महत्वाच्या बातम्या
-
केजरीवाल सरकारचा अर्थसंकल्प 'आधुनिक शाळांचा' तर योगी सरकारचा 'गोशाळांचा'
आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारचा तिसरा अर्थसंकल्प युपीच्या विधानसभेत सादर झाला. दरम्यान, लवकरच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने योगी सरकारची मोठी कसोटी लागणार होती आणि त्यामुळे त्याला महत्व प्राप्त झाले आहे. युपीचे अर्थमंत्री राजेश अग्रवाल यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला.
6 वर्षांपूर्वी -
ईडीकडून रॉबर्ट वाड्रा यांची आज पुन्हा चौकशी झाली
प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात उतरताच त्याचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या पाठीमागे ईडी’चा ससेमिरा लागल्याचे विरोधक आरोप करत आहेत. दरम्यान आज मनी लाँड्रिंगप्रकरणाच्या चौकशीसाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांदी यांचे पती रॉबर्ट वाड्रा ईडीच्या कार्यालयात हजर झाले. ईडीकडून त्यांची तब्बल ५ तास सखोल चौकशी झाल्याचे सांगण्यात येते.
6 वर्षांपूर्वी -
RBI द्वैमासिक पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात
रिझर्व्ह बँकेनं आज द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं आहे. त्यानुसार रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं आता नवा रेपो रेट ६.५० टक्क्यांवरून ६.२५ टक्के असा असणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळं बँकांचे व्याजदर कमी होऊन, गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
दिवाळखोरी आरकॉमची, फटका संरक्षण विषयक राफेल प्रकल्पाला?
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपमधील आरकॉमने काही दिवसांपूर्वी स्वत:ला दिवाळखोर घोषित करण्यासाठी कायदेशीर अर्ज केल्याने, त्यांच्या दुसऱ्या कंपनीच्या संबंधित नागपूरमधील राफेल लढाऊ विमानांसंबंधित ऑफसेट प्रकल्प रखडण्याची चर्चा आहे. Rcom कडून दिवाळखोरीचा अर्ज केल्यानंतर, मागील ३ दिवसांत रिलायन्स एडीएजीच्या ४ प्रमुख कंपन्यांचे शेअर्स तब्बल २० ते ५० टक्क्याने कोसळले.
6 वर्षांपूर्वी -
हवाई दलाची जवानांसाठी जुनी विमाने; जीव गमावलेल्या वैमानिकाच्या भावाचा संताप
मागील आठवड्यात बंगळुरु येथे मिराज २००० या लढाऊ विमानातून सराव करते वेळी विमानाचा अपघात होऊन स्क्वॉड्रन लीडर समीर अब्रोल आणि सिद्धार्थ नेगी या दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा मंगळवारी इंदापूर तालुक्यात कार्वर विमानाला अपघात होऊन सिद्धार्थ हा वैमानिक जखमी झाला. यानंतर या अपघातांबद्दल वादळ उठले आहे. प्रशिक्षण देताना किंवा सरावासाठी हवाई दलाच्या वैमानिकांना व इतर वैमानिकांना जुनी लढाऊ विमाने दिली जातात, ज्यामुळे त्यांचे जीव धोक्यात असतात अशी तक्रार चहूबाजूंनी होत आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: ‘अपनी बात राहुल के साथ’, राहुल गांधींचा जनतेशी थेट संवाद!
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निरनिराळ्या रणनीतीचा अवलंब करताना दिसत आहेत. आता त्यांनी थेट जनतेशी संवाद साधण्यासाठी आणि मोदींच्या ‘चाय पे चर्चा आणि मन की बात’ला टक्कर देण्यासाठी ‘अपनी बात राहुल के साथ’ हा संवाद उपक्रम राबविणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
गडकरी कटकारस्थानी स्वभावाचे नाहीत, काही असतं तर सर्वात आधी मला सांगतील
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विधानांवर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘नितीन गडकरींचा स्वभाव अतिशय सौम्य आहे. कटकारस्थान करणं हा त्यांचा नैसर्गिक स्वभाव नाही. त्यांच्या मनात जर एखादी इच्छा असेल, तर ते सर्वात आधी मला सांगतील,’ असं भागवत म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
इस्त्रोची उतुंग भरारी, G-SAT-३१ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था अर्थात ISRO ने उपग्रहांचे प्रक्षेपण करणाऱ्या युरोपियन कंपनीच्या एका प्रक्षेपण यानाद्वारे देशाच्या नवीन संचार उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे. इस्रोने जीसॅट-31 या उपग्रहाचे आज मध्यरात्री २.३१ वाजता फ्रेंच गुयाना च्या स्पेसपोर्टवरून यशस्वीरित्या अवकाशात झेपावले.
6 वर्षांपूर्वी -
ग्राम परिवर्तन; यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल, कार्यक्षम जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखांची कामगिरी: सविस्तर
ग्रामीण भागात विकास साध्य करायचा म्हटलं की आधी तिथल्या सामान्य लोकांप्रती प्रामाणिक आस्था आणि तिथे भेडसावणाऱ्या मूळ समस्यांचा अभ्यास करणे सुद्धा तितकेच गरजेचे असते. परंतु, लोकाभिमुख विकास साधायचा म्हटल्यावर विषय जिल्ह्यातील प्रशासकीय सेवेवर येऊन थांबतो, असा साहजिकच विचार प्रत्येकाच्या मनात येतो. मात्र, देशभरात मोजकेच प्रामाणिक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आहेत जे प्रशासनातील अधिकारांचा अभ्यासपूर्ण वापर करतात आणि ग्रामीण भागातील लोकाभिमुख विकास तसेच विविध योजना सत्यात उतरवताना दिसतात. त्यातीलच एक नाव म्हणजे यवतमाळ जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख ज्यांच्यामुळे ग्राम परिवर्तनात यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मार्केटिंग शिकावं तर भाजपकडून, असं केलं ५ वर्ष हुशारीने कमळ ब्रॅण्डिंग? सविस्तर
सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. त्यासाठी सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. कोणतीही निवडणूक जिंकायची म्हटल्यावर केवळ पक्षाची मोठी नेतेमंडळी मतदाराला माहित असून चालत नाही, तर त्या आवडत्या नेत्याचं किंवा त्या पक्षाचं निवडणूक चिन्ह कोणतं आहे, हे सुद्धा माहित असणं अत्यंत गरजेचं असतं. कारण संबंधित पक्षाचा आवडता नेता किंवा अध्यक्ष माहित आहे, परंतु त्याच्या पक्षाचं चिन्हच जर चाहत्या मतदाराला माहित नसेल तर सर्वच शून्य आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोणत्याही निवडणुका आल्या की सीबीआय'च्या धाडी कशा पडतात? ममता बॅनर्जी
मोदी सरकार, सीबीआय विरुद्ध ममता बॅनर्जी सरकार ही न्यायालयीन लढाई आता अटळ आहे. देशातील स्वायत्त संस्था असलेल्या CBI ला थेट आव्हान देत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उपोषणाला बसल्या आहेत. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रातील भाजपा सरकारने सीबीआयचा स्वतःसाठी राजकीय वापर केल्याचा ममतांचा आरोप केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
IND Vs NZ : न्यूझीलंडसमोर २५३ धावांचे आव्हान
विजय शंकरचं अर्धशतक ५ धावांनी, तर रायुडूचं शतक १० धावांनी हुकलं आहे. रायुडूनं ९० धावांच्या खेळीला ८ चौकार आणि ४ षटकारांचा साज चढवला. तर शेवटी हार्दिक पंड्याने २२ चेंडूत २चौकार आणि ५ षटकारांसह ४५ धावांची खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडसमोर २५३ धावांचे लक्ष देण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
साडेचार वर्ष स्वतःच्या 'मन की बात,' पण आता निवडणुकीआधी ‘भारत के मन की बात’
२०१४ मध्ये भारतात भाजपाची सत्ता स्थापन झाली आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा पासून संपूर्ण देशाला केवळ तब्बल साडेचार वर्ष स्वतःच्या ‘मन की बात’ ऐकवणारे मोदी आता लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने ‘भारत के मन की बात’ मोहीम सुरु करणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
अमेरिकेत अवैधरीत्या घुसणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी देशाच्या दक्षिण मेक्सिको सीमेवर मोठी भिंत उभारण्यासाठी आपण लवकरच राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याच्या विचारापर्यंत पोहोचलो आहोत, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अप्रत्यक्ष संकेत दिल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
पश्चिम रेल्वेवरील तब्बल अकरा तासांचा मेगाब्लॉक संपला
लोअर परळच्या डिलाईल रोड पुलाच्या पाडकाम तसेच बांधकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते दादर दरम्यान तब्बल अकरा तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला. या मेगा ब्लॉकदरम्यान चर्चगेट ते दादर दरम्यान एक सुद्धा लोकल धावली नाही. हा ब्लॉक आता पूर्ण झाला असून पश्चिम रेल्वेवरील वाहतुकीला सुरुवात झाली आहे. आता पश्चिम रेल्वेवरील मेल आणि एक्स्प्रेसची वाहतूक सुद्धा पूर्णपणे सुरळीत झाल्याचे वृत्त आहे. आज सकाळी ८ वाजून ३५ मिनिटांनी पहिली चर्चगेट-विरार लोकल रवाना झाली.
6 वर्षांपूर्वी -
ब्रेकिंग न्यूज: सीमांचल एक्सप्रेसचे नऊ डबे घसरले; सहा ठार
सीमांचल एक्सप्रेसचे ९ डबे रुळावरून घसरून झालेल्या भीषण अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. बिहारमधील सहदाई बुजुर्ग येथे हा अपघात झाल्याचे समजते. दरम्यान, घटनास्थळी डॉक्टरांची टीम रवाना झाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. यासंदर्भात रेल्वेने हेल्पलाईन क्रमांकदेखील जारी केले आहेत. दरम्यान, मृत प्रवाशांमध्ये चार महिलांचाही समावेश आहे.
6 वर्षांपूर्वी -
अनिल अंबानींची रिलायन्स कम्युनिकेशन्स दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय
तब्बल ४० बँकांचे ४६ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा डोक्यावर असलेल्या अनिल अंबानी यांच्या ‘आरकॉम’ अर्थात रिलायन्स कम्युनिकेशन्स या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीने अखेर बिकट आर्थिक परिस्थितीमुळे दिवाळखोरी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर विषयाला अनुसरून कंपनीने राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाच्या मुंबई खंडपीठाकडे कायदेशीर पूर्तता करण्यासाठी धाव घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पत्र मिळालं, आपणास शुभेच्छा; असं एका ओळीत उत्तर देत अण्णांची मोदींकडून हेटाळणी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मागील ५ वर्षांत तब्बल ३८ वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविल्यावर अखेर त्यांनी प्रथमच अण्णांच्या पत्राला केवळ एका ओळीत उत्तर देत त्यांची अप्रत्यक्ष हेटाळणीच केल्याचे म्हटले जात आहे. त्यात अण्णांना उत्तर देताना म्हटलं आहे की, ‘तुमचे १ जानेवारीचे पत्र मिळाले. आपणास शुभेच्छा’ केवळ एवढाच एका ओळीचा उल्लेख संबंधित पत्रात करण्यात आला आहे. परंतु, अण्णांनी विचारलेल्या शेतकऱ्यांच्या, लोकपाल नियुक्ती तसेच प्रत्येक राज्यात लोकायुक्त कायदा याबाबत उत्तर देण्याचे नरेंद्र मोदींनी स्पष्ट टाळले आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुणे: प्रसिद्ध अमृततुल्यवर अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
मागील अनेक महिन्यात पुण्यात प्रचंड प्रमाणावर प्रसिद्धीस आलेल्या आणि शहरातील काॅर्पाेरेट लुट असणाऱ्या अमृततुल्यावर राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई केली आहे. एकही परवाना न घेता तसेच विना नाेंदणी चहा विक्री करणाऱ्यांच्या विराेधात राज्य एफडीएकडून धडक कारवाई करण्याची जोरदार माेहिम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, या धडक कारवाईत बुधवार पेठेतील प्रसिद्ध येवले अमृततुल्य तसेच साईबा अमृततुल्यच्या विविध शाखांवर धाडी टाकण्याचे सत्र सुरु आहे.
6 वर्षांपूर्वी -
ते ४८ तास सावधान! या नियमाच्या आड कोणीही विजयी उमेदवारावर आधीच ट्रॅप लावू शकतो? सविस्तर
नगरसेवक पदाच्या निवडणुकीत आरक्षणामुळे अनेक विजयी उमेदवार खोटे शिक्षणाचे दाखले, जातीचे दाखले तसेच संपत्तीबद्दलची खोटी माहिती निवडणूक आयोगाला दिल्यामुळे, त्यांचं नगरसेवक पद रद्द होण्यापर्यंत विषय जाऊन पोहोचतो. परंतु, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत याचा त्रास नसला तरी भविष्यात या नव्या नियमामुळे अनेक विजयी उमेदवार भविष्यात निवडणूक आयोगाच्या कचाट्यात अडकून स्वतःची खासदारकी किंवा आमदारकी गमावून बसू शकतात. विशेष म्हणजे कोणीही राजकीय विरोधक प्रतिस्पर्धीना मतदानाच्या ४८ तास आधी शिस्तबद्ध अडकवू शकतात.
6 वर्षांपूर्वी