महत्वाच्या बातम्या
-
मणिकर्णिका चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका, प्रकृती चिंताजनक
अभिनेत्री कंगणा राणावत हिचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘मणिकर्णिका’चे निर्माते कमल जैन यांना अर्धांगवायूचा झटका आल्याचे वृत्त आहे. कमल जैन यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे समजते. त्यांच्यावर सध्या मुंबईतील कोकीलाबेन इस्पितळात उपचार सुरू असून, त्यांना व्हेंटिलेटरवर मशीनवर ठेवण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मेक्सिकोत गॅस पाइपलाइन फुटून ७१ जणांचा मृत्यू
मेक्सिकोमधील हिडाल्गो शहरात चोरी करण्याच्या प्रयत्नात मुख्य गॅस पाइपलाइन फुटून शुक्रवारी भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अग्नी तांडवानंतर झालेल्या भीषण स्फोटात तब्बल ७१ निरपराधांचे प्राण गेले आहेत. भीषण आगीमुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे आणि अजून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत असे वृत्त आहे. दरम्यान, या धक्कादायक दुर्घटनेतील मृतांचे मृतदेह जवळपास १०० टक्के जळाल्याने अनेकांना ओळखणेच कठीण होऊन बसले आहे.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट कामगारांच्या संपात भाजपाने तेल ओतलं: उद्धव ठाकरे
बेस्ट कामगारांनी तब्बल ८ दिवसांनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने संप मागे घेतला. मात्र मुंबई बेस्ट कामगारांच्या संपात भारतीय जनता पक्षाने तेल ओतलं आणि त्यांनीच कामगारांना शिवसेनेच्या नावाने शहरभर बोंबाबोंब करण्यास सांगितले, अशा रोखठोक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’मधून केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मंत्रालयात वेटरची १३ पद आणि ७००० अर्ज, राज्यातील बेरोजगारीचं भीषण चित्र
भाजप सरकार कितीही रोजगार निर्मितीचे मोठं मोठे दावे करत असलं तरी मंत्रालयातील वेटर या पदासाठी सुरु झालेल्या भरती प्रक्रियेवरून बेरोजगारीचे भीषण वास्तव उघड होत आहे. अगदी चौथी पास पात्रता असलेल्या १३ जागांसाठी तब्बल ७००० अर्ज आले असून, त्यात धक्कादायक म्हणजे सुशिक्षित पदवीधर उमेदवारांची संख्या त्यात सर्वाधिक आहे.
6 वर्षांपूर्वी -
सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी इस्रो भारतीय लष्कराला मदत करणार, विशेष उपग्रह सोडणार
भारत पाकिस्तानच्या सीमेवरुन होणारी दहशतवाद्यांची आणि पाकिस्तानी नागरिकांच्या घुसखोरी या नित्याच्या गोष्टी झाल्या आहेत. त्यामुळे लष्कराला सुद्धा अनेक मर्यादा येत आहेत. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय लष्कराचे सैनिक दिवस-रात्र सीमेवर जागता पहारा देतात, परंतु तरी घुसखोरीला रोखताना अनेक अडथळे येत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारला धक्का; डान्स बार'मधली छमछम सुरु होणार
राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार आहे. कारण महाराष्ट्र सरकारने डान्स बारसाठी घालून दिलेली नियमावली सुप्रीम कोर्टाने आजच्या निकालात रद्द केले आहे. त्यामुळे राज्यभरातील डान्सबार मालकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा डान्स बारमधील छमछम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र सरकारच्या नियमांविरोधात अनेक डान्स बार मालकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या.
6 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातील घाटावर राहणाऱ्या घाटी लोकांना नोकऱ्यांमध्ये स्थान नको, केवळ भूमिपुत्रांना: गोवा पर्यटनमंत्री
गोव्यात लोकसभा निवडणुकीआधी परप्रांतीयांच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्याला अनुसरून गोव्याचे विद्यमान पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी केलेल्या एका विधानानंतर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. गोव्यातील नोकऱ्यांमध्ये परप्रांतीय, विशेषत: महाराष्ट्रातील लोकांना स्थान दिले जाणार नाही. केवळ गोव्यातील लोकांनाच इथे प्राधान्य दिले जाईल, असे गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे भूमिपुत्र विरुद्ध परप्रांतीय मुद्दा तापण्याची चिन्ह आहे.
6 वर्षांपूर्वी -
हम तो फकीर आदमी है? भाजप अति-श्रीमंत झाला, तब्बल ४३७ कोटींच्या देणग्या
देशातील विविध कॉर्पोरेट कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. देशभरातील विविध राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात दिलेल्या अधिकृत माहितीच्या आधारे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सनं अर्थात ‘एडीआर’ ही आकडेवारी सार्वजनिक केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
#Alert: सामान्यांच्या PF'चे २० हजार कोटी रुपये बुडण्याची शक्यता, IL&FS दिवाळखोरीच्या उबरठयावर?
लाखो पगारदार सामान्य लोकांचा आधार असलेली भविष्य निर्वाह तसेच निवृत्ती वेतनाची करोडोची रक्कम बुडण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. आर्थिक क्षेत्रातील तज्ञांच्या मते इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग फायनान्शियल सर्विसेस अर्थात “IL&FS” या ग्रुपमध्ये जवळपास १५ ते २० हजार कोटीच्या भविष्य निर्वाह तसेच निवृत्ती वेतनाच्या निधीची प्रचंड मोठी गुंतवणूक करण्यात आलेली आहे.
6 वर्षांपूर्वी -
हि बाकी 'बेस्ट' बातमी; ८ दिवसांनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
बेस्ट कामगारांनी अखेर ८ दिवसांनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घोषित केला आहे. सदर प्रकरणी मुंबई हायकोर्टाने आता मध्यस्थाची नेमणूक करण्याची सूचना केली आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीत तासाभरात संप मागे घेत असल्याचे जाहीर करा, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. याला कामगार युनियनचे संबंधित नेते आणि वकिलांनी सुद्धा मान्यता दिली आहे. त्यानंतर पूढच्या काही तासाभरातच कर्मचारी युनियनकडून संप मागे घेत असल्याची घोषणा जाहीर होण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
तेलंगणातील राज्यस्तरीय शेतकरी 'रयत बंधू योजनेचा' केंद्राकडून राष्ट्रीय स्तरावर विचार होणार?
मागील काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला हिंदी पट्ट्यातील ३ महत्वाची राज्य गमवावी लागली होती. दरम्यान, या ३ प्रमुख राज्यांमध्ये भाजपला शेतकऱ्यांच्या नाराजीचा सर्वात मोठा फटका बसल्याचे निष्पन्न झाले होते. परंतु, असे असले तरी तेलंगणात मात्र काँग्रेस, टीडीपी आणि भाजप असे मोठे प्रतिस्पर्धी समोर असताना सुद्धा टीआरएस’ला अभूतपूर्व यश प्राप्त झालं होतं.
6 वर्षांपूर्वी -
५ राज्यात पराभवानंतरचा निवडणूक धमाका; ५ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार?
लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना मोदी सरकारकडून नवनव्या घोषणा होताना दिसत आहेत. सध्या मध्यम वर्गाला खुश करण्यासाठी मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सध्या अडीच लाख रुपयांपर्यतचं उत्पन्न हे करमुक्त आहे. परंतु हीच मर्यादा थेट दुप्पट करून ५ लाखांपर्यंत वाढविण्याचा सरकारचा विचार आहे. यामुळे नोटाबंदीमुळे मोठा फटका बसलेलय मध्यम वर्गाला खुश करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न सुरु आहे. याचा थेट फायदा भाजपाला लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो याचा पक्षाला अंदाज आहे.
6 वर्षांपूर्वी -
१५३ रुपयांत १०० टीव्ही चॅनेल दाखवाः दूरसंचार नियामक प्राधिकरण
TV वरील आवडीचे चॅनेल निवडण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ‘ट्राय’ ने ग्राहकांना ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ग्राहकांचे हित लक्षात घेवून ट्रायने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रति महिना १५३ रुपयांत १०० चॅनेल दाखवण्याचे थेट निर्देश ट्रायने केबल ऑपरेटर आणि डीटीएच’सेवा देणाऱ्यांना दिले आहेत. तसेच ग्राहकांनी TV वरील १०० चॅनेलची निवड ३१ जानेवारीपर्यंत करण्याच्या सूचना सुद्धा दिल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपकडून काँग्रेस आमदारांना खरेदी करण्याच्या हालचाली?
कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकारवर पाडण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु असून, वाट्टेल ती किंमत मोजून त्यांची खरेदी केली जाण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ आमदारानेच हा दावा केला असून पक्षाचे तीन आमदार सध्या भारतीय जनता पक्षाच्या थेट संपर्कात असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले आहे.
6 वर्षांपूर्वी -
BEST संप: लोकांना वेठीला का धरता? उच्च न्यायालयाने कामगारांना सुनावलं
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सलग ७व्या दिवशीसुद्धा सुरूच असल्याने सामान्य मुंबईकरांचे प्रचंड हाल सुरुच आहेत. दरम्यान, या संपाबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबद्दल कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट संप: मनसे रस्त्यावर उतरली, कोस्टल रोडचं काम बंद पाडलं, पहिला दणका सत्ताधाऱ्यांना
बेस्ट संपावर तोडगा न काढल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरली आहे आणि पहिला दणका कोस्टल रोडच्या बांधकामाला आणि काँट्रॅक्टरला दिला आहे. कालच मुंबईत तमाशा करु असा इशारा बेस्ट प्रशासनाला दिल्यानंतर मनसे रस्त्यावर उतरली आहे.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट संपामधील एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही : उद्धव ठाकरे
मुंबईमधील बेस्ट संप चर्चेच्या मार्गानं तडीस लावण्यात येईल, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सुरुवातीपासूनच दोन्ही बाजूने चर्चा सुरू आहे. तसेच या संपात सहभागी झालेल्या एकाही कामगाराची नोकरी जाणार नाही, असं आश्वासन सुद्धा उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांसमोर दिलं.
6 वर्षांपूर्वी -
डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेत आणीबाणी लादण्याचा इशारा
अमेरिका-मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठीचा निधी अमेरिकी काँग्रेसने अनेक दिवसांपासून रोखून धरला आहे. त्यामुळे अमेरिकेत ‘शटडाउन’ सुरू आहे. दरम्यान, त्याअनुषंगाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-मेक्सिको सीमाभागाचा दौरा केला. त्यानंतर केलेल्या पाहणीत त्यांनी देशात थेट आणीबाणी लादण्याचा इशारा पुन्हा एकदा पत्रकारांशी संवाद साधताना दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
१० टक्के सवर्ण आरक्षण घटनात्मक पातळीवर टिकेल का? पवार साशंक
आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना मोदी सरकारनं दिलेलं एकूण १० टक्के आरक्षण कोर्टात टिकेल की नाही, याबद्दल एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शंका व्यक्त केली आहे. कोल्हापूर दौऱ्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला असता ही शंका त्यांनी व्यक्त केली. मोदी सरकारकडून सदर निर्णय नेमका कोणासाठी घेण्यात आला आहे?, असा प्रश्न विचारत हे आरक्षण कोर्टात टिकणार नसल्याचं मत अनेक प्रसिद्ध घटनातज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे असं पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, त्यांनी मोदींवर सुद्धा जोरदार निशाणा साधला.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट संप: राऊतांना संगीत व संप यातला फरक कळतो का? 'बेस्ट'च्या संपावर संगीतमय 'चेष्टा'
मागील ५ दिवसांपासून बेस्टचा संप सुरु असून, त्यामुळे बेस्टचे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि सामान्य मुंबईकर असे सर्वच हैराण झाले असताना शिवसेनेचे आणि मुंबई महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून संताप जनक प्रतिक्रिया आली आहे.
6 वर्षांपूर्वी