महत्वाच्या बातम्या
-
गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. शनिवारपासूनच त्यांच्या तब्येतीवरुन दिवसभर राज्यात आणि राज्याबाहेरही प्रचंड अफवा पसरल्या होत्या. परंरतु, ही अफवा आता खरी ठरली आहे. आज पर्रीकर यांनी घरीच अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, सकाळी मनोहर पर्रीकर यांची तब्येत स्थिर असून ते फक्त डोळे उघडतात, असे सांगण्यात आले होते.
6 वर्षांपूर्वी -
त्या बैठकीला मोदीच गैरहजर होते, त्यामुळे मी पुलावामाचा बदला घेण्यासाठी जवानांनाच आदेश द्या असं सुचवलं
पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात भारताचे तब्बल चाळीस जवान शहीद झाले होते. देशातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. त्यानंतर काही दिवसातच या हल्ल्याचा बदला एअर स्ट्राईकद्वारे घेण्यात आला. यात ३०० पेक्षा अधिक दहशतवादी मारल्याचा दावा सरकारने केला आहे. परंतु, ही कारवाई आमच्या सल्ल्यानेच झाल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. ते चाकण येथे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी अजित पवार, जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे आदी नेते उपस्थित होते.
6 वर्षांपूर्वी -
नेहरुंमुळेच मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यात अपयश: भाजप
पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये आज चौथ्यांदा चीनने खोडा घातला. युनोमध्ये चीनने पुन्हा नकाराधिकाराचा वापर केला आहे. चीनच्या या निर्णयामुळे मसूदला जागतिक दहशतवादी ठरवण्यासाठी भारताने केलेली मोर्चेबांधणी अयशस्वी ठरली आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: तुलसी जोशींचा कॉल आणि मराठी माणसाचं 'मॅटर सॉल', बांधकाम व्यवसायिकाने धनादेश दिले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघरचे कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक तुलसी जोशी हे शक्य असलेल्या मदतीसाठी सामान्य मराठी माणसाला कधीच नाही बोलत नाहीत, याची अनेक उदाहरणं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पाहिली आहेत. त्यापैकीच अजून दोन मदतीची प्रकरण मुंबईतील कुटुंबातून समोर आली आहेत. कारण या मराठी कुटुंबाने कष्टाचा पैसे स्वतःचे घर घेण्याच्या उद्देशाने एका बांधकाम प्रकल्पात गुंतवले होते.
6 वर्षांपूर्वी -
योगी ते फडणवीस, कमळावर देखील घराणेशाहीच्याच पाकळ्या
सध्या लोकसभेच्या अनुषंगाने सत्ताधारी भारतीय जनता पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांवर घराणेशाहीचा आरोप करत असून भाजप त्यातला नाही असं भासवत आहे. परंतु, भाजपची सध्याची कुंडली तपासल्यास ते इतर पक्षांच्या तुलनेत काही कमी नाहीत असंच चित्र आहे. त्यामुळे घराणेशाही या विषयावर भाजपने न बोललेलं बरं, असा सूर विरोधकांनी लावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
जगभरात फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर तक्रारींचा पाऊस
भारतासह अमेरिका, युरोप आणि जगातील अनेक ठिकाणी फेसबुक आणि इन्स्टाग्राम ठप्प झालं आहे. जवळपास ३० मिनिटांपासून फेसबुक आणि इन्स्टाग्राम ठप्प आहे. लाखो फेसबुक युजर्सचं अकाऊंट सुरू होत नाहीय, तर अनेकांना लाईक आणि कमेंट करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय इन्स्टाग्रामवरही फोटो अपलोड करताना त्रास सहन करावा लागतो आहे. यामुळे ट्विटरवर तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मसूद अजहरला युनोत जागतिक दहशतवादी घोषित करण्यात चीनचा सुरुंग
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीननं पुन्हा एकदा सुरुंग लावला आहे. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव आणण्यात आला होता. परंतु चीननं नकाराधिकाराचा वापर केला. त्यामुळे भारताला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरवण्याची चीनची ही चौथी वेळ आहे.
6 वर्षांपूर्वी -
प्रियंका गांधींच पहिलं ट्वीट; ‘हा’ दिला संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधून मंगळवारी कार्यकारिणीची बैठक व जाहीर सभा घेऊन काँग्रेसने लोकसभा निवडणुकांचे जोरदार रणशिंग फुंकले. काँग्रेसच्या गुजरातमधील जाहीर सभेला बऱ्याच वर्षांनी इतकी प्रचंड गर्दी झाली होती. गुजरातमधील जाहीर सभेनंतर प्रियंका गांधी यांनी पहिलं ट्वीट केलं आहे. प्रियंका गांधी यांनी फेब्रुवारी २०१९ मध्येच ट्विटर अकाऊंट सुरू केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
ब्रेग्झिटचा प्रस्ताव पुन्हा फेटाळला; थेरेसा मे यांना पुन्हा जोरदार धक्का
ब्रिटीश संसदेने अंमलबजावणीच्या फक्त १७ दिवसआधी ब्रेक्झिटचा प्रस्ताव फेटाळल्याने ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना मोठा धक्का बसला आहे. युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा प्रस्ताव दुसऱ्यांदा फेटाळण्यात आला आहे. ब्रिटनच्या संसदेने ब्रेक्झिट करारावरील प्रस्तावित बदलांना २४२ विरुद्ध ३४१ अशा मोठ्या फरकाने संख्येने नाकारलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: पीएनबी महा-घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला मोदी 'मेहुलभाई' म्हणाले होते
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ नोव्हेंबर २०१५ रोजी तीन सुवर्ण योजनांचे उदघाटन करण्यात आले. सुवर्ण रोखे, सुवर्ण ठेव आणि सोन्याची नाणी अशा योजनांतून देशात पडून राहिलेले सोने चलनात आणण्याचा या योजनांमागील उद्देश होता. या योजनांच्या उद्घाटनाप्रसंगी नरेंद्र मोदींनी भाषण केले होते. या कार्यक्रमात गीतांजली जेम्सचा अध्यक्ष आणि नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सी हा देखील उपस्थित होता. ज्वेलरी क्षेत्रातील मोठे व्यापारी तसेच रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. २०१५ मध्ये नीरव मोदीचा घोटाळा उघड झाला नव्हता आणि त्यावेळी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे दोघेही आघाडीचे हिरे व्यापारी होते. मोदींचा जो व्हिडिओ व्हायरल केला जात आहे तो याच कार्यक्रमातील आहे. या भाषणात मोदींनी मेहुल चोक्सीचा उल्लेख मेहुल भाई असा केला होता.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभेला तब्बल ५० हजार कोटी उधळले जाणार, तर समाज माध्यमांवर ५,००० कोटी
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात २ महिने ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडतील हे निश्चित झाले आहे. दिल्लीतील सेंटर फॉर मीडिया स्टडीजच्या (CMS) अहवालानुसार भारतातील ही निवडणूक प्रक्रिया जगातील सर्वात खर्चिक निवडणूक ठरणार आहे. भारतातील निवडणुकीवर यंदा तब्बल ५० हजार कोटी रुपये (७ अब्ज डॉलर) इतका प्रचंड खर्च होण्याची शक्यता असून अमेरिकेतील निवडणुकीवर २०१६ साली ६.५ अब्ज डॉलर खर्च झाले होते. तर भारतात २०१४ साली निवडणुकीवर पाच अब्ज डॉलर खर्च झाले होते.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या गुजरातमधूनच काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ
कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज गुजरातच्या अहमदाबाद शहरात होणार आहे. या बैठकीसाठी कॉंग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या होमपिचची निवड केल्याने याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
6 वर्षांपूर्वी -
इथिओपियातील विमान दुर्घटनेत १५७ प्रवाशांचा मृत्यू, ४ भारतीयांचा समावेश
इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथून नैरोबीला निघालेले इथिओपियन एअरलाइन्सचे विमान अपघातग्रस्त झाल्याची घटना रविवारी समोर आली आहे. या विमानातून एकूण १४९ प्रवासी आणि ८ कर्मचारी प्रवास करत होते. विमान कोसळून तब्बल १५७ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४ भारतीय प्रवाशांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारताचे संरक्षण खाते सर्वाधिक भ्रष्ट
देशात सर्वत्र भ्रष्टाचार आहे, परंतु आपले संरक्षण खाते सर्वाधिक भ्रष्ट आहे. राफेल लढाऊ विमानखरेदीतील संशयास्पद करारावरून ही बाब मोठ्या प्रमाणावर अधोरेखित होते, असे मत ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी ‘मुंबई कलेक्टिव्ह’च्या परिसंवादात व्यक्त केले.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: नीरव मोदी लंडनच्या रस्त्यांवर बिनधास्त फिरतो
पीएनबी अर्थात पंजाब नॅशनल बँकेला करोडो रुपयांचा चुना लावून फरार झालेला नीरव मोदी सध्या इग्लंडची राजधानी लंडनमध्ये राहत असल्याचे समजते आहे. द टेलिग्राफ’ या वृत्तपत्राने मोदीचा एक व्हिडिओ जारी केला आहे. यात तो लंडनच्या रस्त्यांवर मोकळेपणाने फिरताना दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
बेजगाम जिल्ह्यामधून भारतीय लष्कराच्या एका जवानाचं अपहरण
पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं. तसेच बेजगाम जिल्ह्यामधून एका भारतीय लष्कराच्या जवानाचं अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर भागात प्रचंड भीतीदायक वातावरण पसरले आहे.
6 वर्षांपूर्वी -
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाची काही वेळात पत्रकार परिषद
पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं. तसेच बेजगाम जिल्ह्यामधून एका भारतीय लष्कराचं अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर भागात प्रचंड भीतीदायक वातावरण पसरले आहे.
6 वर्षांपूर्वी -
निवडणूक इफेक्ट: मुंबईत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना कर माफ, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकराना निवडणुकीपूर्व मोठा दिलासा मिळणार आहे. स्वयंपुनर्विकास धोरणालाही राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तसेच, रखडलेले एसआरए प्रकल्प म्हाडाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुलवामा हल्ला मोदी व इम्रान खान यांच्यामधील पूर्वनियोजित मॅच फिक्सिंग: काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला हा देशाच्या लष्करावर झालेला सर्वात मोठा हल्ला होता. पाकिस्तानातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जवाबदारी स्वीकारली होती. त्याला भारताने हवाई हल्ला करून चोख प्रत्युत्तर देखील दिलं. परंतु, सदर प्रकरणी काँग्रेस नेत्याने एक धक्कादायक आरोप केला आहे. पुलवामा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पूर्वनियोजित पणे फिक्स केला होता, असा हा आरोप केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
शांतीवार्ता! १८२ मदरसे ताब्यात, १०० दहशतवादी अटकेत: पाकिस्तान गृह मंत्रालय
पाकिस्तानने इस्लामिक दहशतवाद्यांविरूद्ध मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यादरम्यान पाकिस्तानी सरकारने एकूण १८२ मदरसे स्वतःच्या नियंत्रणात घेत, पाकिस्तानने बंदी घातलेल्या संघटनांशी संबधित असलेल्या शंभर दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं आहे. ही कारवाई आम्ही योग्य नियोजन करून अमलात आणल्याचे पाकिस्तानच्या सरकारकडून सांगण्यात आले.
6 वर्षांपूर्वी