महत्वाच्या बातम्या
-
कोकण : पालशेत किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात डॉल्फिन अवतरले
निसर्गरम्य कोकणात सध्या पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. परंतु, त्याचवेळी पर्यटकांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणजे ३१ डिसेंबरच्या निमित्ताने अनेक राज्यातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटकांच्या भेटीला स्वतः डॉल्फिन्स सुद्धा आले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मार्चमधील आचारसंहितेपूर्वी भाजप उदघाटनसोहळे करण्याच्या तयारीत : सविस्तर
लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्यास आणि लोकसभा निवडणुका घोषित व्हायला तसेच निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास आता केवळ ७० दिवस शिल्लक आहेत. अंदाजे ६ ते ८ मार्चच्या दरम्यान लोकसभा निवडणुकांची अधिकृत घोषणा निवडणूक अयोग्य आयोग करेल, अशी शक्यता आहे. सध्या परदेश दौऱ्यावरून ब्रेक घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ७० दिवसांत देशभराच्या दौऱ्यावर जाऊन नव्या आणि अपूर्ण स्थितीत असलेल्या का होईना अशा विविध योजना आणि प्रकल्पांची निवडणुकीआधी घोषणा करणार असल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: मिशेलच्या नावाने सोनियांची चर्चा; पण पीएनबी घोटाळ्यातील मेहुल चोक्सीला मोदी 'मेहुलभाई' म्हणाले होते
३,६०० सहाशे कोटींच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारासंबंधित ब्रिटिश दलाल ख्रिस्तियन मिशेलने तपासणीदरम्यान चौकशीदरम्यान काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याची माहिती ईडी’ने आज पतियाळा हाऊस न्यायालयात दिली. दरम्यान, असं असलं तरी मिशेलने सोनिया गांधी यांचे नाव कोणत्या संदर्भात घेतले ते मात्र ईडीने स्पष्ट केलेले नाही. दरम्यान, आज न्यायालयात मिशेलला ७ दिवसांची ईडी कोठडी दिली.
6 वर्षांपूर्वी -
भारताच्या इतिहासातील सर्वात महागडे पंतप्रधान, ९२ देश आणि खर्च २०२१ कोटी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका नवा इतिहास घडवला आहे. कारण मागील ४.५ वर्षांत मोदींनी एकूण ९२ देशांचा दौरा केला. त्या ९२ देशांच्या दौऱ्यावर सरकारचे तब्बल २०२१ कोटी रुपये इतका प्रचंड खर्च झाला आहे. त्यापैकी १४ देशांचे दौरे त्यांनी केवळ २०१८ मध्येच केले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मध्यप्रदेश सरकार लवकरच ज्येष्ठ शेतकऱ्यांना पेन्शन सुरु करणार
मध्यप्रदेशातील कालमनाथ सरकारने शेतकऱ्यांवर सवलतींचा सपाट सुरु केला आहे. मुख्यमंत्री कमलानाथ यांनी केवळ आठवड्याभराच्या आत दुसरा मोठा निर्णय घेतल्याचे समजते. लवकरच राज्यातील ज्येष्ठ शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचा मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला जाण्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी निरव मोदी सुद्धा इंग्लंडमध्येच: सरकारची कबुली
हजारो कोटींच्या पीएनबी बँक घोट्यातील प्रमुख फरार आरोपी निरव मोदी सुद्धा इंग्लंडमध्ये वास्तव्याला असल्याचे उघड झाले आहे. ब्रिटीश यंत्रणांनी भारत सरकारला त्यासंदर्भात अधिकृत माहिती पुरवली आहे. स्वतः परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंह यांनी राज्यसभेत ही माहिती दिली आहे. मँचेस्टरच्या नॅशनल सेंट्रल ब्युरोने घोटाळेबाज फरार आरोपी नीरव मोदी इंग्लंडमध्ये वास्तव्यास असल्याचे भारत सरकारला कळवले आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO सावधान! भाजपकडून 'चुनावी जुमलेबाज' जाहिरातींचा पुन्हा सुळसुळाट होणार? सविस्तर
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत सामान्यांना आकर्षित करणाऱ्या भाजपच्या अनेक जाहिरातींनी मतदाराला भुरळ पाडली होती. मात्र सरकार आल्यावर त्या सर्व चुनावी जुमला असल्याचं भाजपच्या नेत्यांनी मान्य केले होते. २०१९ मधील लोकसभा निवडणुकांना काही महिने उरले असताना त्याप्रकारच्या जाहिराती भाजप पुन्हा शब्दांचे खेळ करत लोकांच्या माथी करण्याची तयारी करत आहे असं समोर येतं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ट्विट केलेली जाहिरात अनेक हास्यास्पद दावे करून लोकांकडून पैसे दान करण्याचे आवाहन करत आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: सावधान! तुम्ही झोमॅटोवर ऑर्डर केलेलं खाद्य येतंय थेट म्हशीच्या तबेल्यातून
मागील काही दिवसांपूर्वी झोमॅटोवर ऑर्डर करण्यात आलेले खाद्य पदार्थ डिलेव्हरी बॉयने उष्टावून, मग ते ग्राहकाला घरपोच दिले होते. त्यानंतर झोमॅटोवर सर्वबाजूने टीका करण्यात आली होती. परंतु, आता झोमॅटोचा अजून एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रानामाच्या टीमने ग्राहकाच्या माहितीवरून एक स्ट्रिंग ऑपरेशन केलं असता ते किळसवाण सत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
अग्नी-४ बॅलेस्टिक मिसाइलचे यशस्वी परीक्षण
ओडिशाच्या भूमीवरून काल रविवारी सक्षम परमाणू घेऊन जाणारे आणि ४,००० किमी पर्यंत मारा करण्याची क्षमता असणाऱ्या ‘अग्नी ४’या बॅलेस्टिक मिसाइलची लष्कराने प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी चाचणी केली आहे. डॉ. अब्दुल कलाम द्वीपावरील एकीकृत परीक्षा केंद्रावरून (आयटीआर) रविवारी सकाळी ८.३५ मिनिटांनी ही चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्रामुळे ४,००० किलोमीटर अंतरावरील जमिनीवर मारा करता येणे शक्य होणार आहे, अशी माहिती लष्कराच्या अधिकृत सूत्रांनी प्रसार माध्यमांना दिली.
6 वर्षांपूर्वी -
ऐन ख्रिसमसमध्ये अमेरिकेत 'शटडाऊन; सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले
अमेरिका आणि मेक्सिको दरम्यानच्या सीमेवर भिंत उभारण्यासाठी ५ अब्ज अमेरिकी डॉलर मंजूर व्हावेत, ही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी अमेरिकी काँग्रेसमध्ये नामंजूर करण्यात आल्याने अमेरिकेच्या कारभाराला सरकारी कामकाजाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
6 वर्षांपूर्वी -
३ राज्यात पराभव; कर नाही तर २०१९ मधील 'डर कमी' करण्याचा प्रयत्न? सविस्तर
हिंदी पट्टय़ातील ३ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील मोठं अपयश पदरात पडल्यावर सामान्य माणसाचं दुःख सत्ताधाऱ्यांना थोडी समज देऊन गेल्याचा हा प्रत्यय म्हणावा लागेल. लवकरच सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचा माहोल द्यानात घेता, नरेंद्र मोदी सरकार तिजोरीवर भार टाकणारे लोकप्रिय निर्णय घेत राहतील अशी अशी राजकीय चर्चा रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
अमेरिकेचे संरक्षण सचिव जेम्स मॅटिस यांचा तडकाफडकी राजीनामा
अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅॅटिस यांनी त्याच्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना केवळ त्यांच्या मातांशी सहमत असणारे लोकं महत्वाच्या पदावर हवे असल्याने मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
बुलेट ट्रेनचा वसई-विरार शहराला उपयोग नाही, बविआ'चा तीव्र विरोध
वसई-विरार शहरातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनला नव्याने निर्माण झालेल्या महापालिकेने तीव्र विरोध दर्शविला आहे. सदर विषयाला अनुसरून बुलेट ट्रेनसाठी महापालिकेकडे संरेखन करण्याचा प्रस्ताव आणि विकास हस्तांतर देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असता पालिकेने तो फेटाळून लावला आहे. त्यांच्यानुसार बुलेट ट्रेनचा वसई-विरार शहराला काहीसुद्धा उपयोग नाही, त्यामुळे केवळ स्थानिक शेतकरी मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त होणार आहे अशी भूमिका सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारकडे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची आकडेवारीच नाही: केंद्रीय कृषीमंत्र्यांची कबुली
सरकार बदललं तरी देशभरातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या सजून तशाच कायम आहेत. काही दिवसांपासून देशभर विविध शेतकरी संघटनांनी आंदोलनं पुकारली आणि थेट दिल्लीवर मोर्चे निघाले होते. देशभर शेतकऱ्यांची समस्या अतिशय गंभीर असताना मोदी सरकारमधील कृषिमंत्र्यांनी एक धक्कादायक कबुली दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी योग्य टीम लीडर नाहीत, जनता पुन्हा मतं देण कठीण: अर्थतज्ज्ञ मेघनाद देसाई
मोदींच्या धोरणांमुळे सामान्य माणूस त्रस्त झाला असताना आता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ सुद्धा पंतप्रधानांवर टीका करताना दिसत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोदींसाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण, भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ मेघनाद देसाई यांनी सुद्धा नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. दरम्यान, त्यांनी मोदींबाबत विधान करताना म्हटले की, २०१९ लोकसभा निवडणुकीत नाराज झालेली सामान्य जनता पुन्हा भारतीय जनता पक्षाला मतं देणार नाही, अशी बोचरी टीका केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारच्या बँकिंग क्षेत्रातील धोरणांविरोधात बँका संपावर, ५ दिवस बँका बंद
देशभरातील बँक कर्मचाऱ्यांच्या मागील सर्व प्रलंबित मागण्यासाठी ऑल इंडिया बँक ऑफिसर कन्फडरेशनने अर्थात ‘AIBOC’ उद्यापासून तब्बल ५ दिवसांसाठी संपावर जाणार आहेत. त्यात हे ५ दिवस आल्याने अनेकांची आर्थिक गैरसोय होण्याची शक्यता आहे. उद्या २० डिसेंबरनंतर सलग ५ दिवस बँका बंद राहणार असल्यानं २० तारखेच्या आधीच आपण बँकांमधील सर्व महत्वाचे व्यवहार आटोपून घ्यावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
जवाबदार पंतप्रधान म्हणून मी पत्रकार परिषदांना कधीच घाबरलो नाही : डॉ. मनमोहन सिंग
युपीएचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. मी कधीच असा पंतप्रधान नव्हतो, जो पत्रकार परिषदेत बोलायला घाबरायचो. मी जवाबदार पंतप्रधान म्हणून माझ्या मंत्रिमंडळाचा पत्रकार परिषदेत पत्रकारांशी नेहमीच सुसंवाद राखला होता. तसेच मी कोणत्याही परराष्ट्र दौऱ्यावरून देशात परतल्यानंतर नेहमीच जाहीर पत्रकार परिषद घेत होतो, असं सुद्धा डॉ. मनमोहन सिंग आवजून म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही: राहुल
जोपर्यंत देशातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही तोपर्यंत आम्ही पंतप्रधान मोदींना झोपू देणार नाही, असा थेट इशारा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिला आहे. इतकंच नाही तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं सुद्धा राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. केवळ घोषणा करणाऱ्या मोदी सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांचं एक रुपयाचं कर्ज सुद्धा माफ केलेलं नाही, असं राहुल प्रसारमाध्यमांशी थेट संवाद साधताना म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
जेवणाचे बुरे दिन! सामान्यांच्या ताटातील भाकरी महागली
सध्या महागाईने हैराण झालेल्या सामान्य माणसाच्या ताटातील भाकरी सुद्धा महागली आहे. उत्पादनात घट झाल्याने मुंबईत ज्वारी आणि बाजरीचे दर दाम दुप्पट झाले आहेत. तसेच खानावळीत सुद्धा तयार भाकरीच्या दरात जवळपास ४ ते ५ रुपयांची वाढ झाल्याने मुंबईकरांच्या खिशाला भगदाड पडणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
आरबीआय गव्हर्नरपदी दास यांची नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात : उद्धव ठाकरे
आरबीआय’च्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नेमणूक करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. मोदी सरकारला कोणत्याही विषयात सत्य समोर ठेवणारे लोक नको असून केवळ हो ला हो बोलणारे होयबा हवेत अशी खरमरीत शब्दांत टीका केली आहे. दरम्यान, शक्तिकांत दास यांची गव्हर्नरपदी नेमणूक त्याच उद्देशाने झाली असेल तर ही येऊ घातलेल्या आर्थिक दहशतवादाची सुरुवात आहे, असं मत सामनाच्या अग्रलेखातून आज व्यक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे मोदी सरकार अर्थव्यवस्थेशी खेळत असल्याचे सामनातून म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी