महत्वाच्या बातम्या
-
अच्छे दिन'चं वास्तव; केवळ २०१८ मध्ये १ कोटी लोकांनी नोकऱ्या गमावल्या: CMIE अहवाल
प्रति वर्षी २ कोटी रोजगार निर्माण करण्याची आश्वासनं देणाऱ्या मोदी सरकारच्या कार्यकाळातील धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारी नामांकित संस्था CMIE (सीएमआयई) नं मोदी सरकारच्या कार्यकाळातील बेरोजगारीचे धक्कादायक वास्तव अभ्यासपूर्वक जाहीर केले आहे. त्याप्रमाणे मागील २७ महिन्यामध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक असल्याची आकडेवारी सार्वजनिक झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट कर्मचाऱ्यांनी उपसलं संपाचं हत्यार, मुंबईकर वेठीस
मुंबई बेस्ट कामगारांचा संप टळण्यासाठी मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या बैठका कुचकामी ठरल्या आहेत. दरम्यान, सामान्यांचे हाल टाळण्यासाठी आणि संप मोडून काढण्यासाठी बेस्ट प्रशासनाने ‘मेस्मा’अंतर्गत कारवाईचा इशारा दिला, तसेच औद्योगिक कोर्टातून संप बेकायदेशीर ठरवून कामगारांनाच थेट कायदेशीर आव्हान दिले. त्यामुळे संतप्त झालेले बेस्ट कर्मचारी सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मोदी सरकार आर्थिक मागास सवर्णांनाही आरक्षण देण्याच्या तयारीत?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकार मतांच्या समीकरणासाठी आर्थिक आरक्षणासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांच्या आरक्षणात तब्बल १० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घेतल्याचे वृत्त आहे. परंतु, सरकारने त्याला अजून अधिकृत दुजोरा दिलेला नाही. जर ते झाल्यास देशभरातील सवर्णांना त्याचा मोठा दिलासा मिळणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारची धोरणं; बँकांसकट १० प्रमुख केंद्रीय कामगार संघटना उद्यापासून २ दिवस संपावर
देशभरातील कामगारांच्या प्रश्नावर डाव्या कामगार संघटनांनी उद्यापासून म्हणजे ८ आणि ९ जानेवारी रोजी संप कडकडीत पुकारला आहे. इंटक, आयटक, सीटू, हिंद मजदूर सेवा, आयपीएफ अशा देशभरातील १० प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांनी हा देशव्यापी संप पुकारला आहे. यामध्ये देशभरातील कोट्यवधी कामगार सामील होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
ना खाऊंगा ना खाने दूंगा? योगी सरकारमधील ३ मंत्र्यांच्या स्वीय सहायकांना लाच प्रकरणी अटक
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील ३ विद्यमान मंत्री निवडणुकीच्या तोंडावर राजकीय अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण, एका खासगी टीवी वृत्तवाहिनीच्या स्टिंग ऑपरेशननंतर ३ मंत्र्यांच्या स्वीय सहायकांना अटक करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: राफेल प्रश्नांवरून राहुल गांधीनी घाम काढताच भाजपची पाकिस्तान-पाकिस्तान बोंब सुरु? सविस्तर
राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवरुन विरोधकांकडून होत असलेल्या गंभीर आरोपांना उत्तर देताना संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी मूळ प्रश्न आणि त्याला अनुसरून उत्तर देण्याऐवजी चर्चा भलत्याच विषयावर केंद्रित केली असे म्हणावे लागेल. विषय लोकसभेत चर्चेला असताना निर्मला सीतारमन यांनी पुन्हा मोदींच्या पराभवासाठी पाकिस्तानची मदत घ्यायला काँग्रेसला लाज नाही का वाटत ? असा काहीही संबंध नसणार विधान केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
रेल्वेत बिल मिळालं नाही तर जेवण फुकट, मार्चमध्ये? वाह रे टायमिंग!: सविस्तर कारण
रेल्वे प्रवाशांनसाठी एक मोठी बातमी आहे. कारण रेल्वेमधून प्रवास करताना जर तुम्हाला जेवणाचं अधिकृत बिल हातात मिळालं नाही, तर ते जेवण मोफत मिळणार आहे. मार्च महिन्यापासून रेल्वेमधील जेवणाच्या किंमतींचे तक्ते रेल्वेसह स्टेशनवर सर्व प्रवाशांना दिसतील अशा पद्धतीने सर्वत्र लावले जाणार असल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
गुंतवणुकदारांचे पैसे थकवले, भाजपचे मंत्री सुभाष देशमुखांच्या लोकमंगल'ची खाती सेबीकडून सील
गुंतवणुकदारांचे तब्बल ७४ कोटी रुपये परत करण्याचे सेबीचे आदेश धुडकावल्याने राज्याचे सहकारमंत्री सुभास देशमुख यांना ‘सेबी’ अर्थात सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने जोरदार दणका दिला आहे. मंत्री सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल’चे म्युच्युअल फंड आणि डी-मॅट खात्यांना सेबीकडून सील ठोकण्यात आले आहे. तसंच ७४ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी मंत्री सुभाष देशमुख यांना नोटीस सुद्धा धाडण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राफेल डील: ना पंतप्रधान, ना संरक्षणमंत्री तर अर्थमंत्री उत्तर का देतात? - खासदार सौगत राय
तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत राय यांनी राफेल करारावरून नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळावर बोचरी टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाला राफेल लढाऊ विमानांच्या करारावर बोलण्यासाठी राज्यसभेचा सदस्य सापडला. भाजपचे लोकसभेत ३०० खासदार असूनही राज्यसभेतला माणूस इथे येऊन नरेंद्र मोदी सरकारची बाजू मांडत आहे. विशेष म्हणजे राज्यसभेचे सदस्य असलेले अरुण जेटली हे संरक्षण मंत्री सुद्धा नाहीत. तरी पण ते स्वतःला राफेल लढाऊ विमानांच्या करारातील तज्ज्ञ समजतात.
6 वर्षांपूर्वी -
मग होऊ दे JPC'; 'शिवसेनेलासुद्धा मोदी सरकारवर संशय
राफेल करारावरुन आज लोकसभा सभागृहात काँग्रेसने मोठा गदारोळ केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही जेटलींना यासंदर्भात प्रश्न विचारले. दरम्यान, अर्थमंत्री अरुण जेटलींच्या उत्तराने आपलं समाधान झालं नसल्याचं खासदार सावंत यांनी म्हटलं आणि अप्रत्यक्षरित्या भाजप व मोदी सरकारवरच संशय व्यक्त केला.
6 वर्षांपूर्वी -
राफेल कराराच्या चौकशीसाठी जेपीसीची गरज नाही : अरुण जेटली
राफेल लढाऊ विमानांच्या मुद्द्यावरून लोकसभेत आज प्रचंड गदारोळ सुरू आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधक एकमेकांवर सडकून आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यात राहुल गांधी यांच्या प्रश्नांना थेट आणि सविस्तर उत्तर देण्यापेक्षा राहुल गांधींबाबत चर्चेला येतील असे शब्द वापरून मूळ मुद्याला बगल देण्याचा प्रयत्न केला असं निदर्शनास येत होतं.
6 वर्षांपूर्वी -
माझं कोणीही काही करू शकत नाही, माझ्याकडे राफेल घोटाळ्याची माहिती: पर्रिकरांची ऑडिओ क्लिप
राफेल लढाऊ विमान घोटाळ्यावरून काँग्रेसने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर सुद्धा निशाणा साधला आहे. राफेल लढाऊ विमानांच्या घोटाळ्याचे रहस्य गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या बेडरूममध्ये असल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेसने केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
हिम्मत असेल तर मोदींनी आर्थिक मुद्यांवर माझ्याशी चर्चा करावी: चंद्राबाबूंचं आव्हान
मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात देशाला काय आर्थिक फायदा झाला यावर पंतप्रधानांनी थेट माझ्याशी चर्चा करावी असे खुले आव्हान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडूंनी नरेंद्र मोदी यांना दिले आहे. मंगळवारी पंतप्रधान मोदींनी एअनआय’ला दिलेल्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात देशाने अपेक्षित आर्थिक वाढीचा दर गाठला का? असा सवाल सुद्धा उपस्थित केला.
6 वर्षांपूर्वी -
शेकडो निरपराधांचे बँकेत मृत्यू झाले, तरी मोदींना नोटाबंदी हा झटका वाटत नाही?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली असून लोकसभा निवडणूकपूर्व ठरवून घेतलेली मुलाखत अशी विरोधकांनी त्यावर टीका केली आहे. या मुलाखतीदरम्यान मोदींनी नोटाबंदी, राम मंदिर, RBI मधील वाद आदी विविध मुद्द्यांवर लोकसभा निवडणुका जवळ येताच भाष्य केले. सदर मुलाखत जवळपास ९५ मिनिटांची होती.
6 वर्षांपूर्वी -
उद्योगमहर्षि रतन टाटांना अमित ठाकरे यांच्या लग्नाचे निमंत्रण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे लवकरच बोहल्यावर चढणार आहे. अमित ठाकरे यांचा विवाह मिताली बोरूडेशी होणार असून नातेवाईक आणि जवळच्या मोजक्या मंडळींना आमंत्रित करत लग्न अगदी साध्या पद्धतीने करणार असल्याचे राज ठाकरे यांनी याआधीच सांगितले होते. त्यामुळे घरातील आणि नात्यांमधील ती मोजकी मंडळी कोण याची सरावांनाच उत्सुकता होती.
6 वर्षांपूर्वी -
मतदारांनो! आली रे आली निवडणुकीपूर्व 'मोदी' स्वस्ताई आली! सविस्तर
पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला आणि विशेष करून मोदी ब्रॅण्डला पडलेल्या फटाक्यांमुळे भाजपाला लोकसभा निवडणुकीआधी खडबडून जाग आली आहे. महागाई घटत नसल्याने भाजपची मतं घटली आणि परिणामी धार्मिक राजकारण पथ्यावर न पडल्याने हिंदी भाषिक पट्यात काँग्रेस सत्तेत विराजमान झाली आहे. आता लोकसभा निवडणुकीचा धसका घेतलेल्या मोदी सरकारकडून निवडणुकीआधी मतदारांना आकर्षित करण्यासाठी करांमध्ये घट करून विविध वस्तू स्वस्त करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
आरबीआय अहवाल: २०१७-१८ मध्ये भारतीय बँकांत ४१ हजार कोटींचा घोटाळा
आरबीआय’ने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, २०१७-१८ या वित्तीय वर्षात भारतीय बँकांमध्ये तब्बल ४१ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे ही घोटाळ्यांची प्रचंड वाढ तब्बल ७२ टक्के एवढी मोठी असल्याचे या अहवालात स्पष्ट केले आहे. सन २०१३-१४ पासून तब्बल ४ वेळी या घोटाळ्यांची आकडेवारी आणि रक्कम वाढल्याचेही अहवालतून स्पष्ट झाले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारने ऑगस्टा वेस्टलँडला काळ्या यादीतून बाहेर काढले व "मेक इन इंडियात" सामील केले
ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरुन काँग्रेसनं भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. काळ्या यादीत असणाऱ्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला “मेक इन इंडियात” का सामील करुन घेतलं असा सवाल काँग्रेसच्या थेट पत्रकार परिषदेत उपस्थित केला आणि भाजप तोंडघशी पडल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
वेळ, खर्च, दौऱ्यांचा आकडा व आलेली गुंतवणूक बघा, मोदी नाही! मनमोहन सिंग उजवे: सविस्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेश दौऱ्यावरुन आणि त्यावर झालेल्या खर्चांवरुन सोशल मीडियावतून मोदींवर टीका करण्यात येते. मात्र, मोदींचे एकूण विदेश दौरे, वेळ, त्यासाठी आलेला खर्च आणि त्यामुळे देशात आलेली परकीय गुंतवणूक पाहता आणि त्याची तुलना डॉ. मनमोहन सिंग यांच्या सोबत करता मनमोहन सिंग हेच उजवे ठरतील अशी आकडेवारी खुद्द राज्यसभेत खासदार वीके. सिंह यांच्या उत्तरातून यांनी याबाबत माहिती दिली.
6 वर्षांपूर्वी -
मिशेलने सोनियांचे नाव घेतल्याचे इडीच्या अधिकाऱ्याने ऐकले व माध्यमांमध्ये पेरले: पवार
ऑगस्ट वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी तुरूंगात असलेल्या ख्रिश्चियन मिशेलने काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेणे हा केवळ एका कटाचाच भाग आहे. वास्तविक त्याने सोनियांचे नाव घेतले. परंतु ते कोणी ऐकले आहे? मात्र एका इडीच्या अधिकाऱ्याने ते ऐकले आणि त्याने सर्वांना सांगितले की मिशेलने सोनिया गांधींचे नाव घेतले. परंतु, ते खरे आहे की नाही याची कोणालाच काहीच खरी माहिती नाही.
6 वर्षांपूर्वी