महत्वाच्या बातम्या
-
Shubham Polyspin Share Price | गुंतवणुकदारांना 1300 टक्के परतावा देणारा शेअर 95 टक्क्याने स्वस्त झालाय, खरेदी करावा का?
Shubham Polyspin Share Price | एकेकाळी आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून देणाऱ्या ‘शुभम पॉलिस्पिन’ कंपनीचे शेअर्स आता कमालीची घसरले आहेत. ‘शुभम पॉलिस्पिन’ या वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 95 टक्के कमजोर झाले आहेत. ‘शुभम पॉलिस्पिन’ कंपनीचे शेअर्स 286 रुपये किमतीवरून 16 रुपयांच्या जवळ आले आहेत. आज सोमवार दिनांक 27 मार्च 2023 रोजी ‘शुभम पॉलिस्पिन’ कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के घसरणीसह 15.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘शुभम पॉलिस्पिन’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 286.43 रुपये होती. तर हा स्टॉक आज आपल्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. (Shubham Polyspin Limited)
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank Share Price | एसबीआयच्या शेअर्समध्ये तेजी येणार? स्टॉक 180 रुपयांवरून 500 रुपयांवर गेला, पुढे काय होणार?
SBI Bank Share Price | ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ म्हणजेच भारतातील सर्वात मोठ्या सरकारी मालकीच्या SBI बँकेच्या शेअर्सनी मागील तीन वर्षांत कमालीचा परतावा दिला आहे. अमेरिकेतील बँकिंग संकटामुळे बँकिंग क्षेत्रावर नकारात्मक दबाव निर्माण झाला आहे. मागील तीन वर्षांत SBI बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 180 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. मार्च 2020 मध्ये, SBI बँकेचे शेअर 180 रुपयांवर ट्रेड करत होते. मात्र आता या शेअरने 500 रुपये किंमत पार केली आहे. सोमवार दिनांक 27 मार्च 2023 रोजी SBI बँकेचे शेअर्स 0.72 टक्के वाढीसह 509.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. SBI बँकेचा स्टॉक सध्या 629.55 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या 23 टक्के खाली आहे. (State Bank of India Limited)
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | तयारी करा! टाटा ग्रुपच्या कंपनीचा IPO लाँच होतोय, खरेदीपूर्वी हा तपशील मदत करेल
Tata Technologies IPO | काही आठवड्यांपूर्वी ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या IPO बद्दल बऱ्याच चर्चा होत होत्या. आता त्यावर एक नवीन अपडेट आली आहे. B & K सिक्युरिटर्टीज फर्मने ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या IPO बाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालमध्ये ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीची तुलना तिच्या स्पर्धक KPIT Technologies, Tata Elxsi, L & T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस, यांच्याशी करण्यात आली आहे. B & K सिक्युरिटीज फर्मने ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीची तुलना स्पर्धक कंपनीसोबत महसूल वाढ, अनुलंब एक्सपोजर, प्रादेशिक एक्सपोजर, हेडकाउंट वाढ, यांसारख्या पॅरामीटर्सवर केली आहे. (Tata Technologies Limited)
2 वर्षांपूर्वी -
EPFO Money in Adani Group | पगारदारांसाठी अलर्ट! तुमचा ईपीएफचा पैसा अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये गुंतवला जातोय, शेअर्समध्ये घसरण
EPFO Money in Adani Group | देशातील सर्व प्रायव्हेट कंपनीत नोकरी करणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण अदानी समूहाच्या शेअर्समध्ये नुकतीच घसरण होऊनही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) गुंतवणूक सुरूच ठेवली आहे. सुमारे २७७.३ दशलक्ष भारतीयांच्या बचतीचे व्यवस्थापन करणारी ही सरकारी संस्था अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्स या अदानी समूहाच्या दोन शेअर्समध्ये प्रचंड गुंतवणूक करून नोकरांचा पैसा ओतत आहे. विशेष म्हणजे याचा नोकरदारांना काहीच फायदा होणार नसून त्याचा फायदा होईल तो अडाणी ग्रुपला. या गुंतवणुकीमुळे अदानी ग्रुपच्या बाजार भांडवलात वाढ होईल आणि त्याचा उपयोग ते अजून कर्ज उभारणीसाठी करतील असं म्हटलं जातंय. EPFO केंद्राच्या अखत्यारीत येतं असल्याने यामागे देखील मोदी सरकारच असणार याची चर्चा जोर धरू लागली आहे. यावरून राहुल गांधी सामान्य लोकांना जागृत करत आहेत हे देखील स्पष्ट होतंय. त्यासाठीच त्याचा आवाज संसदेपासून बंद केला जातोय हे देखील अधोरेखित होतंय.
2 वर्षांपूर्वी -
Aadhaar-Ration Card Linking | आधार-रेशन कार्ड लिंक करण्याची तारीख वाढवली, या तारखेपूर्वी लिंक करा
Aadhaar-Ration Card Linking | केंद्र सरकारने रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे. आता कार्डधारकांना 30 जून 2023 पर्यंत रेशन कार्ड आधारशी लिंक करता येणार आहे. नुकतीच अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने एका अधिसूचनेद्वारे यासंदर्भात माहिती दिली. यापूर्वी रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 होती. त्यात बदल करून ३० जून करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्स तेजीत येणार? तज्ञांनी जाहीर केली नवीन टेटार्गेट प्राईस, डिटेल्स जाणून घ्या
Tata Steel Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा उद्योग समूहाचा भाग असेलल्या ‘टाटा स्टील’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची घसरण पाहायला मिळाली होती. आज मात्र शेअरमध्ये किंचित सुधारणा पाहायला मिळत आहे. सोमवार दिनांक 27 मार्च 2023 रोजी ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 0.83 टक्के वाढीसह 102.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. IIFL सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी पुढील आठवड्यासाठी ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Tata Steel Limited)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील कोसळलेले नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज किंमतीत मोठी घसरण झाली आहे. आज सोनं स्वस्त झालं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोने आणि चांदी या दोन्हीच्या दरात घसरण झाली आहे. आज सोन्याचा भाव 59,010 रुपयांच्या पातळीवर स्थिरावला आहे. (What is the price of 22 Carat Gold in Mumbai Today?)
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजना, तुम्हाला दर महिन्याला 9 हजार रुपये मिळतील, खर्चाची चिंता मिटेल
Post Office Scheme | जवळजवळ प्रत्येकजण स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबाच्या चांगल्या आणि सुरक्षित भविष्यासाठी उत्तम परतावा देणारी गुंतवणूक शोधत असतो. ज्याच्या मदतीने ते भविष्यातील आव्हानांना सामोरे जाऊ शकतात. जर तुम्हीही अशाच प्लॅनच्या शोधात असाल तर आजची बातमी तुम्हाला खूप उपयोगी पडू शकते. आज आम्ही तुम्हाला एका अतिशय उत्तम पोस्ट ऑफिस योजनेची माहिती देत आहोत. ज्यामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित तसेच चांगला परतावा मिळतो. आम्ही तुमच्याशी पोस्ट ऑफिसच्या प्लॅनबद्दल बोलत आहोत. याचे नाव पोस्ट ऑफिस मंथली इनकम प्लॅन आहे, तर चला जाणून घेऊया त्याबद्दलसर्व तपशील.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुपचे बाजार भांडवल घटले, शेअर्सची घसरगुंडी काही थांबेना, आतापर्यंत अदानी शेअर्स किती पडले?
Adani Group Shares | हिंडेनबर्ग फर्मचा अहवाल प्रसिद्ध झाल्याच्या दोन महिन्यांनंतर गौतम अदानी यांच्या उद्योग समूहाच्या शेअर्समध्ये किंचित रिकव्हरी आली होती. मात्र स्टॉकमध्ये आज जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. अदानी ग्रुपचे स्टॉक अजूनही अस्थिर असून आज सर्व शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. मागील दोन महिन्यात अदानी ग्रुपमधील कंपन्याचे शेअर्स निम्म्यावर आले आहेत. अदानी ग्रुप स्टॉकमध्ये सध्या गुंतवणूक करणे खूप धोक्याचे आहे, कारण सेबीने अदानी ग्रुपला अजून क्लीन चिट दिलेली नाही.
2 वर्षांपूर्वी -
Innovana Thinklabs Share Price | जबरदस्त IT कंपनी शेअर! गुंतवणूकदारांना 562% परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स देणार, रेकॉर्ड डेट?
Innovana Thinklabs Share Price | ‘इनोवाना थिंकलॅब’ ही आयटी उद्योगांशी संबंधित स्मॉल कॅप कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. ‘इनोवाना थिंकलॅब’ कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनी एकूण 1,02,50,000 इक्विटी शेअर जारी करणार आहे. ‘इनोवाना थिंकलॅब’ कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी 30 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘इनोवाना थिंकलॅब’ कंपनीच्या संचालक मंडळाने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले फुल्ली पेड शेअर्स बोनस म्हणून वाटप करण्याचे निश्चित केले आहे. आज सोमवार दिनांक 27 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के घसरणीसह 625 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Innovana Thinklabs Limited)
2 वर्षांपूर्वी -
Trident Share Price | उज्वल भविष्य आणि स्ट्रॉंग फंडामेंटल्स असलेला स्वस्त ट्रायडेंट शेअर अजून स्वस्त झाला, संयम आयुष्य बदलेल
Trident Share Price | आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक मजबूत दिसत आहेत. सेन्सेक्स जवळपास 200 अंकांनी वधारला आहे, तर निफ्टी जवळपास 17000 वर पोहोचला आहे. अमेरिकी फेडच्या अधिकाऱ्यांनी गुंतवणूकदारांना सांगितले आहे की, बँकिंग प्रणालीतील तरलतेबद्दल चिंता करण्याची गरज नाही. ज्यामुळे सेंटिमेंटमध्ये काहीशी सुधारणा झाली आहे. शुक्रवारी अमेरिकी बाजार तेजीसह बंद झाले. मात्र, आज आशियाई बाजारांमध्ये संमिश्र कल दिसून येत आहे. सध्या सेन्सेक्स 186 अंकांनी वधारून 57714 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टी 60 अंकांच्या वाढीसह 17005 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आजच्या व्यवहारात संमिश्र कल दिसून येत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Trident Share Price | Trident Stock Price | BSE 521064 | NSE TRIDENT)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | रिलायन्स कपिटलच्या गुंतवणूकदारांना आणखी एक धक्का, शेअरची घसरगुंडी सुरू, डिटेल्स जाणून घ्या
Reliance Capital Share Price | कर्जबाजारी उद्योगपती ‘अनिल अंबानी’ यांच्या ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनीच्या विक्री प्रक्रियेला उशीर होण्याचे संकेत मिळत आहेत. खरं तर ‘टोरेंट इन्व्हेस्टमेंट्स’ कंपनीने ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनीच्या कर्जदात्याना कळवले आहे की, ते लिलावाच्या दुसऱ्या फेरीत भाग घेण्यास तयार नाहीत. या बातमीमुले ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनीच्या शेअर मध्ये कमालीची पडझड पाहायला मिळत आहे. आज सोमवार दिनांक 27 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.06 टक्के घसरणीसह 8.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Reliance Capital Limited)
2 वर्षांपूर्वी -
Raj Rayon Industries Share Price | या पेनी स्टॉकची कमाल आणि गुंतवणूकदार मालामाल, 1 वर्षात 3891 टक्के परतावा, डिटेल्स पहा
Raj Rayon Industries Share Price | सध्या शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र असे काही शेअर्स आहेत, जे तुम्हाला अल्पावधीत करोडपती बनवू शकतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉक बद्दल माहिती देणार आहोत. या स्टॉकचे नाव आहे, ‘राज रेयॉन इंडस्ट्रीज’. या मल्टीबॅगर स्टॉकने अवघ्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 3,891.18 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात हा मल्टीबॅगर स्टॉक 1.65 रुपये किमतीवरून 67.85 रुपयेवर आला आहे. मागील दोन वर्षांत हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 0.20 पैसेवरून वाढून 67.85 रुपयेवर आला आहे. या काळात गुंतवणूकदारांनी 3,45,000 टक्के परतावा कमावला आहे. (Raj Rayon Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Hindenburg Report Effect | अदानी ग्रुपने आणखी एक कंपनी विकत घेण्यापासून माघार घेतली, आता या कंपन्यांमध्ये स्पर्धा
Hindenburg Report Effect | अदानी समूहाने दुसरी कंपनी विकत घेण्यास माघार घेतली आहे. अदानी समूह आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) यांनी एसकेएस पॉवर जनरेशन (छत्तीसगड) साठी सुधारित निविदा सादर केल्या नाहीत. ६०० मेगावॅट क्षमतेच्या औष्णिक वीज प्रकल्पासाठी आता केवळ ५ कंपन्या शर्यतीत आहेत. या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी ही माहिती दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
EPF Interest Money | पगारदारांसाठी महत्वाची बातमी, तुमच्या EPF व्याजदराबाबत निर्णय, कमी झाला की वाढला?
EPF Interest Money | ईपीएफओ च्या सदस्यांसाठी एक मोठी बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाची २७ आणि २८ मार्च रोजी बैठक होत आहे. २३३ व्या केंद्रीय मंडळाच्या बैठकीकडे ग्राहकांचे लक्ष राहणार आहे. या बैठकीत ईपीएफओ सदस्यांना किती व्याज दिले जाईल यावरही निर्णय घेतला जाऊ शकतो. 232 वी बैठक 31 ऑक्टोबर 2022 रोजी पार पडली.
2 वर्षांपूर्वी -
1 April Rules Change | 1 एप्रिलपासून बदलणार हे चार नियम, 31 मार्चपूर्वी पूर्ण करा अन्यथा नुकसान होईल
1 April Rules Change | 1 एप्रिल 2023 पासून गुंतवणूकदारांसाठी 3 नवे नियम लागू होत आहेत. 31 मार्चपूर्वी तुमच्या डिमॅट अकाउंट आणि म्युच्युअल फंड अकाऊंटमध्ये अपडेट न केल्यास मोठं नुकसान होऊ शकतं. त्याचबरोबर गेल्या एप्रिलमध्ये एक नियमही बदलत आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणते नियम बदलणार आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Return | ऑनलाईन ITR भरताना 'या' चुका टाळा, अन्यथा मोठी समस्या निर्माण होऊ शकते
Income Tax Return | इन्कम टॅक्स रिटर्न या फॉर्मचा वापर निव्वळ कर दायित्व जाहीर करण्यासाठी, कर वजावटीचा दावा करण्यासाठी आणि एकूण करपात्र उत्पन्नाची माहिती देण्यासाठी केला जातो. उत्पन्न भरणे ही एक महत्वाची प्रक्रिया आहे आणि चुका टाळण्यासाठी करदात्यांनी अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. अनेकदा असे दिसून आले आहे की, काल संध्याकाळी जेव्हा जेव्हा करदाते ते भरतात तेव्हा तपशीलांमध्ये चुका दिसून येतात. यामुळे विवरणपत्र मिळण्यास उशीर होतो आणि करदात्यांना सुधारित आयटीआर देखील भरावा लागू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Vs Bank FD | गुंतवणुकीवर चांगला परतावा म्युच्युअल फंड देईल की बँक FD? फायद्या कुठे पहा
Mutual Fund Vs Bank FD | देशांतर्गत कंपन्यांच्या शेअर्समध्ये ३५ टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूक न करणाऱ्या डेट म्युच्युअल फंडांना यापुढे दीर्घकालीन भांडवली नफ्याचा (एलटीसीए) लाभ मिळणार नाही. लोकसभेने मंजूर केलेल्या २०२३ च्या वित्त विधेयकातील दुरुस्तीनुसार १ एप्रिलपासून ३५ टक्क्यांपेक्षा कमी गुंतवणूक असलेल्या डेट म्युच्युअल फंडांवर आयकर स्लॅब रेटनुसार कर आकारला जाईल. पुढील महिन्यापासून हा निधी बँक डिपॉझिट म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. कंपन्यांच्या इक्विटी शेअर्समध्ये ३५ टक्क्यांपेक्षा कमी गुंतवणूक करणाऱ्या डेट म्युच्युअल फंडांनाही शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मानले जाईल. किंबहुना आता अशा फंडातून मिळणारे उत्पन्न टॅक्सच्या कक्षेत येणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Interest Extra Benefits | एसबीआय बँकेच्या FD वर 40 हजारांचा अधिक लाभ मिळणार, पूर्ण रक्कम किती पहा
SBI Interest Extra Benefits | एसबीआयमध्ये खाते असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत तुमचेही खाते असेल तर एसबीआय ग्राहकांना आता थेट 40,088 रुपयांचा फायदा मिळत आहे, परंतु हा लाभ तुम्ही 31 मार्चपर्यंतच घेऊ शकता.
2 वर्षांपूर्वी -
Ration Card 2023 | राशन कार्डधारकांसाठी खुशखबर! सरकारच्या या निर्णयाने शिधापत्रिकाधारकांना अधिक मोफत रेशन मिळेल
Ration Card Updates | रेशन कार्डबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामुळे तुम्हा सर्व शिधापत्रिकाधारकांना आनंद होणार आहे. आता केंद्र सरकारने पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी शिधापत्रिकाधारकांसाठी मोठी घोषणा केली आहे. आता पुन्हा शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशन वाटप करण्यात येणार आहे. ज्याचा फायदा देशभरातील 80 कोटी लोकांना होणार आहे. प्रति व्यक्ति 5 किलो रेशन मोफत दिलं जाणार आहे. सामान्य जनतेसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. यासंबंधीची सर्व माहिती या माध्यमातून सविस्तर वाचा.
2 वर्षांपूर्वी