महत्वाच्या बातम्या
-
पंतप्रधान मोदींनी लष्करी गुपिते अनिल अंबानींना सांगून देशद्रोह केला: राहुल गांधी
भारतीय हवाईदलासाठी राफेल लढाऊ विमाने खरेदीचा करार फ्रान्ससोबत होण्यापूर्वीच त्या विषयीची महत्वाची माहिती उद्योगपती अनिल अंबानी यांना सांगून मोदींनी देशाच्या संरक्षण विषयक अशा अत्यंत गोपनीय कायद्याचा भंग करीत एक प्रकारे देशद्रोहाचा गुन्हा केला असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल केला. स्वत:ला देशाचा चौकीदार समजणाऱ्या मोदींवर या महाभयंकर गुन्ह्याबद्दल खटला चालवून त्यांना तुरुंगात पाठवायला हवे, अशी मागणी सुद्धा त्यांनी उचलून धरली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजप मंत्र्यांची 'सुसाट' फेक-ट्रेन, त्यावर तत्पर प्रवक्ते, तर भक्तांचं 'ओन्ली मोदीजी'
समाज माध्यमांवर आज जी खोट्या प्रचाराची बीज रोवली गेली त्याला सर्वाधिक कारणीभूत म्हणजे भारतीय जनता पक्ष असंच म्हणावं लागेल. अनेक सुशिक्षित तरुणांना देखील त्यांच्या सामाजिक तसेच राजकीय अज्ञानाचा फायदा घेत खोट्या व्हिडिओ आणि एडिटेड गोष्टींच्या आधारे सत्ताधाऱ्यांनी मूर्ख बनवलं आहे. त्यात भाजपच्या अनेक मंत्र्यांचा, आमदारांचा, खासदारांचा आणि त्यांच्या आयटी सेलचा मोठा वाटा आहे. आजही त्याच खोट्या गोष्टींच्या आधारे लोकांना मूर्ख बनवण्याचे प्रकार खुलेआम सुरु आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मोदी भ्रष्टच, अनिल अंबानींनी राफेल प्रकरणी दलालाची भूमिका बजावली: राहुल गांधी
नरेंद्र मोदी यांना राफेल लढाऊ विमानांचे प्रकरण भोगण्याची शक्यता प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व्यक्त करत आहेत. सदरप्रकरणी अनेक कागदपत्र आणि इतर पुरावे देखील समोर येण्यास सुरुवात झाली आहे. राफेल विमान करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा चौफेर हल्ला चढवला. अनिल अंबानी यांनी राफेल करार होण्यापूर्वी फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या भेटीचा धागा पकडत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. राफेल विमान करारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानींसाठी मध्यस्थाची भूमिका बजावली होती, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच नरेंद्र मोदी हे भ्रष्ट व्यक्ती असून, त्यांच्यावर खटला चालवून त्यांना तुरुंगात डांबले पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
राजस्थानमध्ये गुज्जरांचे आंदोलन तीव्र; रेल्वे पटरीवरच तंबू ठोकले
आरक्षणाच्या मुद्यावरून गुज्जर समाजाचे हिंसक आंदोलन आज देखील सुरूच आहे. त्यामुळे राज्यसरकारच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. सरकारी नोकऱ्या तसेच शिक्षणात एकूण ५ टक्के राखीव जागांच्या मागणीसाठी सुरू केलेले आंदोलन तीव्र आणि हिंसक होताना दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
दिल्लीत अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये ‘अग्नितांडव’; १७ जणांचा मृत्यू
दिल्लीत करोलबागमधील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये आज पहाटे ४ वाजता भीषण आग लागली होती. या आगीत होरपळून जवळपास १७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या राफेल खरेदी घोषणेच्या १५ दिवस आधीच अनिल अंबानींचा फ्रान्स दौरा
फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेच्या पंधरा दिवस आधीच उद्योगपती अनिल अंबानी यांनी फ्रान्सच्या तत्कालीन संरक्षण अधिकाऱ्यांची खासगी भेट घेतल्याचे खात्रीलायक वृत्त इंडियन एक्स्प्रेसच्या हाती आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
RBIच्या कचाट्यात अडकू नये म्ह्णून मोदींनी राफेल व्यवहारासाठी ‘एस्क्रो’ अकाऊंटची अटच रद्द केली
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत ‘ना खाऊंगा और ना खाने दुंगा’ असा भ्रष्टाचारमुक्तीचा नारा देत सत्तेवर विराजमान झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खराखुरा चेहरा लवकरच देशासमोर येणार आहे. कारण, मोदी सरकार यामध्ये पुरते फसण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदींनी धारण केलेला प्रामाणिकपणाचा, देशप्रेमाचा आणि तारणहारतेचा मुखवटा टराटरा फाटला आहे. नरेंद्र मोदींनी राफेल विमान खरेदी करण्याचे संरक्षण खात्याचे आणि संरक्षण दलाचे अधिकारच काढून घेतले आणि धक्कादायक म्हणजे स्वत: फ्रान्सच्या डॅसॉल्ट आणि एमबीडीए कंपन्यांशी करार केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भात ‘द हिंदू’ या वृत्त पत्राने कागदोपत्रांच्या आधारे सविस्तर बातमी दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींचं वास्तव समोर! राफेल खरेदी कराराच्या आदल्या दिवशी ८ अटीच काढून टाकल्या
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत ‘ना खाऊंगा और ना खाने दुंगा’ असा भ्रष्टाचारमुक्तीचा नारा देत सत्तेवर विराजमान झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खराखुरा चेहरा लवकरच देशासमोर येणार आहे. कारण, मोदी सरकार यामध्ये पुरते फसण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदींनी धारण केलेला प्रामाणिकपणाचा, देशप्रेमाचा आणि तारणहारतेचा मुखवटा टराटरा फाटला आहे. नरेंद्र मोदींनी राफेल विमान खरेदी करण्याचे संरक्षण खात्याचे आणि संरक्षण दलाचे अधिकारच काढून घेतले आणि धक्कादायक म्हणजे स्वत: फ्रान्सच्या डॅसॉल्ट आणि एमबीडीए कंपन्यांशी करार केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भात ‘द हिंदू’ या वृत्त पत्राने कागदोपत्रांच्या आधारे सविस्तर बातमी दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या खरा चेहरा उघड; राफेल खरेदीतील भ्रष्टाचारासाठी तब्बल ८ अटी रद्द केल्या
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत ‘ना खाऊंगा और ना खाने दुंगा’ असा भ्रष्टाचारमुक्तीचा नारा देत सत्तेवर विराजमान झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खराखुरा चेहरा लवकरच देशासमोर येणार आहे. कारण, मोदी सरकार यामध्ये पुरते फसण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदींनी धारण केलेला प्रामाणिकपणाचा, देशप्रेमाचा आणि तारणहारतेचा मुखवटा टराटरा फाटला आहे. नरेंद्र मोदींनी राफेल विमान खरेदी करण्याचे संरक्षण खात्याचे आणि संरक्षण दलाचे अधिकारच काढून घेतले आणि धक्कादायक म्हणजे स्वत: फ्रान्सच्या डॅसॉल्ट आणि एमबीडीए कंपन्यांशी करार केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भात ‘द हिंदू’ या वृत्त पत्राने कागदोपत्रांच्या आधारे सविस्तर बातमी दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजप आघाडीत ४० छोटे-मोठे पक्ष, तरी मोदी विचारतात माझ्याविरोधात महाआघाडी का करता?
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोदींनी देशभर प्रचार सुरु केला आहे. त्यानिमित्त मोदींनी विरोधकांच्या आघाडीवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान म्हणाले, ‘मी पंतप्रधान म्हणून अपयशी ठरलो असं म्हणता, मग माझ्याविरोधात आघाडी करण्याची गरज का भासते, असा सवाल मोदींनी विरोधकांना विचारला. विरोधकांची महाआघाडी म्हणजे महाभेसळ असल्याचा पुनरुच्चार नरेंद्र मोदींनी यावेळी केला. केवळ घराणेशाही पुढे नेण्यासाठीच महाआघाडी केली जात असल्याचा आरोप त्यांनी सभेदरम्यान केला. त्यांचा प्रयत्न तामिळनाडूसह देशातील जनता कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असंही ते म्हणाले.तामिळनाडूतील तिरुपूरमध्ये त्यांची सभा पार पडली.
6 वर्षांपूर्वी -
प्रियंका गांधींच्या रोडशोला लखनऊमध्ये तुफान गर्दी
काँग्रेस पक्षाच्या सक्रिय राजकारणात सहभागी झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियंका गांधी आज ११ फेब्रुवारीपासून ४ दिवसांचा दौरा करणार आहे. काही वेळापूर्वीच प्रियांका गांधी विमानतळावर दाखल झाल्या असून कार्यकर्त्यांकडून त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. त्यांच्यासोबतच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदे देखील लखनऊमध्ये दाखल झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
प्रयांका गांधींसोबत 'प्रियंका सेना' देखील सज्ज
भारतीय जनता पक्ष प्रत्येक गोष्ट इव्हेन्टसारखी लोकांपर्यंत पोहोचवत असताना आता काँग्रेसने देखील कुठेही मागे न राहण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी मुखवटे आणि टी-शर्ट घालून भाजपचे कार्यकर्ते नक्कीच पहिले असतील. परंतु, आता प्रियांका गांधींसाठी सुद्धा प्रियांका सेने सज्ज झाली आहे. काँग्रेसच्या युपीच्या महासचिव प्रियंका गांधींमध्ये दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींची छबी आहे, असे काँग्रेसबरोबरच अनेक सामान्य लोकांनां सुद्धा वाटतं. यामुळे हा दावा खरा ठरविण्यासाठी इंदिरा गांधींच्या तत्कालीन वानरसेनेच्या धर्तीवर प्रियंका सेना तयार करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
प्रियंका गांधींचा आज लखनौमध्ये रोड शो, आजपासून भाजपविरोधात रिंगणात
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने युपीच्या पूर्व भागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी पहिल्यांदाच युपीच्या दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान, त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राज्याच्या पश्चिम भागाची जबाबदारी असलेले काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे हे सुद्धा उपस्थित असतील.
6 वर्षांपूर्वी -
गुर्जर आंदोलनाला हिंसक वळण, अनेक ठिकाणी दगडफेक अन् गोळीबार
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजस्थानमध्ये गुर्जर आंदोलनाने पेट घेतला आहे. त्यामुळे नवनियुक्त कॉग्रेस सरकारच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, राजस्थानमधल्या गुर्जर समाजानं छेडलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे. आक्रमक आंदोलकांनी धोलपूरमध्ये तुफान दगडफेक आणि गोळीबार केल्याचे वृत्त आहे. तसेच ३ गाड्यांची देखील जमावाकडून जाळपोळ करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत पक्षाला यूपीत फक्त २० जागा, मोदी-शहांचं स्वप्नं भंग होणार
लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येते आहे. तस तसे राजकीय समोर येणारे अंदाजित आकडेवारी सर्वच पक्षांची धाकधूक वाढली आहे. त्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा स्वतःची ताकद अजमावण्यासाठी पक्षांतर्गत सर्व्हेसुद्धा करून घेतला आहे. मात्र, या सर्व्हेमुळे भाजपाची झोप उडाली आहे. कारण भारतीय जनता पक्षाला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हिंदी पट्ट्यातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या एकूण जांगांमध्ये मोठी घट होणार आहे, असे निष्कर्ष त्यात नमूद करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त भाजपच्या गोटातून प्रसार माध्यमांकडे आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
NRC वरून संपूर्ण आसाम भाजपविरोधात पेटण्याची शक्यता?
आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक अर्थात NRC नोंदणी प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याचे निरीक्षण नोंदवताना, कोणीही भारताला इस्लामिक देश करण्याचा प्रयत्न करु नये असे मत मेघालय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुदीप रंजन सेन यांनी याचिकेच्या सुनावणी दरम्यान व्यक्त केले आहे. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर धर्माच्या आधारे भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित केले पाहिजे होते, परंतु भारताने धर्म निरपेक्ष भूमिका स्वीकारली, असे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले.
6 वर्षांपूर्वी -
सत्ताकाळात महायुद्ध जिंकली, पण लष्कराचा स्वतःच्या प्रचारासाठी वापर नाही केला
भारतीय लष्कर म्हटलं की तो सामान्य भारतीयाचा एक भावनिक आणि जिव्हाळ्याचा विषय. वास्तविक भारतीय लष्कराला कोणतीही जात धर्म आणि भाषा नसते. पाकिस्तानसोबत २ महायुद्ध आणि १ चीनसोबत असा भारतीय लष्कराचा मोठा इतिहास आहे. त्यात पाकिस्तानला २ महायुद्धात धूळ चारण्याऱ्या भारतीय लष्कराच्या गाथा तितक्याच भव्य आहेत. त्यावेळचा काळ म्हणजे काँग्रेसचा आणि काँग्रेसी राजकारणाचा अशीच तत्कालीन राजकीय परिस्थिती होती. तरी लष्कर हे सार्वभौम समजून त्या भारतीय लष्कराला थेट राजकीय पक्षाशी जोडून स्वतःचा किंवा स्वतःच्या पक्षाचा प्रचार करण्याचा किळसवाणा प्रकार कधी घडला नाही, किंबहुना सध्या जसं सुरु आहे त्याप्रमाणे तर नक्कीच नाही.
6 वर्षांपूर्वी -
सत्ताकाळात स्मारक व पुतळ्यांवर खर्च केलेले पैसे परत करा: सुप्रीम कोर्ट
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाकडून बसपा अध्यक्षा मायावतींना जोरदार झटका मिळाला आहे. उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री पदी विराजमान असताना, आपल्या पदाच्या गैरवापर करत स्मारक तसेच पुतळ्यांवर वारेमाप खर्च केलेले पैसे परत करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, पदाचा गैरवापर करत मायावतींनी सामान्य जनतेच्या पैशाचा दुरुपयोग करून लखनौ आणि नोएडामध्ये स्वतःच्या पक्षाचे चिन्ह असलेल्या हत्तीचे पुतळे बांधले होते, हा सामान्य जनतेच्या पैशाचा मोठा गैरवापर आहे असा निर्णय CJI रंजन गोगाई यांच्या खंडपीठाने दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
'चौकीदार ही चोर है' असं आता संरक्षण मंत्रालय सुद्धा म्हणतंय: राहुल गांधी
राफेल लढाऊ विमानांच्या करारात पंतप्रधानांनी थेट हस्तक्षेप केला. उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कंपनीला राफेलचं कंत्राट मिळावं म्हणून त्यांनी समांतर वाटाघाटी सुरु केल्या, असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, पंतप्रधानांनी फ्रान्ससोबत थेट वाटाघाटी केल्यानं भारतीय संरक्षण मंत्रालयाची बाजू कमकुवत झाली, असं वृत्त आज ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्रानं दिले आणि त्यानंतर खळबळ माजली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान कार्यालयाची ट्विटवरून कबुली, नरेंद्र मोदींनी देशातील संस्था नष्ट केल्या
देशातील विरोधकांनी नेहमीच नरेंद्र मोदींवर देशातील महत्वाच्या मोठ्या संस्था उध्वस्थ केल्याचा आरोप केला आहे. अर्थात मोदींनी ते कधीच मान्य केलं नसलं तरी त्यांच्या पंतप्रधान कार्यालयाने ते एका ट्वीटमध्ये मान्य केल्याचे म्हणावे लागेल. कारण याट्विटमध्ये मोदी स्वत:वरच आरोप करताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी