महत्वाच्या बातम्या
-
पुलवामा भ्याड हल्ला; गेल्या ७ महिन्यात भारत-पाक व्यापारात ७ टक्के वाढ
पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा जोरदार प्रयत्न केला गेला. दरम्यान, भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे असताना दोन्ही देशांतील व्यापार गेल्या ७ महिन्यांत गतवर्षीच्या तुलनेत याच काळातील व्यापारापेक्षा ७ टक्क्यांनी वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारत पाक सीमेवर तणाव वाढतो आहे, पाककडून युद्ध सदृश्य जमवाजमव
पुलवामा जिल्ह्यात दहशवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापार्श्वभूमीवर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये युद्ध सदृश्य जमवाजमव सुरु असून, पश्चिम सीमेवरून पाकिस्तानी सैन्य कमी करून ते जम्मू-काश्मीरजवळच्या पूर्व सीमेवर तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भारत-पाक सीमेवर युद्धाचे ढग तयार झाल्याचे वातावरण आहे, एएनआयने यासंबंधी अधिकृत वृत्त दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारत-पाकिस्तान शत्रुत्त्वामुळे अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागतील: डोनाल्ड ट्रम्प
पुलवामा जिल्ह्यातील भ्याड हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील परिस्थिती चिघळताना दिसत आहे. जागतिक बलाढ्य देश असलेल्या अमेरिकेतून देखील सतर्कतेचे इशारे दिले जात आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती अतिशय भयानक आहे, असे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. तसेच भारत आता मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे, असे ट्विटदेखील त्यांनी केले आहे. त्यांनी पाकिस्तानला सज्जड दम दिला असून १३० कोटी रुपयांची मदत रोखली आहे. पाकिस्तानने अमेरिकेचा विश्वासघात केला असेही ते म्हणाले. दरम्यान, पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना ट्रम्प यांनी उचलेलं हे पाऊल म्हणजे भारतासाठी एक प्रकारे मदत समजली जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुरावे! पुलवामा हल्ल्याच्या दिवशी नरेंद्र मोदी संध्याकाळपर्यंत फोटोशूट करत होते?
पुलवामा येथे झालेल्या भ्याड आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे तब्बल ४० जवान शहीद झाले आहेत. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतरही ‘प्राइम टाइम मिनिस्टर’ ३ तास शूटिंगमध्ये व्यस्त होते अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी (२२ फेब्रुवारी) केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानकडून भारताविरुद्ध युद्धाची तयारी, लष्कर आणि रुग्णालयं सज्ज
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत प्रत्युत्तर देत कारवाई करेल या भीतीने पाकिस्तानने स्वतःच युद्धाची पूर्वतयारी करण्यात सुरुवात केली आहे. जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोणत्याही परिस्थितीत भारताच्या दबावात येऊ नका असं सांगितलं असून यानंतरच पाकिस्तानने युद्धाची तयारी सुरु केल्याचं दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
UN सुरक्षा परिषदेत देखील पाकिस्तानची कोंडी, चीनचं भारताला समर्थन
पुलवामामधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भारताला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत असल्याचं दिसत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अर्थात UNSCने देखील हा दहशतवादी हल्ला अत्यंत भयानक आणि भ्याड असल्याचं सांगत कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पंधरा देशांचा समावेश असून यामध्ये चीनचा देखील समावेश आहे. सुरक्षा परिषदेने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा उल्लेख करत अशा हल्ल्यांसाठी जबाबदार दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. दरम्यान, हा पाकिस्तानसाठी मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
सीबीआय'ची चंदा कोचर यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस, देश सोडून जाण्यास मनाई
व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणात दोषी आढळलेल्या चंदा कोचर यांच्याविरोधात CBIने लूकआऊट नोटीस जारी केली आहे. चंदा कोचर यांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. सीबीआयने सर्व विमातळांवरील इमिग्रेशन विभागाला चंदा कोचर यांनी देश सोडून जाण्याचा प्रयत्न केल्यास तशी माहिती आम्हाला दिली जावी असं सांगितलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबईकरांनो सावध आणि सतर्क राहा! लाइफलाइनवर दहशतवादी हल्ल्याचा हाय अलर्ट
मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर आगामी ३ महिन्यांत दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा भारताच्या गुप्तचर संघटनांनी दिला आहे. त्या धर्तीवर रेल्वेने सुरक्षाव्यवस्थेत वाढ करत अतिदक्षेचा इशारा जारी केला आहे. लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी अरबी समुद्रमार्गे मुंबईत घुसण्याची विश्वसनीय माहिती सुरक्षा यंत्रणांच्या हाती आली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईसह संबंध महाराष्ट्रात हाय अलर्ट असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क आहेत.
6 वर्षांपूर्वी -
सर्जिकल स्ट्राइकचे हिरो डी. एस. हुडा यांचा राहुल गांधींना 'हात'
लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसनं राष्ट्रीय सुरक्षेसाठी एका कृती दलाची स्थापना केली आहे. सर्जिकल स्ट्राइकचं नेतृत्व करणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांच्याकडे या कृती दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. देशासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचं काम हुडा यांच्याकडे असेल. ते देशाच्या सुरक्षेशी संबंधित तज्ज्ञांची मतं विचारात घेऊन सदर आराखडा तयार करतील. सर्जिकल स्ट्राइक दरम्यान हुडा नॉर्दन आर्मीचे कमांडर होते.
6 वर्षांपूर्वी -
राफेल करार; पुनर्विचार याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालय तयार
राफेल कराराप्रकरणी नरेंद्र मोदी सरकारला क्लीन चिट देणाऱ्या निकालासंदर्भात दाखल झालेल्या पुर्नविचार याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात १४ डिसेंबर रोजी दिलेल्या निकालात राफेल करारात सरकारच्या निर्णय प्रक्रियेत त्रुटी आढळलेल्या नाही, असे स्पष्ट करतानाच या कराराच्या चौकशीची मागणी फेटाळली होती.
6 वर्षांपूर्वी -
पुलावामा हल्ला: देश दुःखात बुडाला, पण मोदी कॉर्बेट पार्कात शूटिंग करत होते: काँग्रेसने पुरावे दिले
पुलवामा जिल्ह्यात दहशदवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात १० जवान शहीद झाले. त्यानंतर संपूर्ण देश दुःखात बुडाला असताना नरेंद्र मोदी नेमके काय करत होते याचे पुरावे सादर करण्यात आले आहे. जवान शहीद झाल्यानंतर देशात सर्वांनी एकत्र येण्याची हाक सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी दिली होती. त्यानंतर विरोधकांनी देखील सामंज्याची भूमिका घेत सरकारला सहकार्य देखील केलं. वातावरण भावनिक असल्याने विरोधकांनी कोणतेही प्रश्न उपस्थित केले असते तर मोदींनी त्याच राजकारण केलं असतं हे विरोधकांना चांगलेच ठाऊक होतं. कारण, स्वतः भाजपचे नेते म्हणजे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ हे सर्वच प्रमुख नेते प्रचारात व्यस्त होते. त्यात हद्द म्हणजे, दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावून स्वतः नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये प्रचारासाठी गेले आणि तेथे सुद्धा लष्कराच्या नावाने स्वतःचा आणि पक्षाचा प्रचार केल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
किसान सभेचा भव्य लाँग मार्च मुंबईच्या दिशेनं रवाना
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत किसान सभेच्या शिष्टमंडळाने बुधवारी रात्री तब्बल दीड तास चर्चा केली. परंतु, ही चर्चा पूर्णतः निष्फळ ठरली आहे. कारण या चर्चेतून लॉंग मार्च रोखण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची तोडगा निघू शकलेला नाही.
6 वर्षांपूर्वी -
गुप्तचर यंत्रणांचा इशारा! जैश-ए-मोहम्मद मोठा हल्ला करण्याच्या तयारीत
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात यश मिळाल्याने जैश-ए-मोहम्मदने आधीपेक्षा देखील भयानक आत्मघाती हल्ला करण्याची मोठी योजना आखल्याची खात्रीलायक माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यानुसार १६ ते १७ फेब्रुवारीदरम्यान जैश-ए-मोहम्मदच्या प्रमुखांची आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांमध्ये संभाषण झालं असून त्याआधारेच गुप्तचर यंत्रणांनी सदर इशारा दिला आहे. १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे तब्बल ४० जवान शहीद झाले.
6 वर्षांपूर्वी -
अनिल अंबानींना कोर्टाचा दणका; ४ आठवड्यात ४५३ कोटी द्या, अन्यथा ३ महिन्यांचा तुरुंगवास
रिलायन्स कम्युनिकेशन्स विरोधातील एरिक्सन इंडियाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला आहे. अनिल अंबानी यांनी ४ आठवड्यामध्ये थकवलेले ४५३ कोटी रुपये भरावे, अन्यथा ३ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगण्यास तयार रहावे, असे निर्णयाअंती बजावले आहे.
6 वर्षांपूर्वी -
IPL - १२ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर
लोकसभा निवडणुकीच्या काळात देशात इंडियन प्रीमिअर लीगही अर्थात आयपीएलच्या १२ व्या हंगामाचे सामने देखील रंगणार आहेत. आज वेळापत्रक जाहीर करण्यात आले. २३ मार्चपासून सुरू होणा-या लीगच्या पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू हे एकमेकांसमोर ठाकणार आहेत. लोकसभा निवडणुका लक्षात ठेवता २३ मार्च ते ५ एप्रिल पर्यंत पहिल्या २ आठवड्यांचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारतात निवडणुकीचा काळ, त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवा अशा चर्चेने जोर धरला : इमरान खान
भारताने कोणतीही आगळीक करून युद्ध छेडल्यास पाकिस्तान उत्तर देण्याचा विचार करणार नाही तर थेट प्रतिउत्तर देईल, अशी उघड धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार परिषद आयोजित करून दिली आहे. दरम्यान, भारतात सध्या निवडणुकीचा काळ असल्याने, पाकिस्तानला धडा शिकवा चर्चा जोर धरू लागली आहे आणि मी ते समजू शकतो, असं सांगत नरेंद्र मोदी आणि भाजपाला टोला लगावला.
6 वर्षांपूर्वी -
युद्ध छेडल्यास विचार करणार नाही, पाकिस्तान थेट उत्तर देईल: इमरान खान
भारताने कोणतीही आगळीक करून युद्ध छेडल्यास पाकिस्तान उत्तर देण्याचा विचार करणार नाही तर थेट प्रतिउत्तर देईल, अशी उघड धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार परिषद आयोजित करून दिली आहे. दरम्यान, भारतात सध्या निवडणुकीचा काळ असल्याने, पाकिस्तानला धडा शिकवा चर्चा जोर धरू लागली आहे आणि मी ते समजू शकतो, असं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलं.
6 वर्षांपूर्वी -
RBI केंद्र सरकारला २८ हजार कोटी रूपये देणार
RBI ने केंद्र सरकारला २८,००० कोटी रूपयांची अंतरिम शिलकीची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. आज आरबीआयच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सदर निर्णय निश्चित करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली देखील या बैठकीस उपस्थित होते. सलग दुसऱ्या वर्षी आरबीआय सरकारला अंतरिम शिल्लक हस्तांतरित करत आहे. मागील अनेक दिवसांपासून यावर चर्चा सुरू होती. याच मुद्यावरून सरकारबरोबर मतभेद झाल्याने आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, अशी चर्चा मध्यंतरी रंगली होती.
6 वर्षांपूर्वी -
भारतीय हॅकर्स जाम भारी! पाकिस्तानच्या तब्बल २०० वेबसाईट्स हॅक
पुलवाम येथे CRPFच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्याची घटना सर्वच भारतीयांच्या मनात घर करून राहिली आहे. त्यामुळे संतापलेल्या भारतीय हॅकर्सने पाकिस्तानवर सायबर हल्लाच चढवला आहे. भारतीय हॅकर्सने पाकिस्तानमधील तब्बल २०० वेबसाईट्स हॅक केल्या असून त्यात सर्वाधिक भरणा हा सरकारी वेबसाईट्सचा आहे. भारतामधील ‘टीम आय क्रू’ या गटाने हा सायबर हल्ला केल्याचे बोलले जात आहे. हॅक झालेल्या साईट्सवर या गटाचे नाव झळकताना दिसले तसेच काही वेबसाईट्स वर लढाऊ विमानातून तिरंगी धूर येताना दिसत होता.
6 वर्षांपूर्वी -
भारतीय लष्कराचा ‘जैश’ला दणका, काश्मीरमध्ये कमांडर कामरानचा खात्मा झाल्याचं वृत्त
चार दिवसांपूर्वी पुलवामामध्ये दहशदवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. परंतु अजून देखील सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती संपण्याचे नावच घेत नाही.
6 वर्षांपूर्वी