महत्वाच्या बातम्या
-
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर शेअरमध्ये तुफान तेजीनंतर बंपर प्रॉफिट बुकींग, गुंतवणूकदारांनी बक्कळ कमाई केली
Vikas Lifecare share Price | विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफकेअर शेअरची किंमत 3.60 रुपये उच्चांक किमतीवर ट्रेड करत होती. तर आज स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आहे. बुधवारच्या बंदच्या तुलनेत या स्टॉकमध्ये 9 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. विकास लाइफकेअर या स्मॉल कॅप पेनी स्टॉक्स कंपनीच्या स्टॉकमध्ये वाढीचे कारण म्हणजे त्यांना इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड कंपनी एक ऑर्डर प्राप्त झाली आहे. आज शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 4.41 टक्के घसरणीसह 3.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
PNC Infratech Share Price | 320 टक्के परतावा देणारा पीएनसी इन्फ्राटेक शेअर 5 दिवसांपासून तेजीत, फायदा घेणाऱ्यांकडून मोठी खरेदी
PNC Infratech Share Price | पीएनसी इन्फ्राटेक कंपनीचे शेअर्स आज शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी 336.55 रुपये या तीन महिन्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहेत. गुरुवारी इंट्रा-डे ट्रेडमध्ये पीएनसी इन्फ्राटेक कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. स्टॉक वाढीचे मुख्य कारण म्हणजे, पीएनसी इन्फ्राटेक कंपनीने KKR चे रोड हायवे इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्ट पोर्टफोलिओ घेण्याची बोलणी सुरू केली आहे. या प्रोजेक्टचे मूल्य 9,000 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी पीएनसी इन्फ्राटेक कंपनीचे शेअर्स 3.99 टक्के वाढीसह 336.55 रुपये किंमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Aurionpro Solutions Share Price | फक्त 3 वर्षात ओरियनप्रो सोल्युशन्स शेअरने 1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर दिला 17.94 लाख रुपये परतावा
Aurionpro Solutions Share Price | ऑरियनप्रो सोल्युशन्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपली सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. या IT सेवा देणाऱ्या कंपनीने माहिती दिली की, 2005 ते 2023 या काळात कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 26 टक्के CAGR दराने परतावा दिला आहे. 14 जून रोजी कंपनीने माहिती दिली की, 2005 मध्ये कंपनीने 100 दशलक्ष रुपये महसूल वरून 2023 मध्ये 6,590 दशलक्ष रुपये पर्यंत महसूल वाढ नोंदवली आहे. आज शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी ऑरियनप्रो सोल्युशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.73 टक्के वाढीसह 1,008.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | बापरे! आज सोन्याच्या किंमतीने धाकधूक वाढली, आता खरेदी करणेच फायद्याचे, नवे दर पटापट तपासून घ्या
Gold Price Today | विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या सोन्या-चांदीत गेल्या काही दिवसांपासून चढ-उतारांचा काळ सुरू आहे. गेल्या महिन्यात 5 मे रोजी सोने आणि चांदीने विक्रमी उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोनं 61739 रुपये आणि चांदी 77280 रुपये प्रति किलोग्राम वर बंद झाली होती.
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टीटीएमएल शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करतोय, एका महिन्यात 25.65 टक्के परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 78.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 27 मार्च 2020 रोजी टीटीएमएल कंपनीच्या शेअरची किंमत 1.85 रुपये होती. तर अवघ्या दोन वर्षांत हा शेअर 291 रुपये किमतीवर पोहोचला होता. 11 जानेवारी 2022 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.33 टक्के घसरणीसह 77.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Return | पगारदारांनो! ITR भरताना फॉर्म 16 मध्ये काय पाहावे ते लक्षात घ्या, अन्यथा नुकसान निश्चित आहे
Income Tax Return | जर तुम्ही नोकरदार असाल तर तुम्हाला तुमच्या नियोक्त्याकडून दरवर्षी फॉर्म 16 दिला जाईल. पण ते कसे जारी केले जाते आणि त्यात आपल्याला सर्वात जास्त काय पाहण्याची आवश्यकता आहे हे आपल्याला माहित आहे का? फॉर्म 16 हे नियोक्त्याने जारी केलेले वार्षिक प्रमाणपत्र आहे, जे कर्मचाऱ्याच्या वेतनातून कापलेल्या कराची माहिती देते.
2 वर्षांपूर्वी -
Sangam India Share Price | बक्कळ कमाई! संगम इंडिया शेअरने अवघ्या 2 दिवसात 21 टक्के परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा
Sangam India Share Price | संगम इंडिया या कापड क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मागील 2 दिवसात 21 टक्के वाढले आहेत. संगम इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये ही अचानक झालेली वाढ, एका विशेष कारणामुळे पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Lokesh Machines Share Price | लोकेश मशिन्स कंपनीचे शेअर्स सुसाट तेजीत, आज 12 टक्के परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा का?
Lokesh Machines Share Price | शेअर बाजारात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अनेक शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. यापैकीच एक स्टॉक होता, लोकेश मशिन्स कंपनीचा. लहान शस्त्रास्त्रे बनवणाऱ्या लोकेश मशिन्स कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. स्टॉक कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्क्यांच्या वाढीसह 185.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. आज शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 12.45 टक्के वाढीसह 209.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
SJVN Share Price | 39 रुपयाचा सरकारी कंपनी SJVN शेअर तेजीत, सकारात्मक बातमी येताच खरेदीत मोठी वाढ, स्टॉक डिटेल्स पहा
SJVN Share price | SJVN या सरकारी मालकीच्या हायड्रोपॉवर कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. यादरम्यान कंपनीच्या शेअरची किंमत 41 रुपयेवर पोहोचली होती. SJVN कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी एका घोषणेनंतर पाहायला मिळाली होती. आज शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.41 टक्के वाढीसह 39.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कंपनीने जाहीर केल्या माहिती नुसतं त्यांनी 5,000 मेगावॅट नवीकरणीय उर्जेच्या विकास प्रकल्पांसाठी महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी म्हणजेच MAHAGENCO सोबत एक MoU केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअर आयुष्य ब्राईट करतोय, 75% स्वस्त झाल्यानंतर तुफान तेजीत, रोज अप्पर सर्किट, कारण काय?
Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप या डिजिटल मार्केटिंग कंपनीच्या शेअर्समध्ये अद्भूत तेजी पाहायला मिळत आहे. मार्केट रेग्युलेटर सेबीने ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या प्रवर्तकांना 40 लाख रुपयांचा दंड आकारला असूनही या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट तोडत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Stocks | अदानी ग्रुपचे हे 3 शेअर्स हिंडेनबर्ग दणक्यानंतर सावरत आहेत, मात्र स्टॉक खरेदी करावा का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
Adani Group Stocks | हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी ग्रुप स्टॉक्स अक्षरशः क्रॅश झाले होते. मागील 6 महिन्यांत ज्या गुंतवणूकदारांनी अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन, कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांना जबर नुकसान सहन करावा लागत आहे. सध्या देखील या तीन शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे लोक 50 ते 81 टक्के तोट्यात आहेत. मागील 6 महिन्यांत अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 3550.75 रुपयेवरून घसरून 672.25 रुपयेवर आले होते. अदानी ट्रान्समिशन कंपनीचे शेअर्स 2657 रुपयेवरून घसरून 831.30 रुपये किमतीवर आले आहेत. तर अदानी ग्रीन स्टॉक 2024.90 रुपयांवरून 41 टक्क्यांच्या घसरणीसह 983.80 रुपये किमतीवर आले होते.अदानी ग्रुपचे स्टॉक खरेदी करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी तज्ञांचे मत आणि त्याचे मूल्यांकन जाणून घेणे गरजेचे आहे.
2 वर्षांपूर्वी -
Safari Industries Share Price | सफारी इंडस्ट्रीज शेअरचे गुंतणूकदार करोडपती झाले, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर दिला 14 कोटी परतावा, स्टॉक तपशील
Safari Industries Share Price | सफारी इंडस्ट्रीज या ट्रॉली बॅग आणि ट्रॅव्हल बॅग बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही वर्षांपासून कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. सफारी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 2 रुपयेवरून वाढून आता 3000 रुपयेवर पोहचले आहेत. सफारी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी या काळात आपल्या गुंतवणुकदारांना 1,45,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी 3042 रुपये होती. तर सफारी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 879.90 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी सफारी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 2.50 टक्के वाढीसह 3,005.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | या पोस्ट ऑफिस योजनेत 10 वर्षांवरील मुलांच्या नावाने खाते उघडा, मिळवा दरमहा 2500 रुपये व्याज, अधिक जाणून घ्या
Post office Scheme | पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिसच्या जवळच्या शाखेमध्ये उघडता येतात. या अंतर्गत योजनेअंतर्गत किमान गुंतवणूक मर्यादा 1000 रुपये आणि कमाल गुंतवणूक मर्यादा 4.5 लाख रुपये ठरवण्यात आली आहे. सध्या पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत व्याज दर 6.6 टक्के निश्चित करण्यात आला आहे. जर तुमच्या मुलांचे वय 10 वर्षांपेक्षा अधिक असेल, तर तुम्ही MIS योजना खाते उघडून त्यांच्या नावावर गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे असून, मुदतपूर्तीनंतर गुंतवणूक हवी तेव्हा बंद करता येते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी निवडलेले 5 मल्टिबॅगर शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 100 टक्क्याहून अधिक परतावा मिळतोय
Multibagger Stocks | Ddev Plastiks : ही कंपनी व्हाईट गुड्स, AC, डिशवॉशर, ड्रॉइंग कॅबिनेट, फ्रीझर, किचन स्टोव्ह आणि वॉटर हीटर, ऑटोमोटिव्ह आणि इलेक्ट्रिकल उपकरणे उद्योगामध्ये अभियांत्रिकी प्लास्टिक बनवण्याचे काम करते. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 163.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील अडीच महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 108 टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Cressanda Solutions Share Price | क्रेसेंडा सोल्युशन्स स्टॉकने 3 वर्षात दिला 15000% परतावा, 1 लाखाचे झाले दीड कोटी, स्टॉक डिटेल्स
Cressanda Solutions Share Price | क्रेसेंडा सोल्युशन्स या आयटी क्षेत्रातील स्मॉलकॅप कंपनीने राइट इश्यू जारी करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या शेअर धारकांना 6:97 या प्रमाणात राईट इश्यू जारी करेल. क्रेसेंडा सोल्युशन्स ही कंपनी मागील 3 वर्षात गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा देणाऱ्या भारतीय कंपन्यापैकी एक मानली जाते. या कंपनीने राईट इश्यूसाठी प्रति शेअर 20 रुपये इश्यू किंमत निश्चित केली आहे. ही किंमत सध्याच्या बाजार भावापेक्षा 30 टक्क्यांनी कमी आहे. या कंपनीने राईट्स इश्यूसाठी 16 जून 2023 हा दिवसा रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. क्रेसेंडा सोल्युशन्स कंपनीचा राईट इश्यू 27 जून 2023 ते 11 जुलै 2023 दरम्यान खुला केला जाईल. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी क्रेसेंडा सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स 4.20 टक्के वाढीसह 30.52 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
KEC International Share Price | एका सकारात्मक बातमीने केईसी इंटरनॅशनल शेअर तेजीत, शेअरमधील तेजीचा फायदा घेण्यासाठी खरेदी वाढली
KEC International Share | केईसी इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सनी बुधवारच्या इंट्रा-डे सेशनमध्ये 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. या कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 586 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. केईसी इंटरनॅशनल शेअर्समध्ये बुधवारी आलेली तेजी 1,373 कोटी रुपयांची नवीन ऑर्डर्स मिळाल्याने पाहायला मिळाली होती. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.62 टक्के घसरणीसह 551.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Kore Digital Share Price | कोरे डिजिटल IPO शेअरने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना बक्कळ पैसा दिला, डिटेल्स जाणून घ्या
Kore Digital Share Price | कोरे डिजिटल कंपनीच्या शेअर्सनी बुधवारी NSE इमर्ज इंडेक्सवर धमाकेदार एन्ट्री केली आहे. कोरे डिजिटल कंपनीचे शेअर्स इश्यू किमतीच्या 11 टक्के अशिल प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले आहे. कोरे डिजिटल कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 180 रुपये निश्चित करण्यात आली होती. आणि कोरे डिजिटल कंपनीचे शेअर्स 201 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Maharashtra Seamless Share Price | मालामाल शेअर! गुंतवणुकदारांना 13373% परतावा दिला, आता अजून एक फायद्याची बातमी, डिटेल्स पहा
Maharashtra Seamless Share Price | महाराष्ट्र सीमलेस स्टॉक सोमवारच्या इंट्रा-डे ट्रेडमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 495.65 रुपयये या नवीन उच्चांक पातळीवर ट्रेड करत होते. महाराष्ट्र सीमलेस कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी एका निवेदनानंतर पाहायला मिळाली आहे. महाराष्ट्र सीमलेस कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, कंपनीने 234 कोटी रुपये मूल्याचे प्रलंबित कर्जे परतफेड केले असून कंपनी आता पूर्णपणे कर्जमुक्त बनली आहे. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी महाराष्ट्र सीमलेस कंपनीचे शेअर्स 1.14 टक्के घसरणीसह 467.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Total Gas Share Price | स्वस्त झालेल्या अदानी टोटल गॅस शेअरची म्युचुअल फंड कंपन्यांकडून मोठी खरेदी, पुन्हा मल्टिबॅगर होणार?
Adani Total Gas Share Price | अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी टोटल गॅस कंपनीमध्ये म्युच्युअल फंडांनी मोठी गुंतवणूक केली आहे. फक्त मे महिन्यात म्युच्युअल फंडांनी अदानी टोटल गॅस कंपनीचे 3 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. यामुळे मे महिन्यात अदानी टोटल गॅस स्टॉक टॉप 10 लार्जकॅप स्टॉकमध्ये सामील झाला आहे. आयसीआयसीआय डायरेक्ट फर्मच्या अहवालानुसार भारतातील टॉप म्युच्युअल फंडांनी अदानी टोटल गॅस कंपनीमधील शेअर होल्डिंग 10 लाख शेअर्स वरून वाढवून मे महिन्यात 13 लाख शेअर्सवर नेली आहे. शेअर्सच्या किमतीतील घसरणीमुळे म्युचुअल फंडाच्या शेअर्सचे निव्वळ मूल्य एप्रिल 2023 मध्ये 97 कोटी रुपयेवरून मे 2023 मध्ये 89 कोटी रुपयेवर आले होते. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी या अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 2.21 टक्के वाढीसह 668.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Heranba Industries Share Price | हेरंबा इंडस्ट्रीज शेअरबाबत सकारात्मक बातमी आली, गुंतवणुकदारांना फायदा होणार, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Heranba Industries Share Price | हेरंबा इंडस्ट्रीज या कीटकनाशके आणि कृषी रसायन क्षेत्रात उद्योग करणाऱ्या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. हेरंबा इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स बुधवारी 413.95 रुपये किंमतीवर ट्रेड करत होते. गुजरात प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनीच्या वापी स्थित पेंट युनिट्सचे ऑपरेशन्स बंद करण्यासंबंधीचा आदेश मागे घेताच स्टॉक मध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली होती. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी हेरंबा इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.87 टक्के घसरणीसह 394.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी