महत्वाच्या बातम्या
-
डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी सरकारला आयात शुल्कावरून 'टेरिफ किंग' असं संबोधलं
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिकेच्या उत्पादनांवर लावलेल्या आयात शुल्कावरून मोदी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत निशाणा साधला आहे. आता भारत सरकार अमेरिकेला खूश करण्यासाठीच व्यापार करार करू इच्छितो आहे असं त्यांनी वक्तव्य केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
सीएनजीवर मोदी सरकारची वक्रदृष्टी! आता सीएनजी वाहन धारकांचे बुरे दिन
प्रदूषणाला आळा बसावा म्हणून सीएनजी वाहनांना प्रोत्साहन दिल गेलं. अनेक वाहन धारक ज्याच्या गाड्या सीएनजीवर चालतात म्हणून खुश होते. परंतु त्यांना सुद्धा पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांसारखं महागडं सीएनजी भराव लागणार आहे. मोदी सरकारने दिल्लीमध्ये सीएनजीचा दर प्रती किलो १.७० रुपयांनी वाढविला असून नोएडामध्ये १.९५ रुपयांनी दर वाढले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
वायुदलाकडून अभिनंदन, HAL च्या अचाट कामांची क्षमता बघा! मग रिलायन्स डिफेन्सला ऑफसेट कंत्राट का दिले?
HAL अर्थात भारतीय संरक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान देणारी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड” कंपनी जीच्या क्षमतेवर समाज माध्यमांवर नकारात्मक गोष्टी फसविण्यास सुरुवात झाली आणि मेक इन इंडिया, संरक्षण क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक तसेच ऑफसेट नियमांच्या आडून रिलायन्स डिफेन्स लिमिटेड बाबतीत होकारात्मक बातम्या पेरण्यास समाज माध्यमांवर सुरुवात झाली होती.
7 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ: मोदींच्या भाषणात गरीब, पण आज केवळ ८३१ श्रीमंतांकडे देशाचा २५% जीडीपी गेला: सविस्तर
सरकार बदललं तरी देशातील गरीब श्रीमंतांमधील दरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बार्कलेज हुरुन रिच लिस्टवरुन देशातील हे वास्तव समोर आलं आहे. मोदींच्या प्रत्येक भाषणात गरीब आणि गरिबी झळकते, परंतु जमिनीवरील वास्तव वेगळंच असल्याचं चित्र आहे. आधीच वाढत्या इंधन दरामुळे विकोपाला गेलेली महागाई आणि त्यामुळे रडकुंडीला आलेल्या सामान्य माणसाची अवस्था फारच कठीण होऊन बसली आहे.
7 वर्षांपूर्वी -
पेट्रोल दिवाळीत सामान्यांचं महागाईने दिवाळं काढणार, इंधन दर शतकाच्या दिशेने
देशभरात पेट्रोल दर शंभरी गाठण्याची शक्यता आहे. त्यात डिझेलने सुद्धा ८० चा टप्पा ओलांडला आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल तसेच डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येकी १३ पैशांनी महागले आहेत. यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी प्रति लिटर ९०.३५ रुपये आणि डिझेलसाठी प्रति लिटर ७८.८२ रुपये मोजावे लागत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मोदींच्या राज्यात १६ टक्के तरुणाई बेरोजगार: एस.डब्लू.आय अहवाल
मागील लोकसभा निवडणुकीत ‘बहुत हुआ रोजगार का इंतजार, अबकी बार मोदी सरकार’ अशा घोषणा देत नरेंद्र मोदी सत्तेत विराजमान झाले खरे, परंतु सध्या देशातील वाढत्या बेरोजगारीचे आकडे वेगळंच सत्य समोर आणत आहेत. स्टेट ऑफ वर्किंग इंडिया (SWI) या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार देशात सध्या १६ टक्के तरुणाई बेरोजगार असल्याच नमूद करण्यात आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
राफेल करार: तेव्हा आम्ही सत्तेत नव्हतो, फ्रान्सच्या विद्यमान अध्यक्षांनी हात झटकले
फ्रान्सचे विद्यमान अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी राफेल करारावरुन हात झटकले आहेत. कारण अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन राफेल करारासंबंधित विचारलेल्या प्रश्नांना थेट उत्तर देण्यापेक्षा ते प्रश्नांना टाळणं पसंत करत आहेत. भारत आणि फ्रान्सदरम्यान ३६ राफेल लढाऊ विमानांच्या लाखो डॉलर्सचा करार झाला तेव्हा आम्ही सत्तेत नव्हतो, असं इमॅन्युएल मॅक्रोन यांनी राजकीय अनुषंगाने उत्तर दिल आहे. ते संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पत्रकारांशी बोलत होते तेव्हा त्यांनी हे उत्तर दिल.
7 वर्षांपूर्वी -
राफेल घोटाळा हा बोफोर्स घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा आहे: भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा
काँग्रेस सोबतच आता भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी राफेल घोटाळ्यावरून नरेंद्र मोदींना लक्ष केलं असून राफेल घोटाळा हा बोफोर्स घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा असल्याचा आरोप पंतप्रधानांवर केला आहे. तसेच मोदी सरकार विरोधी पक्ष तसेच जनतेचे या महत्वपूर्ण मुद्यावरुन लक्ष हटवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. तसेच मोदी सरकारकडून मूळ प्रश्नांची उत्तरे टाळून दुसरेच मुद्दे समोर आणली जात आहेत असं थेट आरोप त्यांनी केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
आधी शेतक-यांच्या समस्या सोडवा, मोदींच्या 'बुलेटट्रेन' स्वप्नाला जपानने पैसे देणं थांबवलं
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट मुंबई-अहमदाबाद बुलेटट्रेनला जपानकडून अर्जंट ब्रेक देण्यात आला आहे. या प्रोजेक्टसाठी फंडिंग करणारी जपानची कंपनी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी अर्थात जीका’ने बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या नेटवर्क उभारणीसाठी लागणारा निधी देण्यास स्पष्ट नकार देण्याबरोबरच मोदी सरकारला अनेक सल्लेसुद्धा दिले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
चुनावी जुमला? 'जागतिक' 'आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेचं' राष्ट्रीय पायाभूत वास्तव: सविस्तर
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेचा शुभारंभ केला. परंतु ‘आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेला’ “जागतिक” शब्द जोडून देशातील आरोग्य व्यवस्थेचं राष्ट्रीय वास्तव कोणी विचारात घेतलं आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुळात सरकारी ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेतील पायाभूत सुविधांचा विचार आणि त्याचा विस्तार यावर कोणतीही गुंतवणूक न करता केवळ “जागतिक” धिंडोरा पिटण्यासाठी अशा योजना केवळ राजकीय मार्केटिंगचा स्टंट ठरण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
'ओपेक'चा निर्णय त्यात मोदी सरकारच्या चुप्पी'मुळे पेट्रोल-डिझेल आणि महागाईचा भडका उडणार
संपूर्ण भारतात पेट्रोल डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला असताना आणि पर्यायाने वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य माणूस आधीच होरपळला असताना, त्यात ‘ओपेक’च्या निर्णयामुळे इंधनदराचा भडका उडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भविष्यात प्रवास खर्च वाढून महागाईत प्रचंड वाढ होऊ शकते.
7 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ: जे फ्रान्सचे माजी अध्यक्ष होलँद बोलले, तोच गौप्यस्फोट राज ठाकरेंनी गुढीपाडव्याला केला होता: सविस्तर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकीय ठोकताळ्याच आणि राजकीय गोटातील व्यक्तिगत संबंध उत्तम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. कारण याच उत्तम संबंधामुळे त्यांना सत्ताधाऱ्यांचे धागेदोरे आणि गुपित कानावर येत असतात. सध्या फ्रान्सचे माजी अध्यक्ष होलँद यांनी राफेल लढाऊ विमानांचा करार आणि त्यात कोणताही पूर्व अनुभव नसलेल्या अनिल अंबानींच्या नवोदित कंपनीचा सहभाग यावर फ्रान्समधील एका मुलाखतीत बोट ठेवलं होतं, त्यानंतर मोदी सरकार पूर्णपणे तोंडघशी पडलं आहे. दरम्यान, त्याच राफेल करारातील घोटाळ्याचे गौडबंगाल आणि अनिल अंबानींच्या कंपनीचा सहभाग, मनसे अध्यक्षांनी आधीच म्हणजे मार्च महिन्यातील गुढीपाडव्याच्या सभेत महाराष्ट्रासमोर गौप्यस्फोट केला होता.
7 वर्षांपूर्वी -
२००९ मध्ये काँग्रेसच्या काळात कामाला सुरुवात झालेल्या सिक्कीमच्या पहिल्या विमानतळाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सकाळीच राज्यातील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं. परंतु, आज मोदींच्या हस्ते उदघाटन झालं असल तरी या विमानतळाचं काम २००९ मध्येच म्हणजे काँग्रेसच्या राजवटीचा सुरु झालं होत. पूर्वनियोजित योजनेनुसार या विमानतळाचं बांधकाम पूर्ण होण्यास तब्बल ९ वर्षांचा कालावधी लागला. सिक्कीममधील पहिलं विमानतळ राजधानी गंगटोकपासून ३३ किलोमीटर अंतरावर आहे. हे विमानतळ तब्बल २०१ एकरवर पसरलेलं आहे. समुद्रसपाटीपासून ४,५०० फूटांवर पाकयोंग गावापासून २ किलोमीटर उंचीवर असलेल्या एका डोंगरावर हे महत्वाकांक्षी विमानतळ उभारण्यात आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
अजून एका गुजराती व्यापाऱ्याचा देशाला ५,००० कोटीचा चुना आणि देशाबाहेर पलायन
हिरा व्यापारी नीरव मोदी, मेहुल चोक्सी, कनिष्क प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मालक भूपेश कुमार जैन आणि आता अजून एक गुजराती व्यापारी देशाला ५ हजार कोटीचा चुना लावून देशाबाहेर पळाला आहे. नितीन संदेसरा असे पळालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून तो नायजेरियात पळाला असल्याची माहिती समोर येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबईत पेट्रोलची नव्वदी पार, महागाईचा भडका अजून वाढणार
पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर आणि त्यामुळे वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य जनता होरपळत आहे. त्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सुद्धा वाढ झाली आहे. पेट्रोल ११ पैशांनी तर डिझेल ५ पैशांनी महागले आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलनं नव्वदी पूर्ण केली आहे. आता मुंबईकरांना प्रति लिटर पेट्रोलसाठी तब्बल ९०.०८ रुपये मोजावे लागणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारने राफेल खरेदीच्या माध्यमातून भारतीय सैन्यावरच सर्जिकल स्ट्राइक केला: राहुल गांधी
लवकरच भारतात सर्जिकल स्ट्राइक दिन साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या मोदी सरकारच्या अडचणी खुद्द फ्रान्समधून आलेल्या प्रतिक्रियेतून वाढल्याचे चित्र आहे. या खरेदी व्यवहारातील करारावर काँग्रेसने आधीच अनिल अंबानींच्या सहभागावर संशय व्यक्त केला होता. त्यावर मोदी सरकारने हात झटकले होते. परंतु भाजपने दिलेल्या प्रतिक्रियेच्या बरोबर विरुद्ध प्रतिक्रिया फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
सावधान! आता सीएनजी तसेच घरगुती वापरातील पीएनजी गॅस सुद्धा महागणार?
आधीच डॉलरच्या तुलनेत घसरत असलेल्या रुपयामुळे इंधनाच्या म्हणजे पेट्रोल-डिझेलच्या किमती प्रचंड वाढून महागाईचा भडका उडाला आहे आणि त्यात सामान्य माणूस पुरता होरपळून निघाला आहे. त्यात आता सीएनजी तसेच घरगुती वापरातील पीएनजी गॅस सुद्धा महागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सामान्यांच्या घरगुती वापरासाठी असलेल्या पीएनजी गॅसची किंमत येत्या ऑक्टोबर महिन्यात ठरविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
राफेल विमान करार: अनिल अंबानींच्या कंपनीचं फ्रान्समधूनच गुपित उघड, मोदी सरकार अडचणीत
फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी राफेल विमान करारासंबंधित धक्कादायक खुलासा केला आहे. त्यात अनिल अंबानींच्या ‘रिलायन्स डिफेन्स’ या कंपनीचं नाव भारत सरकारनेच सुचवलं होत असा खुलासा केल्याने मोदी सरकारला धक्का बसला आहे. या व्यवहारासंबंधित नेमके हेच आरोप काँग्रेसने केले होते.
7 वर्षांपूर्वी -
शेअर बाजार १५०० अंकांनी गडगडला
आज सकाळी शेअर बाजार चांगल्या तेजीत सुरु झाला होता. दरम्यान, सेन्सेक्स अजून वरती जाईल असे प्रथम दर्शनी वाटत असताना दुपारनंतर शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. दुपारी सेन्सेक्समध्ये तब्बल १५०० अंकांनी घसरण झाली तर निफ्टीमध्ये सुद्धा३५० अंकाची घसरण पाहायला मिळाली.
7 वर्षांपूर्वी -
एक दिवसाच्या मोठ्या ब्रेकनंतर पेट्रोल-डिझेल दर पुन्हा वाढले
एक दिवसाच्या मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा पेट्रोल-डिझेल दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. आजच्या नव्या दरांप्रमाणे मुंबईत पेट्रोल ६ पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रति लिटर दर ८९.६० तर डिझेलचा प्रति लिटर दर ७८.४२ झाला आहे. ऐन गणेश उत्सवादरम्यान सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागत आहे.
7 वर्षांपूर्वी