महत्वाच्या बातम्या
-
Video बघा! म्हणजे आर्थिक आरक्षणामुळे इतर आरक्षणात बेईमानी होणार? की मोदींनी राज यांचा 'तो' मुद्दा ढापला?
नुकतंच मोदी सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत विधेयकाद्वारे सवर्णांसाठी १० टक्के आर्थिक आरक्षणाची तरतूद केली. परंतु, २०१५ साली नरेंद्र मोदी यांनी एका भर सभेत ५० टक्क्यांच्या वर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आरक्षण देता येत नाही. जर द्यायचेच असेल तर इतर उपलब्ध आरक्षणात काही ना काही बेईमानी करावीच लागते, असं जाहीर पणे सांगताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
तुम्हाला नेमका कसा प्रधानसेवक हवा?
तुम्हाला देशाचा प्रधानसेवक नेमका कसा हवा आहे? तुमचे पैसे चोरून स्वत:च्या घरात वाटणारा सेवक तुम्हाला हवा आहे का? असे प्रश्न उपस्थितांसमोर उपस्थित करत मोदींनी विरोधकांना आज लक्ष केलं आहे. विरोधकांना केंद्रात एक कमकुवत आणि कमजोर सरकार हवं आहे. त्यांना केवळ स्वत:ची दुकानं थाटण्यात रस आहे. आणि त्यामुळेच त्यांना केंद्रात दुबळं सरकार सत्तेवर हवं आहे, अशा कठोर शब्दांत पंतप्रधानांनी विरोधकांवर आजच्या पक्ष मेळाव्यात हल्लाबोल केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
आधीच बेस्टचा संप आणि त्यात रेल्वेचा ‘मेगाब्लॉक’; मुंबईकरांचे हाल
सेंट्रल रेल्वे मार्गावरील बदलापूर ते कर्जत या स्थानकांदरम्यान दोन्ही बाजूने जाणाऱ्या लोह-मार्गांवर संबंधित पायाभूत सुविधांच्या कामासाठी उद्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. तर, उद्याच पश्चिम रेल्वे मार्गावरसुद्धा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान ट्रॅक, सिग्नलिंग तसेच ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीकामानिमित्त जम्बो-ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट संप; शिवसेनेमुळेच हाेताेय BEST कर्मचाऱ्यांचा गिरणी कामगार : शशांक राव
आज सलग चौथ्या दिवशीसुद्धा बेस्ट कामगार संघटनेचा संप सुरूच आहे. त्यात महापालिका, बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये मागील ४ दिवस केवळ चर्चा सुरू असून सुद्धा काेणताही ताेडगा निघू शकलेला नाही.
6 वर्षांपूर्वी -
BLOG - बाबा रे! आरक्षणाचा दाखला असल्यावर सरकारी नोकरी मिळते हा राष्ट्रीय भ्रम! सविस्तर
दोनच दिवसांपूर्वी लोकसभेत आणि काल राज्यसभेत सवर्णांच्या आर्थिक आरक्षणाला मंजुरी मिळाली. देशातील तरुण आज या निर्णयानंतर खुश आहेत आणि त्याचे कारण म्हणजे त्यांचा समज झाला आहे की, माझ्याकडे आता आरक्षणाचा दाखला असल्याने मोठी सरकारी नोकरी लागणार. वास्तविक हा देशाच्या स्थापनेपासून एक राष्ट्रीय भ्रम आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा तंत्रज्ञान जे नव्हतंच आणि त्यावेळी कमी शिक्षणात सुद्धा ज्यांना सरकारी नोकऱ्या मिळायच्या त्या नशिबाने मिळाल्या होत्या. त्याकाळापासून जातीचे दाखले असून सुद्धा त्यांना नोकरीसाठी तो दाखला पेटीतून बाहेर काढण्याची वेळच आली नाही. कारण सर्वाधिक नोकऱ्या या त्यावेळी सुद्धा खासगी क्षेत्राशी संबंधित होत्या.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO : दुबई विमानतळावर 'राहुल-राहुल-राहुल' नावाच्या जोरदार घोषणा
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सध्या २ दिवसांच्या यूएई अर्थात दुबईच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, दुबईतमधील विमानतळावर मोठ्या उत्साहात राहुल गांधी यांचे जंगी स्वागत करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी विमानतळावर मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमला होता जो मोठं मोठयाने ‘राहुल-राहुल’ अशी घोषणाबाजी करत होता.
6 वर्षांपूर्वी -
CBI प्रमुख आलोक वर्मा यांची पुन्हा उचलबांगडी; पंतप्रधानांचा २-१ मतांनी तडकाफडकी निर्णय
CBI चे संचालक आलोक वर्मा यांना सीबीआयच्या प्रमुख पदावरून हटविल्याच्या निर्णयाला स्थगिती देत सुप्रीम कोर्टाने त्यांना पुन्हा रुजू होण्यास सांगितले होते. दरम्यान, त्यांनी बुधवारी कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे पदभार सुद्धा स्वीकारला होता. परंतु, आज त्यांची तडकाफडकी गच्छंती करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
कालच्या पोरांनी ओला-उबेरला आर्थिक संपन्न केलं, मग सर्वकाही असताना बेस्ट 'डब्यात' का? सविस्तर
बेस्ट बस म्हणजे मुंबई आणि आसपासच्या शहरांची मुख्य प्रवास वाहिनी, असाच तिचा उल्लेख अनुभवातून करावा लागेल. सर्वाधिक प्रवासी क्षमता, जागोजागी स्वतः वाट पाहत थांबणारा सर्वाधिक ग्राहक म्हणजे प्रवासी, अनुभवी मनुष्यबळ आणि मुंबई सारख्या शहरात मोनोपॉली अशी शक्तिस्थळं असताना सुद्धा, आज आर्थिक दृष्ट्या बेस्ट खातं शेवटच्या घटका मोजत आहे, असंच म्हणावं लागेल. परंतु, असं काय झालं की काही वर्षांपूर्वी उदयाला आलेल्या ओला आणि उबेर सारख्या कंपन्यांचे बाजार मूल्य अब्जो रुपये आहे.
6 वर्षांपूर्वी -
#निवडणूक-धमाका; आता ४० लाखांपर्यंत टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांना GST नाही!
काही दिवसांपूर्वी ठराविक वस्तूंवरील जीएसटी घटवल्यानंतर आता आज पार पडलेल्या जीएसटी काऊन्सिलच्या दिल्लीतील बैठकीत उद्योजकांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेण्यात आले आहेत. यापुढे ज्या कंपन्यांची वार्षिक उलाढाल ४० लाखापर्यंत असेल त्यांना जीएसटीमधून सूट देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी ती सूट २० लाख उलाढाल असलेल्या कंपन्यांना होती.
6 वर्षांपूर्वी -
डिजिटल प्रगती! ई-कॉमर्स क्षेत्रावर नियमावली लादून, स्वतःच्या अँपवरून ई-कॉमर्स थाटणारे पहिले पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नमो अँपवरून सलग ३ महिन्यांमध्ये तब्बल ५ कोटींच्या वस्तुंची विक्री करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या असताना “नमो अगेन” म्हणजेच ‘पुन्हा एकदा नमो’ या मोहिमेअंतर्गत वेगवगेळ्या वस्तू या अँपवरून विकण्याचा सपाटा लावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
गंगा नदी ICU मध्ये, मोदींनी नदीच्या शुद्धीकरणाचे वचन पूर्ण केले नाही: वॉटरमॅन राजेंद्र सिंह
गंगा नदीच्या शुद्धीकरणावरुन जागतिक ख्यातीचा रॅमन मॅगसेसे पारितोषिक विजेते आणि विख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मोदींनी गंगा शुद्धीकरणासंदर्भात दिलेले आश्वासन त्यांनी पाळलं नाही. कारण गंगा नदीचे पाणी अत्यंत दुषित झाले आहे’, अशी व्यथा त्यांनी मांडली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सर्वकाही RSSच्या अजेंड्याप्रमाणे, आर्थिक आरक्षण देऊन हळूहळू इतर आरक्षण रद्द केली जातील
खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांना शिक्षण तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देणारे घटनादुरुस्ती करणारे विधेयक आज वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभेत सादर करण्यात आले. केंद्रीय समाजकल्याणमंत्री थावरचंद गेहलोत यांनी राज्यसभेत हे विधेयक सादर केले. काल हीच प्रक्रिया लोकसभेत पार पडली होती.
6 वर्षांपूर्वी -
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा मोदी सरकारकडे डेटाच नाही, निर्णय निवडणुकीसाठी घाईगर्दीत?
उच्च जातींमधील आर्थिक दुर्बलांना कायदेशीर १० टक्के आरक्षण देण्यासाठी १२४ व्या घटनादुरुस्ती विधेयकावर काल राज्यसभेत उशिरापर्यंत दीर्घ चर्चा सुरू होती. दरम्यान, बहुतेक विरोधी पक्षांनी घाईमध्ये उपस्थित केलेल्या विधेयकाबाबत मोदी सरकारवर सडकून टीका केली, परंतु त्यासोबत विधेयकाचे समर्थन सुद्धा केल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
सोलापूरला निवडणूकपूर्व स्मार्ट गाजर? लोकार्पणाच्या नावाने पुन्हा मोदी-मोदी-मोदी इव्हेंट?
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते सोलापुरातील अनेक विकास कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी सोलापुरात भाजपने एखाद्या पूर्वनियोजित इव्हेंटप्रमाणे तयारी केल्याचे निदर्शनास येत होतं. तसेच, सोलापुरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून, अनेक ठिकाणी पंतप्रधानांच्या मोठ्या स्वागतासाठी पोस्टर्स आणि होर्डिंग्सचा सुळसुळाट करण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
सरकारी नोकऱ्यांच आमिष व 'आरक्षणाच्या' मोहजालात तरुण भीषण बेरोजगारीकडे जातो आहे? सविस्तर
सध्या आर्थिक स्थितीवर आधारित आरक्षणामुळे निर्णयामुळे संपूर्ण वर्गाला प्रचंड फायदा की भाजपच्या मतांच्या टक्केवारीला याचा विचार तरुणांनी करणे गरजेचे आहे. कारण दुसरी बाजू अशी आहे, कि ज्या आरक्षणाची भाजप बोंबाबोंब करत आहेत, त्यामुळे कोणाला किती सरकारी नोकऱ्या मिळणार याची त्यांना सुद्धा माहिती नाही. देशात ९५ टक्के नोकऱ्या या खासगीं क्षेत्रात आहेत आणि सरकारने तर जागोजागी कंत्राटी पद्धतीने नोकरभरती सुरु केल्या आहेत, म्हणजे शेवटी ते सुद्धा खासगी नोकरी प्रमाणेच आहे.
6 वर्षांपूर्वी -
निवडणुकीच्या खेळीत, मोदींची थेट छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेबांशी तुलना? सविस्तर
काही दिवसांपूर्वी ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान योगी आदित्यनाथांनी मोदींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. काल म्हणजे अगदी निवडणुकीच्या तोंडावर आणि आरक्षणाच्या अनुषंगाने पुन्हा उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी ‘आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना १० टक्के आरक्षण देणाऱ्या मोदींची २१ व्या शतकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देण्याचे यापूर्वी प्रयत्न झालेच नाहीत : जेटली
देशातील ५० टक्के राज्यांची सुद्धा मंजुरी आर्थिक मागास आरक्षणासाठी हवी अशी मागणी होती. परंतु, संबंधित कायद्यासाठी राज्यांच्या मंजुरीची कोणतीही आवश्यकता नाही, असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. आज लोकसभेत आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षणासंदर्भात सविस्तर चर्चा सुरु होती, तेव्हाच अरुण जेटलींनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, पूर्वीच्या सरकारने गरीब सवर्णांना आरक्षण देण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत हे सुद्धा त्यांनी बोलताना अधोरेखित केलं.
6 वर्षांपूर्वी -
ऑगस्टा गौप्यस्फोट: हॅश्केची कबुली, 'गांधी घराण्याचे नाव घेण्यासाठीच आमच्यावर दबाव'
बहुचर्चित ऑगस्टा वेस्टलॅण्ड या हेलिकॉप्टर बनविणार्या कंपनीचा दलाल गुईडो हॅश्के याने मोठा गौप्यस्फोट केला आहे. दरम्यान, या हेलिकॉप्टर खरेदी-विक्री व्यवहारात भारतातील गांधी घराण्याला लाच मिळाली हे सांगण्यासाठीच माझ्यावर मोठा दबाव आला असा धक्कादायक गौप्यस्फोट त्याने केला आहे. इटलीच्या कोर्टात ‘गांधी घराणे’ आणि ‘अहमद पटेल’ यांचे नाव घ्यावे यासाठी सरकारी वकिलाने मोठ्या चलाखीने माझ्या तोंडून त्यांची नावे वदवून घेण्याचा शिस्तबद्ध प्रयत्न केला. परंतु मी त्यांची ती चलाखी ओळखली आणि कुणाचेही नाव घेतले नाही, असे हॅश्के याने एका इंग्रजी मासिकाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
राफेल घोटाळ्यात मोदींना कोणीही वाचवू शकत नाही: राहुल गांधी
लढाऊ विमान राफेल घोटाळयात मोदींना कोणी सुद्धा वाचवू शकत नाही. पंतप्रधानांनी रिलायन्सच्या अनिल अंबानी यांना केवळ व्यक्तीगत फायदा मिळावा म्हणून हा घोटाळा केला आहे. दरम्यान, या आरोपांचा काँग्रेस अध्यक्षांनी पुनरुच्चार केला आहे. तसेच विद्यमान CBI संचालक आलोक वर्मांना राफेल लढाऊ विमानांच्या कराराची चौकशी करायची होती. म्हणून मोदी सरकारने त्यांना अचानक मध्यरात्रीपदावरुन दूर करत सक्तीच्या रजेवर धाडले असे सुद्धा ते म्हणाले. त्यामुळेच मोदी लोकसभेत चर्चेपासून पळ काढाला, असा घणाघात काँग्रेस अध्यक्षांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
अभ्यासपूर्वक राफेल प्रकरणाचे सत्य लोकांसमोर आणणार: अण्णा हजारे
मोदी सरकारने फ्रान्ससोबत केलेल्या राफेल लढाऊ विमानांच्या करारामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आधीच विरोधकांनी केला आहे. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याविषयावरून भाजपला काय करू आणि काय नको अशी परिस्थिती करून ठेवली आहे. परंत्तू, आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सुद्धा सदर विषयात हात घालणार असल्याने मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अण्णा प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले की, राफेल प्रकरणाचा मी अभ्यास करत असून, याबाबतचे सत्य मी सामान्य जनतेसमोर आणेण अशी घोषणा, अण्णा हजारे यांनी यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी