महत्वाच्या बातम्या
-
भाजप-शिवसेना राजवटीत महाराष्ट्राचा औद्योगिक विकासदर घसरला: राज्य सरकारची कबुली
भाजप-शिवसेना राजवटीत महाराष्ट्राचा औद्योगिक विकासदर घटत असून महाराष्ट्राची औद्योगिक क्षेत्रात अधोगती होत असल्याचे आकडेवारीत स्पष्ट होत आहे. या आकडेवारीनुसार २०१४-१५ मध्ये ८ टक्के असलेला औद्योगिक विकासदर २०१७-१८ या आर्थिक वर्षात थेट ६.५ टक्क्यांवर घसरला आहे.
7 वर्षांपूर्वी -
बुलेट ट्रेन विरोधात गुजरातच्या शेतकऱ्यांची उच्च न्यायालयात धाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट मधील महत्वाच्या प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला आता गुजरातमधून तीव्र विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाविरोधात हजारो शेतकऱ्यांनी मंगळवारी गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून बुलेट ट्रेनसाठीच्या भूसंपादनाला तीव्र विरोध असल्याचं म्हटलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
रुपयाची घसरण व पेट्रोल-डिझेलच्या चढ्या किंमतींमुळे शेअर बाजारात एक लाख कोटींची हानी
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची नव्याने झालेली पडझड तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतींचा मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने मोठा धसका घेतल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या एक लाख कोटींचा चुराडा झाल्याचं वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
बडोदा, विजया बँक आणि देना बँक या ३ बँकांचे विलीनीकरण होणार
भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्वाच्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील नामांकित अशा बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक या ३ बँकांचे विलीनीकरण होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीच या संदर्भातील अधिकृत घोषणा केली. एसबीआय’च्या सहयोगी बँकांच्या विलीनीकरणानंतरचे बँकींग क्षेत्रातील हे दुसरे महत्त्वाचे पाऊल समजले जात आहे.
7 वर्षांपूर्वी -
कर्नाटकात पेट्रोल-डिझेल २ रुपयांनी स्वस्त करून काँग्रेसची मोदींना वाढदिवसाची भेट
देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला असून परिणामी महागाईचा भडका उडाला आहे. त्यात वाढत्या महागाईमुळे मोदी सरकार विरोधात जनतेचा रोष वाढत असताना, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने मोदींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी भेट दिली आहे. कर्नाटक सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रत्येकी २ रुपयांची कपात करून सामान्यांना दिलासा दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
सरकारने मला परवानगी दिली तर मी पेट्रोल-डिझेल ३५-४० रुपयांना विकेन
केंद्रातील मोदी सरकारने मला परवानगी दिली तर मी पेट्रोल-डिझल ३५ ते ४० रुपये प्रति लिटर दराने विक्री करु शकतो असं धक्कादायक विधान योग गुरू बाबा रामदेव यांनी केलं आहे. सरकारने जर मला केवळ करामध्ये थोड्याफार प्रमाणात सवलत दिली तर मी ते शक्य करू शकतो, असं रामदेव म्हणाले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
पेट्रोल डिझेलचे दर आणि त्यामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता
मागील अनेक दिवसांपासून वाढणारे इंधनाचे दर आणि त्यामुळे वाढत जाणारी महागाई कमी होण्याची शक्यता नसून ती अधिकच वाढण्याची लक्षण दिसू लागली आहेत. कारण मागील महिन्यापासून जागतिक पातळीवर क्रुड ऑईलचे उत्पादन प्रति दिन १० कोटी बॅरेल इतके विक्रमी झाले होते. मात्र, येणाऱ्या काही दिवसांत जागतिक घडामोडींमुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, त्यामुळे इंधन दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
फरार आरोपींचे भाजपवर एकामागे एक आरोप, अर्थमंत्री अरुण जेटलींना खोटं बोलण्याची सवय: ललित मोदी
काही दिवसांपूर्वी भारतीय बँकांचे ९००० कोटींचं कर्ज बुडवून भारताबाहेर पलायन केलेल्या आणि सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या विजय मल्ल्याने भारत सोडण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन सेटलमेंट करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, अशी धक्कादायक माहिती प्रसार माध्यमांना दिली होती. परंतु, त्यानंतर आता अजून एक भारताबाहेर पलायन केलेला आरोपी ललित मोदीने अर्थमंत्री अरुण जेटलींची तुलना सापाशी करत, त्यांना खोटं बोलण्याची सवय असल्याचा दावा करत विजय मल्ल्याची भेट झाल्याचं खरं असल्याचं म्हटलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
तथ्यहीन आरोप? राहुल गांधी किंगफिशरचे मालक मग बँकांची आणि ईडी'ची कारवाई मल्ल्यावर का?
किंगफिशर कंपनीचा मालक विजय मल्ल्याने भारत सोडण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटलींना भेटल्याचा आणि बँकेच्या कर्जप्रकरणी अरुण जेटलींकडे सेटलमेंटचा प्रस्ताव मांडल्याचा खुलासा केला. त्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आक्रमक झाले आणि त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. अर्थमंत्र्यां अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंना कोर्टाचा दणका, मालमत्तेवर टाच
एनसीपी’चे नेते तसेच विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे भलतेच अडचणीत आले आहेत. बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने धनंजय मुंडेंच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारे धनंजय मुंडे स्वतःच न्यायालयीन कचाट्यात अडकले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
केंद्रीय आरोग्य विभागाकडून तब्बल ३४३ औषधांवर बंदी
केंद्रीय आरोग्य विभागाने एका औषधामध्ये एकापेक्षा अधिक घटक वापरून तयार करण्यात येणाऱ्या तब्बल ३४३ औषधांवर कायमची बंदी घातली आहे. या औषधांना ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ म्हटले जाते आणि ते सामान्यांच्या आरोग्यास हानीकारक असल्याने या औषधांवर आता बंदी घातली गेली आहे.
7 वर्षांपूर्वी -
व्हिडीओ: मल्ल्याचा गौप्यस्फोट, भारत सोडण्याआधी मी अर्थमंत्री अरुण जेटलींची भेट घेतली होती
भारतीय बँकांना करोडो रुपयांचा चुना लावून भारतातून पलायन करणारा आणि सध्या लंडनमध्ये स्थायिक झालेल्या विजय मल्ल्याने धक्कादायक खुलासा केला आहे. मोदी सरकार अडचणीत येणार विधान त्याने केलं असून मल्ल्या लंडनमधील प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाला की, ‘त्याने भारत सोडण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती’.
7 वर्षांपूर्वी -
रघुराम राजन मोदींच्या पीएमओ'बद्दल बोलले की मनमोहन सिंग यांच्या? स्पष्टता टाळली
सध्या आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या बँकांमधील बुडीत कर्जाच्या संबंधित विधानाने काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्याच मूळ कारण म्हणजे रघुराम राजन यांनी निवेदनात म्हटलं आहे की, ‘हाय प्रोफाईल’ कर्जबुडव्यांची यादी पीएमओला दिली होती. मात्र त्या यादीचं पुढे काय झालं, तसेच सरकारनं त्यांच्यावर काय कारवाई केली, याची कोणतीही माहिती माझ्याकडे नाही, असं स्पष्ट केलं आहे. मात्र राजन यांनी निवेदनात पीएमओबद्दल स्पष्ट तसेच सविस्तर भाष्य केलेलं नाही. त्यामुळे ते नक्की मोदींच्या पीएमओबद्दल बोलत आहेत, की मनमोहन सिंग यांच्या पीएमओबद्दल याबद्दल जराही स्पष्टता नसल्याने भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
गुगल पेमेंट सेवांशी संबंधित डेटा भारतात स्टोर करणार, डिसेंबरपर्यंत वेळ मागितला
जागतिक स्तरावरील आणि इंटरनेट क्षेत्रातील महाकाय कंपनी गुगलने त्यांच्या पेमेंट सेवांशी संबंधित डेटा स्थानिक स्तरावर स्टोर करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने घातलेल्या नियमांना सहमती दर्शविली आहे. गुगलला त्यासाठी भारतात सर्व्हर बसवावे लागतील. परंतु, गुगलने त्यासाठी केंद्र सरकारकडून येत्या डिसेंबरपर्यंत वेळ मागितला आहे.
7 वर्षांपूर्वी -
'भारत बंद', महागाईविरोधात उद्या मनसेसुद्धा रस्त्यावर, सामान्यांना सहकार्याचे आवाहन
काँग्रेसने उद्या पुकारलेल्या भारत बंद पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि महागाईविरोधात प्रतिदास मिळतो काय अशी शंका उपस्थित होऊ लागली होती. परंतु त्यात आक्रमक मनसेने सुद्धा उडी घेतल्याने उद्या मोदी सरकारविरोधात सर्व रोष रस्त्यावर पाहायला मिळू शकतो. त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांसोबत मनसे महिला आघाडी सुद्धा सक्रिय पणे रस्त्यावर उतरतील अशी शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
जगातील बलाढ्य उद्योगपती जॅक मा निवृत्त, पण काय संदेश दिला उद्योग जगाला?
चीनमधील जगप्रसिद्ध इ-कॉमर्स कंपनी अलीबाबाचे संस्थापक आणि चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती जॅक मा यांनी काही दिवसांपूर्वीच स्वतःच्या कंपनीतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या धाडसी निर्णयामुळे संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. उद्या म्हणजे सोमवारी १० ऑगस्ट रोजी आणि वयाच्या ५४व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी स्वतःच्या कंपनीतून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला.
7 वर्षांपूर्वी -
महागाईमुळे मखर ते कांदे, सामान्यांसाठी सगळ्याचेच वांदे!
मागील दोन आठवड्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे दार सातत्याने वाढत आहेत. परिणामी वाहतूक खर्च वाढत असल्याने त्याचा थेट फटका भाज्या व इतर जीवनावश्यक वस्तूंना सतत बसत आहे. भाज्यांचे दरा तर गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले आहेत. त्यातच गणेशोत्सव काही दिवसांवर आल्याने गणेश भक्तांना गणेशमूर्तींपासून पूजासाहित्यापर्यंत सर्वच खरेदीसाठी खिसा जाळावा लागत आहे. त्यामुळे गणेश भक्तांच्या घरोघरी पैशाची चणचण जाणवत आहे.
7 वर्षांपूर्वी -
बेरोजगार युवक मोदींच्या २ कोटी रोजगाराची आतुरतेने वाट बघत आहेत : डॉ. मनमोहन सिंग
काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या ‘शेड्स ऑफ ट्रूथ- ए जर्नी डिरेल्ड’ पुस्तकाचे प्रकाशन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते काल करण्यात आले. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या अनेक आश्वासनांचे वाभाडे काढले. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारच्या अनेक फसव्या घोषणांना उजाळा दिला.
7 वर्षांपूर्वी -
अब की बार 'महागाई कंबरडं मोडणार', पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महाग
पेट्रोल डिझेलचे भाव रोज वाढतच असून त्याचा परिणाम थेट महागाई वाढण्यात होत असल्याने, सामान्य लोकं सणासुदीच्या दिवशी पुरते हैराण झाले आहेत. शनिवारी पेट्रोलचा मुंबईतला दर ८७ रूपये ७७ पैसे असा आहे. तर डिझेलचा दर ७६ रूपये ९८ पैसे इतका झाला आहे. दुसरीकडे, राजधानी दिल्लीतला शनिवारचा दर ८० रूपये ३८ पैसे लिटर इतका आहे, तर डिझेलचा दर ७२ रूपये ५१ पैसे इतका झाला आहे. कालच्या तुलनेत आजचा पेट्रोलचा दर ३८ पैशांनी अधिक झाला आहे.
7 वर्षांपूर्वी -
महागाईमुळे गणपतीबाप्पाच्या आगमनाआधी सामान्य हैराण, २०१९ ला बाप्पा मूळ 'केंद्रीय' विघ्नच दूर करो? सामान्यांचा रोष
मागील काही दिवसांपासून पेट्रोल तसेच डिझेलचे दर वेगाने वाढत वाढत असून हे वाढते दर शंभरी गाठेल अशी शंका सामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे महागाईसुद्धा प्रचंड वाढणार असल्याने त्याचा सर्वाधिक फटका हा सामान्यांना तर बसणारच आहे, परंतु लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार असल्याने त्याची झळ थेट सामन्यांना आणि एकूणच बाजापेठेला सुद्धा बसणार आहे.
7 वर्षांपूर्वी