारताचा दावा चुकीचा असू शकतो, असं ‘फॉरेन पॉलिसी’ या मासिकानं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. विशेष म्हणजे अमेरिकन सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं मासिकानं हे वृत्त दिलं आहे. या प्रकरणाशी थेट संबंध असलेल्या २ उच्च अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरुन वृत्त दिल्याचं मासिकानं स्पष्ट केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: चौकीदार व मेहुल चोक्सी एकाठिकाणी एकत्र होते हे राजनाथ सिंह यांना माहित नसावे?
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी युपी’तील बुलंदशहर येथे भाषणामध्ये काँग्रेसवर जोरदार टीका केली. देशात काँग्रेसचं सरकार असेपर्यंत नीरव मोदी, विजय माल्या, मेहुल चोक्सी देशातून पळाले नाहीत. परंतु, त्यांना जेव्हा माहीत पडलं काँग्रेस सत्तेतून गेलं आणि सतर्क चौकीदाराचं सरकार देशात आलं तेव्हा त्यांनी भारत सोडून विदेशात पलायन केलं असा आरोप सिंह यांनी केला.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या घरात करोडो रुपये, आयकर विभाग कारवाई करेल काय?
लोकसभा निवडणुकीसाठी देशातील सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरवात केली आहे. दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने आता प्रचार आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. यातच तामिळनाडूमधील द्रविड मुनेत्रा काझगम अर्थात (डीएमके) पक्षाचे प्रमुख एमके स्टॅलिन यांनी भारताच्या आयकर विभागाला थेट आव्हान देत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. जर आयकर विभागाने नरेंद्र मोदी यांच्या घरी छापे टाकावेत, असे एमके स्टॅलिन यांनी म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारतीय लष्कराला ‘मोदींची सेना’ म्हणणारेच देशद्रोही: माजी लष्करप्रमुख व भाजप नेते व्ही.के.सिंग
भारतीय लष्कर ही ‘मोदी यांची सेना’ आहे, असे धक्कादायक वक्तव्य करणारे युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना माजी लष्करप्रमुख आणि सध्या केंद्रीय मंत्री असलेले जनरल व्ही.के.सिंग यांनी चांगलीच चपराक दिली आहे. भारतीय लष्कराला मोदींची सेना म्हणणे पूर्णपणे चुकीचे असून, अशाप्रकारे भारतीय सैन्याचा अपमान करणारेच देशद्रोही असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपाच्या विचारधारेशी असहमत असणारे लोक देशविरोधी नाहीत: आडवाणी
आमच्या विचारांशी असहमत असलेले कोणीही असोत पण ते देशविरोधी नाहीत असे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी म्हटले आहे. जे आमच्या म्हणजेच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी सहमत नसलेले लोक देशविरोधी नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त त्यांनी एक ब्लॉग लिहिला आहे. त्याद्वारे त्यांनी स्वतःची सविस्तर भूमिका मांडली आहे.
6 वर्षांपूर्वी -
देशद्रोह म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला कळतं का? न्यायाधीशांचा दिल्ली पोलिसांना प्रश्न
जवाहरलाल नेहरु विद्यापीठात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या नव्हत्या, असं दंडाधिकाऱ्यांनी अहवालात म्हटलं आहे. विशेष म्हणजे संबंधित व्हिडीओ छेडछाड करण्यात आलेली होती, असंदेखील या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सदर अहवाल दिल्ली सरकारला आज सादर केला जाऊ शकतो. एकूण २५ पानांच्या या अहवालात जेएनयूमध्ये घडलेल्या संपूर्ण घटनांचा क्रम देण्यात आलेला आहे.
6 वर्षांपूर्वी -
दक्षिण कोरिया जगातील पहिली 5G सेवा देणारा देश
तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप पुढे असलेल्या अमेरिका, चीन, रशियाला देखील मागे टाकत दक्षिण कोरियासारख्या छोट्याशा देशाने जगात पहिल्यांदा 5G सेवा देण्याचा पराक्रम केला आहे. काल म्हणजे बुधवारी रात्री अकरा वाजता देशवासियांसाठी 5G सेवा अधिकृतपणे लाँच करण्यात आली. दक्षिण कोरियाने यापूर्वी ५ एप्रिल ही देशात 5जी सेवा सुरु करण्यासाठी तारिख निश्चित केली होती. परंतु, अमेरिकी कंपन्यांना हरवण्यासाठी २ दिवस आधीच ही सेवा सुरु करण्यात आली. विशेष म्हणजे 4Gच्या तुलनेत 5G तब्बल २० पटींनी वेगवान असणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात घट
रिझर्व्ह बँकेनं गृहकर्ज घेणाऱ्यांना काही अंशी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीने आज रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे रेपो दर ६.२५ वरून ६ टक्क्यांवर आले आहेत. २०१९-२० या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीत या निर्णय घेण्यात आला.
6 वर्षांपूर्वी -
सैन्य कुणाची खासगी शक्ती नाही; माजी नौदल प्रमुख ऍडमिरल एल. रामदास संतापले
माजी नौदल प्रमुख ऍडमिरल एल. रामदास यांनी युपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना चांगलेच झाडाले आहे. देशाचं सैन्य कुणाची खासगी शक्ती नाही आणि त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे रामदास यांनी ध्यानात आणून दिले आहे. आदित्यनाथ यांनी एका सभेदरम्यान सैन्याचा उल्लेख “मोदीजी की सेना” असा उल्लेख करत सैन्याच्या राजकीय वापर करणाचा प्रयत्न केला होता. त्यावर संतापलेल्या माजी नौदल प्रमुखांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणातून महागाई, बेरोजगारी व दुष्काळ गायब
लोकसभेच्या आखाड्यात सध्या सर्वच पक्षांकडून प्रचारसभा आणि भाषणं सुरु झाली आहेत. परंतु २०१४ मध्ये विकासाच्या मुद्यावर लोकसभा निवडणूक लढवणारे नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे सध्या सामान्य माणसाच्या दैनंदिन विषयांना बगल देत भगवं वादळ, मंदिर आणि पाकिस्तान अशा विषयावर भाषणं ठोकताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या राफेल जाहिरातीवर निवडणूक आयोगाचा आक्षेप
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून राफेल लढाऊ विमानांच्या कराराचा मुद्दा आक्रमकपणे वापरला जात असताना याबाबत काँग्रेसने जाहिरातीत राफेलच्या प्रतिकृतीच्या वापर केल्याने निवडणूक आयोगाने त्याबाबत आक्षेप घेतला आहे. मध्य प्रदेश काँग्रेसच्या ९ पैकी ६ जाहिरातींवर आयोगाने आक्षेप घेतला आहे. ज्यामध्ये राफेलबाबत असलेल्या जाहिरातीचाही समावेश करण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंची बिल्डरसोबत तब्बल २८ कंपन्यांमध्ये भागीदारी - नारायण राणे
कोकणात देखील लोकसभेची धामधूम सुरु झाली आहे असंच म्हणावं लागेल. मुंबईत मराठी माणसांची टक्केवारी कमी झाली, १९६०-६६ दरम्यान मुंबईत मराठी माणूस साठ टक्के होता, पण आज मराठी माणूस केवळ १८ टक्के शिल्लक आहे. मुंबईतला मराठी माणूस कुठे गेला.वसई, बदलापूर, कल्याण याठिकाणी मराठी माणूस निघून गेले. ही स्थिती शिवसेनेनी आणली, उद्धव ठाकरेंची बिल्डरसोबत पार्टनरशिप आहे. २८ कंपन्यांमध्ये रवींद्र वायकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाकरे घराण्यातील एका व्यक्तीची भागीदारी आहे. हे मी विधानसभेत पुराव्यानिशी मांडले, सत्ता मिळवायची आणि सत्तेतून पैसा कमवायचा ही निती शिवसेनेची आहे असा स्पष्ट आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
फेसबुकने काँग्रेस संबंधित तब्बल ६८७ पेज, अकाऊंट्स डिलीट केले
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फेसबुकने कॉंग्रेस पक्षाला जोरदार डिजिटल धक्का दिला आहे. फेसबूकने काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित असलेली तब्बल ६८७ पेज आणि अकाऊंट्स डिलीट केली आहेत. त्यांच्या माहितीनुसार आक्षेपार्ह भाषेचा वापर असलेल्या तसेच निलंबित करण्यात आलेली सुमारे ६८७ फेसबूक पेजेस आणि अकाऊंट्स फेसबूकने हटवली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
खंबाटातील ४०० कोटींच्या भ्रष्टाचारात विनायक राऊतांचा हात
बहुचर्चित तब्बल ४०० कोटींचा भ्रष्टाचार करून एका रात्रीत सर्वाधिक म्हणजे एकूण २७६३ कामगार तसेच त्यांच्या तब्बल दहा ते अकरा हजार कुटूंबियांना रस्त्यावर आणणा-या खंबाटा एव्हिएशन कंपनीतील घोटाळय़ाचा खरा सूत्रधार, या कंपनीचा निरव मोदी हा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार विनायक राऊत असून बहुतांश कोकणातील कामगार असलेल्या या खंबाटातील भ्रष्टाचारातुन विनायक राऊत यांनी कोकणी माणसाचीच फसवणूक केली आहे असा धक्कादायक आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केला.
6 वर्षांपूर्वी -
नेपाळमध्ये अतिवृष्टीमुळे २७ जणांचा मृत्यू तर ४०० जण जखमी
नेपाळला सध्या अतिवृष्टी आणि वादळाचा तडाखा बसला आहे. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत तब्बल २७ नागरिकांचा मृत्यू झाला असून ४०० पेक्षा अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. हिमालयन टाइम्सच्या वृत्तानुसार नेपाळच्या दक्षिण जिल्ह्याला प्रचंड प्रमाणात वादळाचा फटका बसला आहे. परसा येथे वादळाच्या तडाख्यामध्ये अनेकांचे जीव गेले असून मृतांचा आकडा अजून वाढण्याची भिती जिल्हा पोलीस कार्यालयाने व्यक्त केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
इस्त्रोची भव्य कामगिरी! एमिसॅटसह २८ देशांचे नॅनो उपग्रह अवकाशात झेपावले
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो आज आणखी एक नवा इतिहास रचला आहे. श्रीरहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही सी-४५द्वारे एमिसॅटसह विविध देशांचे नॅनो उपग्रह अवकाशात झेपावले आहेत. यात उपग्रहात भारताचा एक, अमेरिकेचे 24, लुथानियाचे 2 तर स्पेन आणि स्विजर्झलँडचे प्रत्येकी एक अशा तब्बल २९ उपग्रहांचा समावेश आहे.
6 वर्षांपूर्वी -
संबित पात्रांनी व्हिडिओ शेअर केला आणि सरकारच्या उज्वला योजनेची पोलखोल झाली
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांना पक्षाने ओरिसातील पुरी येथून लोकसभा निवडणुकीचं तिकीट जाहीर केलं आहे. त्यानंतर ते इथे हजर झाले असून जोरदार प्रचाराला लागले आहेत. परंतु, समाज माध्यमांवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे एकूणच भाजप आणि स्वतः नरेंद्र मोदी तोंडघशी पडल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी