महत्वाच्या बातम्या
-
Paytm Share Price Today | 67 टक्के स्वस्त झालेला पेटीएम शेअर तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाहीर, कारण काय?
Paytm Share Price | ‘वन 97 कम्युनिकेशन्स’ या ‘पेटीएम’ च्या मुख्य कंपनीने मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर स्टॉक वेगात धावू लागला आहे. आज मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी ‘पेटीएम’ कंपनीचे शेअर्स 0.80 टक्के वाढीसह 729.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शुक्रवारी हा स्टॉक 689 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. प्रत्यक्षात कंपनीने मार्च तिमाहीमध्ये अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. तिमाही आधारावर कंपनीच्या तोट्यात घट झाली असून, कंपनीचा तोटा 390 कोटीवरून 170 कोटींवर आला आहे. कंपनीच्या कर्ज वितरण आणि महसुलात चांगली वाढ पहायला मिळाली आहे. ब्रोकरेज फर्मला विश्वास आहे की, ही कंपनी लवकरच फायद्यात येऊ शकते. ब्रोकरेज हाऊसेस स्टॉकबद्दल सकारात्मक असून त्यांनी स्टॉकमध्ये 31 ते 35 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत, IPO किंमतीच्या तुलनेत स्टॉक 67 टक्के सवलतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Advance Salary Loan | पगारावरील ऍडव्हान्स सॅलरी लोन म्हणजे काय? पर्सनल लोनपेक्षा स्वस्त आणि फायदे पहा
Advance Salary Loan | अनेक बँका आणि वित्तीय संस्था नोकरदार व्यक्तीला त्याच्या पगाराच्या आधारे ऍडव्हान्स कर्ज देतात. हे कर्ज तुमच्या पगाराच्या 3 पट असू शकते. त्याची परतफेड १५ महिन्यांच्या आत करावी लागते. मात्र, व्याजदर खूप जास्त आहे. याला लोन अगेन्स्ट सॅलरी असेही म्हणतात. पगारावर कर्ज घेण्याआधी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात जेणेकरून तुम्ही पुढे कोणत्याही अडचणीत अडकणार नाही.
2 वर्षांपूर्वी -
SBI Quick Call Banking | एसबीआय बँकेच्या शाखेत जाण्याची आता गरज नाही, 'या' सेवा घरबसल्या मिळणार, यादी पहा
SBI Quick Call Banking | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने मोठी माहिती दिली आहे. या बँकेत तुमचंही खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वास्तविक, बँकेने आपल्या कोट्यवधी ग्राहकांच्या सुविधा लक्षात घेऊन काही क्रमांक जारी केले आहेत. या नंबर्सवर कॉल केल्यास तुम्हाला खूप फायदा होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विट करून ही माहिती दिली आहे. बँकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सर्व ग्राहकांनी हे नंबर सुरक्षित करावेत.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Notice | तुम्हाला सुद्धा ITR चुकांमुळे इन्कम टॅक्स नोटीस आल्यास काय करावे? उत्तर कसे द्यावे पहा
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत जवळ येत आहे. हे विवरणपत्र ३१ जुलै २०२२ पर्यंत भरायचे आहे. जर तुम्ही नवीन करदाता असाल तर रिटर्न भरण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे. टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच परतावा दिला जातो. इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर त्याची पडताळणी केली जाते. पडताळणीनंतर तो सादर झाल्यावर आयकर विभाग चौकशी करतो.
2 वर्षांपूर्वी -
My Salary Structure | पगारातील बेसिक, ग्रॉस-नेट सॅलरीतील फरक कोणता? बेसिक पगार कमी-जास्त असण्याचे परिणाम लक्षात घ्या
My Salary Structure | जर तुम्ही नोकरी करत असाल, तर तुम्ही बेसिक सॅलरी, ग्रॉस सॅलरी आणि नेट सॅलरीबद्दल ऐकलं असेल. तुमच्या सॅलरी स्लिपमध्ये बेसिक सॅलरीचाही उल्लेख आहे. पण अनेक वेळा ग्रॉस सॅलरी किंवा नेट सॅलरीबद्दल प्रश्न विचारले जातात तेव्हा लोक त्याबद्दल गोंधळून जातात. मूलभूत, स्थूल आणि निव्वळ पगारात काय फरक आहे आणि मूळ पगार कमी किंवा जास्त असेल तर तुमच्यावर काय परिणाम होतो हे पाहूया.
2 वर्षांपूर्वी -
Salary Vs Saving Account | सॅलरी आणि सेविंग बँक अकाउंटमधील फरक आणि त्यातील नफा नुकसान जाणून घ्या
ज्याच्याकडे नोकरी आहे, त्यांच्याकडे सॅलरी अकाउंट असते. ज्यात त्याचा पगार कंपनीकडून जमा केला जातो. कंपनीच्या सांगण्यावरून हे खाते उघडले जाते. आता सॅलरी अकाउंट आणि सेव्हिंग अकाऊंट वेगळे कसे आणि या दोघांमध्ये काय फरक आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चला जाणून घेऊया पगार खाते आणि बचत खाते यात काय फरक आहे आणि दोन्ही खात्यांचे फायदे काय आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Home Loan Alert | गृहकर्ज घेण्याचा विचारात असला तर सावधान! 'या' 6 कारणांमुळे प्रचंड व्याजदर आकारला जाईल
Home Loan Alert | घर खरेदी करणे हा आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या मोठा निर्णय असतो. अनेकांना स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न असते कारण घर खरेदी करणे हा सर्वात महत्वाचा आर्थिक निर्णय असतो. मात्र, हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी पुरेशा पैशांची गरज आहे. जोपर्यंत आपण रोखीने पैसे देत नाही, तोपर्यंत आपल्याला कर्ज घेणे आवश्यक आहे, म्हणजे व्याजदरांशी व्यवहार करणे.
2 वर्षांपूर्वी -
Varun Beverages Share Price | या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना बोनस शेअर्स वाटप करून श्रीमंत केले, लोकांचे पैसे अनेक पट वाढले
Varun Beverages Share Price | शेअर बाजारातील मोठे गुंतवणुकदार आणि तज्ञ नेहमी दीर्घ कालीन गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. कारण त्यात गुंतवणुकदारांना बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट असे विविध प्रकारचे फायदे मिळत असतात. असाच एक स्टॉक आहे, ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीचा. मागील काही वर्षांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना तीन वेळा मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहेत. या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांनी मजबूत कमाई केली आहे. आज सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के वाढीसह 1,457.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Kilburn Engineering Share Price | 3 वर्षात या शेअरने 740 टक्के परतावा, गुंतवणूकदारांनी कमवला मजबूत परतावा, शेअर डिटेल्स पहा
Kilburn Engineering Share Price | ‘किलबर्न इंजिनिअरिंग लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षात आपल्या शेअर धारकांना 740 टक्के परतावा कमावून दिला आहे. 4 मे 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 13.12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.87 टक्के वाढीसह 108.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी हा स्टॉक 110.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. किलबर्न इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 110.50 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Nexus Select Trust REIT IPO | हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, शेअरची किंमत 95 रुपये, IPO बाबत विशेष बाबी जाणून पैसे लावा
Nexus Select Trust REIT IPO | ‘नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट REIT’ कंपनी 9 मे 2023 रोजी आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे. 11 मे 2023 पर्यंत गुंतवणुकदार या IPO मध्ये पैसे लावू शकतात. नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट ही भारतातील ही पहिली ‘रिटेल अॅसेट ऑफर’ कंपनी आहे. सध्या भारतात तीन सूचीबद्ध REITs असून त्या सर्व कार्यालयीन मालमत्तेशी संबंधित व्यापार करतात. आज या लेखात आपण REIT च्या IPO बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Patel Engineering Share Price | मागील 1 महिन्यात या शेअरने 72% परतावा दिला, किंमत 25 रुपये, दिग्गज खिलाडीने खरेदी केले
Patel Engineering Share Price | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार ‘विजय केडिया’ यांच्या पोर्टफोलिओमधील ‘पटेल इंजिनिअरिंग’ कंपनीचे शेअर्स जबरदस्त वेगात धावत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 8 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. तर शुक्रवारी स्टॉक कमकुवत बाजारात 4 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. विजय केडिया यांनी बाजी लावलेली ‘पटेल इंजिनीअरिंग’ कंपनी एक स्मॉल कॅप कंपनी आहे. आज सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.18 टक्के वाढीसह 25.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा ग्रुपचा IPO ओपन होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, स्टॉक ग्रे मार्केटमध्ये धम्माल होणार
Tata Technologies IPO | तब्बल 18 वर्षांनंतर टाटा समूह आपल्या एका कंपनीचा IPO लाँच करणार आहे. टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा टेक्नोलॉजी’ कंपनीने 9 मार्च 2023 रोजी SEBI कडे DRHP दाखल केला होता. या IPO द्वारे ‘टाटा मोटर्स’ कंपनी ऑफर फॉल सेल अंतर्गत 9.571 कोटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. सध्या ‘टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ कंपनीमध्ये ‘टाटा मोटर्स’ कंपनीने एकूण 74.69 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. याशिवाय टाटा समूहातील अन्य कंपन्या ‘अल्फा टीसी होल्डिंग्ज’, ‘टाटा कॅपिटल ग्रोथ फंड’ यांनी अनुक्रमे 7.26 टक्के आणि 3.63 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Macrotech Developers Share Price | ही कंपनी मोफत बोनस शेअर्स आणि लाभांश वाटप करणार, गुंतवणुकदारांना होणार दुहेरी फायदा
Macrotech Developers Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आली आहे. ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ ही लार्ज कॅप कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. या बोनस इश्यूसाठी कंपनीने रेकॉर्ड तरिखेची घोषणा केली आहे. कंपनीची एक्स बोनस तारीख या महिन्यातच आहे. ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 43,186.64 कोटी रुपये आहे. आज सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.35 टक्के वाढीसह 917.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Manappuram Finance Share Price| मणप्पुरम फायनान्स कंपनीवरील छापे वाईट हेतूने प्रेरित होते? कंपनीच्या सीईओने दिले स्पष्टीकरण, जाणून घ्या तपशील
Manappuram Finance Share Price | ‘मणप्पुरम फायनान्स लिमिटेड’ या केरळ स्थित नॉन बँकिंग फायनान्स कंपनीने असा दावा केला आहे की, ‘अंमलबजावणी संचालनालय’ म्हणजेच ED द्वारे ‘मणप्पुरम ऍग्रो फार्म्स’ या बंद झालेल्या कंपनीवर टाकण्यात आलेले छापे दुर्भावनापूर्ण आहेत. ईडीने नुकताच ‘मणप्पुरम फायनान्स लिमिटेड’ कंपनीची 143 कोटी रुपये मूल्याच्या मालमत्तेवर जप्ती आणली आहे. आज सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.69 टक्के वाढीसह 109.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
MRF Share Price | 1 लाख रुपये किंमत स्पर्श करणारा MRF भारतातील पहिला स्टॉक ठरणार? शेअरची कामगिरी आणि परतावा जाणून घ्या
MRF Share Price | ‘एमआरएफ लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स भारतीय शेअर बाजारात सर्वात महाग शेअर मानले जातात. मात्र तरीही या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीचा एक शेअर खरेदी करण्यासाठी तुम्हाला जवळपास एक लाख रुपये खर्च करावे लागतील. आज सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी एमआरएफ कंपनीचे शेअर्स 0.88 टक्के घसरणीसह 97,750.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | अशी SIP करा म्हणजे 4 वर्षांनंतर 15 लाख रुपयांची कार खरेदी करू शकाल, संपूर्ण गणित पहा
SIP Calculator | कोणतेही आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्मार्ट गुंतवणूक धोरण खूप महत्वाचे आहे. ध्येय दीर्घ काळासाठी असू शकते आणि अल्पकालीन देखील असू शकते. जर तुम्ही १५ लाख रुपयांच्या बजेटमध्ये पुढील चार वर्षांत कार खरेदीकरण्याचे उद्दिष्ट ठेवले असेल तर ते कसे शक्य होईल याचे नियोजन तुम्ही करू शकता. तुम्हाला हवं असेल तर म्युच्युअल फंडात एसआयपीच्या माध्यमातून दरमहिन्याला ठराविक रक्कम गुंतवून तुम्ही हे उद्दिष्ट गाठू शकता. त्यासाठी आतापासून दरमहिन्याला किती एसआयपी करावी लागेल, हे समजून घेतले तर चार वर्षांनी तुमचे काम पूर्ण होईल.
2 वर्षांपूर्वी -
Employees Income Tax Deduction | नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, स्टँडर्ड डिडक्शनचा मोठा लाभ मिळणार, CBDT चं उत्तर आलं
Employees Income Tax Deduction | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात नवीन कर प्रणाली चा अवलंब करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ देण्याविषयी सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या की, आता 15.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांना टॅक्सवर एकूण 52,500 रुपये (स्टँडर्ड डिडक्शन 50,000 रुपये) लाभ मिळणार आहे. १५.५ लाखरुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना स्टँडर्ड डिडक्शन मिळणार नाही, या सीतारामन यांच्या वक्तव्यावरून संभ्रम निर्माण झाला होता. आता केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) यावर स्पष्टीकरण दिले आहे. सीबीडीटीने म्हटले आहे की, स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ अशा सर्व कर्मचाऱ्यांना मिळेल ज्यांनी नवीन कर प्रणाली स्वीकारली आहे, त्यांचे उत्पन्न कितीही असो.
2 वर्षांपूर्वी -
My Gratuity Money | तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युटीचे पैसे कंपनी कसे मोजते? किती मोठी रक्कम मिळेल लक्षात ठेवा
My Gratuity Money | जर तुम्ही एखाद्या कंपनीत सुमारे 5 वर्षे (4 वर्ष 240 दिवस) काम करत असाल तर तुम्ही ग्रॅच्युइटीसाठी पात्र आहात. याशिवाय कोळसा किंवा इतर खाणींमध्ये किंवा भूमिगत प्रकल्पात काम केल्यास ४ वर्षे १९० दिवस पूर्ण झाल्यानंतरच ५ वर्षांचा कार्यकाळ ग्राह्य धरला जातो. कायद्यानुसार जमिनीखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ४ वर्ष १९० दिवसांच्या आत ग्रॅच्युइटी मिळते. कंपनीप्रती निष्ठा दाखविल्याबद्दलचा पुरस्कार म्हणून याकडे पाहिले जाऊ शकते. पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी अॅक्ट १९७२ अंतर्गत ग्रॅच्युईटीची तरतूद करण्यात आली आहे. ग्रॅच्युइटीचा एक छोटासा भागही कर्मचाऱ्याच्या पगारातून कापला जातो आणि फॉर्म्युला आधीच ठरलेला असतो.
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank Salary Account | नोकरदारांनो! स्टेट बँकेत सॅलरी अकाउंट असण्याचे तुम्हाला 'हे' 10 मोठे फायदे मिळतील
SBI Salary Account | जर तुम्ही पगारदार वर्गातून आला असाल तर तुम्हाला पगार खात्याबद्दल नक्कीच माहिती असेल. तुमचा मालक कोणत्याही बँकेत तुमचे पगार खाते उघडतो. त्यानंतर तुम्हाला दर महिन्याला त्याच खात्यात पगार मिळतो. पगार खाते उघडणाऱ्यांना विविध बँका विविध प्रकारचे फायदे देतात. याचे कारण म्हणजे पगार खाते उघडल्यानंतर खातेदार बँकेच्या सर्व सुविधांचा लाभ घेतो आणि कर्ज, क्रेडिट कार्ड सारख्या उत्पादनांचाही वापर करतो. जर तुमचे पगार खाते देशातील सर्वात मोठ्या बँकेत म्हणजेच स्टेट बँकेत असेल तर तुम्हाला अनेक खास सुविधा मिळतात.
2 वर्षांपूर्वी -
Rane Engine Valve Share Price | एका आठवड्या गुंतवणूकदारांना 43 टक्के परतावा दिला, हा शेअर तुफान तेजीत वाढतोय
Rane Engine Valve Share Price | मागील पाच दिवसात ‘राणे इंजिन व्हॉल्व्ह’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 36.48 टक्के वाढले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 314.70 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. आज सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.35 टक्के घसरणीसह 299.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी