महत्वाच्या बातम्या
-
अदाणी झाले! आता अनिल अंबानींना गुजरातमधील ६४८ कोटीच्या विमानतळाच्या कंत्राटाची लॉटरी
राफेल लढाऊ विमानांच्या प्रकरणावरुन आधीच गर्तेत अडकलेले उद्योजक अनिल अंबानी यांच्या कंपनीला गुजरातमधील विमानतळांचे कंत्राट देण्यात आले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने आर इन्फ्रा म्हणजे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला तब्बल ६४८ कोटी रुपयांचे काम देण्यात आले आहे. याबाबत कंपनीकडूनच माहिती देण्यात आली आहे. आर इन्फ्राने सर्वात कमी बोली लावून हे कंत्राट मिळवले आहे. अनिल अंबानींचं राफेल करारानंतरचं हेआणखी एक यशस्वी उड्डाण ठरलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडे यांनी १०६ कोंटींचा मोबाईल घोटाळा केला: धनंजय मुंडे
ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी सेविकांच्या केंद्रांना पुरविण्यात येणाऱ्या स्मार्टफोन मोबाईलमध्ये तब्बल १०६ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे चिक्की घोटाळ्यानंतर पुन्हा एकदा पंकजा यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप लागले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
नवाझ शरीफांना पाकिस्तानातं जाऊन मिठी मारणारे मोदीच पाकिस्तानचे 'पोस्टर बॉय: राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरे पाकिस्तानचे पोस्टर बॉय आहेत. पाकिस्तानच्या दौऱ्यावर आम्ही गेलो होतो का, नवाझ शरीफ यांना भेटायला आम्ही गेलो होतो का ?. पठाणकोटमध्ये कोण आले होते ते, ISI वाले, त्यांना आम्ही बोलावलं होतं ? असे अनेक प्रश्न उपस्थित करत काँग्रेस अध्यक्षांनी मोदींना पाकिस्तानचा पोश्टर बॉय म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: अमेरिकन प्लॅनेट लॅब्जने बालाकोट मदरसा संकुलाचे सॅटेलाईट व्हिडिओ प्रसिद्ध केले, भारतीय माध्यमं तोंडघशी?
पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त केल्याचे आणि अनेक दहशतवाद्यांना मारल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते खुलेआम दावे करत आहेत. भारतीय वायुदलाने कोण आणि किती जण मृत्युमुखी पडले ते आमचं काम नाही असा अप्रत्यक्ष संदेश दिला होता. तर दुसरीकडे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्य सचिव विजय गोखले यांनी ती ‘बिगर लष्करी कारवाई’ तसेच ‘प्रतिबंधात्मक कारवाई’ असा शब्दप्रयोग करून सामान्यांना बरंच काही सांगितलं होतं. परंतु. भारतीय प्रसार माध्यमांनी विषय वेगळ्या पद्धतीने चिघळवुन सत्ताधाऱ्यांसाठी लोकसभेच्या अनुषंगाने हवानिर्मिती करण्यास मदत केल्याचं पाहायला मिळालं.
6 वर्षांपूर्वी -
'चौकीदार चौकंन्ना' असून देखील 'सगळं चोरीला जातंय' आपल्या देशातून? राहुल गांधी
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःची स्तुती करताना तुमच्या देशाचा ‘चौकीदार चौकंन्ना’ असे असं म्हटलं होतं. परंतु आता नुकत्याच घडलेल्या घटनेने ते तोंडघशी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण राफेल लढाऊ विमानांच्या डीलमधील अत्यंत महत्त्वाची कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. विशेष म्हणजे राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना स्वतः महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टाने नरेंद्र मोदी सरकारला क्लिन चिट दिली होती. परंतु, या निकालानंतर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या. त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.
6 वर्षांपूर्वी -
'चौकीदार चौकंन्ना' असून देखील राफेल संबंधित महत्त्वाची कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला कशी? नेटकरी
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःची स्तुती करताना तुमच्या देशाचा ‘चौकीदार चौकंन्ना’ असे असं म्हटलं होतं. परंतु आता नुकत्याच घडलेल्या घटनेने ते तोंडघशी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण राफेल लढाऊ विमानांच्या डीलमधील अत्यंत महत्त्वाची कागदपत्रं चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. विशेष म्हणजे राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना स्वतः महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टाने नरेंद्र मोदी सरकारला क्लिन चिट दिली होती. परंतु, या निकालानंतर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या. त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.
6 वर्षांपूर्वी -
राफेल प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला; सुप्रीम कोर्टात माहिती
राफेल लढाऊ विमानांच्या डीलमधील अत्यंत महत्त्वाची कागदपत्रं चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. विशेष म्हणजे राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना स्वतः महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टाने नरेंद्र मोदी सरकारला क्लिन चिट दिली होती. परंतु, या निकालानंतर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या. त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.
6 वर्षांपूर्वी -
बेरोजगारीत अडीज वर्षातील सर्वाधिक वाढ: सीएमआयई अहवाल
भारतातील बेरोजगारीचा दर वाढला असून मागील २.५ वर्षातील हा बेरोजगारीचा सर्वाधिक मोठा आकडा असल्याचे सिद्ध झालं आहे. सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी म्हणजेच सीएमआयईच्या अहवालानुसार फेब्रुवारी २०१९ मध्ये मासिक बेरोजगारीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये बेरोजगारीचा दर ५.९ टक्के होता, तो यंदा ७.२ टक्के एवढा वाढला आहे.
6 वर्षांपूर्वी -
अयोध्ये प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार? की 'मध्यस्थी'ची प्रक्रिया?
अयोध्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. CJI रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली पीठ बुधवारी अयोध्या प्रकरणात ‘मध्यस्थता’ व्हावी किंवा नाही याबद्दल निर्णय घेणार आहे. न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी गेल्या सुनावणीत मध्यस्थीचा पुन्हा प्रयत्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. याप्रकरणी चर्चा करून कोर्टाबाहेर तंटा सुटण्याची अवघा एक टक्का शक्यता असेल तरी ती शक्यता पडताळली पाहिजे, असं मत गेल्या सुनावणीत कोर्टात व्यक्त केलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस सरकार साखर सम्राटांवर मेहेरबान: सविस्तर
राज्यातील आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या राज्यातील एकूण १५ सहकारी साखर कारखान्यांना राजगोपाल देवरा समितीच्या शिफारशींचा विचार करून मदत करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हा निर्णय राजकीय हेतूने घेतल्याचा आरोप अनेक विरोधकांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; पूंछ व राजौरीमध्ये पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन
सीमारेषेवर पाकिस्तानच्या नापाक कुरापती सुरूच आहेत. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. मागील चोवीस तासांमधील ही तिसरी घटना आहे.
6 वर्षांपूर्वी -
गोकुळ दूध संघावर आयकर विभागाचे छापे
गोकुळ दूध संघाच्या कोल्हापुरातील मुखालयात प्राप्तिकर विभागाने धाडसत्र सुरु केलं आहे. दूध संघाची तब्बल ४ तासांहून अधिक काळ आर्थिक कागदपत्रांसह गोपनीय चौकशी सुरु होती. कर चुकवल्याप्रकरणी ही धाड टाकण्यात आल्याचे प्रसार माध्यमांच्या सुत्रांकडून कळते.
6 वर्षांपूर्वी -
भारत-पाकिस्तानमध्ये ‘समझोता एक्सप्रेस’ ३ मार्चपासून सुरळीत
पुलवामा जिल्ह्यातील सीआरपीएफ’च्या जवानांवरील भ्याड दहशदवादी हल्ला आणि त्यानंतर एअर स्ट्राईकनंतर भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेली समझोता एक्सप्रेसची सेवा ३ मार्चपासून सुरळीत सुरु झाली आहे. दोन्ही देशांनी मिळून रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील रविवारी दिल्लीमधून पाकिस्तानसाठी समझोता एक्सप्रेस पुन्हा निघाली होती. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही तशी अधिकृत माहिती दिली प्रसिद्ध केली होती.
6 वर्षांपूर्वी -
कर्तारपूर कॉरिडॉर संदर्भात पाकचे अधिकारी भारत भेटीवर येणार: पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालय
पुलवामा भ्याड हल्ला आणि एअर स्ट्राईकनंतर भारत पाकिस्तानमधील परिस्थिती नाजूक झालेली असताना आता शांतीवार्ता सुरु होण्याचे अनेक प्रकार पुढे येऊ लागले आहेत आणि तणाव कमी करण्याचे जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळेच कर्तारपूर कॉरिडॉर हा एक भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव दूर करण्याचा महत्वाचा मार्ग ठरण्याची शक्यता आहे. कारण विषयाला अनुसरून चर्चेसाठी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांचे एक पथक लवकरच भारत भेटीवर येणार असल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
कॅग पुरावे: अमेठीत ऑर्डनन्स फॅक्टरी २००७ पासून, एके २०३ बंदुकांबद्दल वाचून हसा! मोदींनीं गंडवल?
अमेठीत राजकारण तापू लागलं आहे आणि मोदींच्या कालच्या अमेठीतील सभेनंतर लष्करी उत्पादन करणाऱ्या त्या फॅक्टरीवरून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. त्यानंतर सरकार पुरस्कृत नसलेल्या माध्यमांनी सखोल विषयात जाऊन तथ्य समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी धादांत खोटं बोलतात याचे कागदोपत्री पुरावेच समोर आले आहेत. सध्या लष्कराच्या नावाने भावनिक झालेले वातावरण पाहून मी सांगेन ती पूर्व दिशा लोकं समजतील अशा अविर्भावात ते वावरत आहेत. लष्कराच्या आडून राजकारण खेळत मी म्हणजे भारत आणि मी म्हणजे भारतीय लष्कर असा कांगावा करून लोकशाहीतील सर्व विरोधक म्हणजे पाकिस्तान समर्थक आहेत अशी हवा निर्मिती करून, देशातील सर्वच मोठ्या राजकारण्यांना त्यांच्या मतदारसंघात पराभूत करण्याची रणनीती आखात आहेत असंच पुरावे सांगतात. त्यासाठी कितीही खोटं बोलायला तयार आहेत असं पुरावे सांगतात.
6 वर्षांपूर्वी -
डिजिटल भाजपाची वेबसाईट हॅक!
भारतीय जनता पार्टीची अधिकृत वेबसाईट हॅक झाली आहे. ही वेबसाईट उघडताच प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चांसलर एंजेला मर्केल यांचा व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओसोबत अश्लिल शब्दांचाही वापर केल्याचे समोर आले. त्यानंतर काही मिनिटांतच भाजपाची ही वेबसाईट मेंटेनन्सच्या नावाने काही काळासाठी बंद केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
ट्रम्प यांचा मोदी सरकारला झटका; 'व्यापार संधी' तोडली
अमेरिकेने भारत आणि तुर्कस्तानशी असलेली व्यापार संधी (GSP) तोडली असून विशेष व्यापारी सूट देण्याचा दर्जा काढून घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सिनेटमध्ये ही अधिकृत माहिती दिली. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा मोठा परिणाम भारतावर जाणवणार असून अधिसूचना जारी झाल्यानंतर २ महिन्यांनी हा बदल लागू होणार आहे. GSP अंतर्गत अमेरिकेमध्ये भारताला करासंदर्भात विशेष सूट दिली जात होती. ठराविक रकमेच्या आयात मालावर अमेरिका आयातकर आकारत नव्हती.
6 वर्षांपूर्वी -
राफेल काय साध्य करेल ते भविष्य, पण बोफोर्स तोफांनी कारगिल युद्धात काय साध्य केलं ते पहिलं मोदींनी समजून घ्यावं: नेटिझन्स
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर राफेल विमानखरेदीचे समर्थन करताना, ‘आज आपल्याकडे राफेल विमाने असतात, तर आणखी बरेच काही साध्य करता आले असते’, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केले. सातत्याने टीका होत असताना या राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहाराचे समर्थन करत नरेंद्र मोदींनी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
6 वर्षांपूर्वी -
लष्कर हे सत्ताधाऱ्यांच्या प्रचाराच साधन नाही, हे सांगण्यासाठी लोकांनीच मोर्चे काढण्याची वेळ आली आहे का?
एअर स्ट्राईकनंतर सत्ताधाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय लष्कर आणि वायुदलाच्या जवानांचे फोटो खुलेआम भाजपच्या झेंड्याखाली लावले जात आहेत. एकूणच भारताच्या इतिहासात लष्कराचा स्वतःच्या राजकारणासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर उपयोग पहिल्यांदाच होत असावा. परंतु यात भाजपचे कार्यकर्ते ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वच सामील असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान ते पाहून आता भाजपवरील लोकांचा संशय धृढ होताना दिसत आहे. त्यामुळे काही दिवसात लोकं रस्त्यावर उतरून भाजपाला समज देताना दिसले नाही तर नवल वाटायला नको.
6 वर्षांपूर्वी -
गुजरातमधील सरदार पटेलांच्या पुतळ्याकरिता CSR निधीचा गैरवापर झाल्याचं उघड
सीएसआर आणि शाश्वत नियोजन या क्षेत्रात काम करणाऱ्या ‘गूडेराया’ कंपनीने प्राप्त केलेल्या तब्बल ९२ कंपन्यांच्या माहितीनुसार राष्ट्रीय वारसा संरक्षण या विषयासाठी २०१६ या आर्थिक वर्षात एकूण ४६.५१ कोटी रुपये खर्च करण्यात आलेले होते. दरम्यान, २०१७ या वर्षात या विषया अंतर्गत होणाऱ्या खर्चात अचानक मोठी वाढ होवून ती रक्कम १५५.७८ कोटी इतकी झालेली दिसते.
6 वर्षांपूर्वी