महत्वाच्या बातम्या
-
फडणवीस रडारवर? | कॅगने ठपका ठेवलेल्या जलयुक्त शिवार योजनेची ACB मार्फत चौकशीची शिफारस
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील महत्वकांक्षी अशा जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची ACB मार्फत सखोल चौकशी केली जावी, अशी शिफारस करण्यात आल्याचे वृत्त आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांणा उधान आलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही बातमी काहीसी धक्कादायक असण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनो! फलोत्पादन योजना अंतर्गत अनुदान योजना सन 2020-21 | असा ऑनलाईन अर्ज करा
फलोत्पादन योजना अंतर्गत सन 2020-21 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. भरपूर दिवसापासून वाट बघत असलेली फलोत्पादन योजना चालू झाली आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घ्यावा.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ | स्थानिक माध्यमांच्या आणि राजकीय टीकेनंतर अदानी समूहाची माघार
मागील दोन दिवसांपासून समाज माध्यमांवरील आणि स्थानिक माध्यमांच्या टीकेनंतर मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाच्या मुख्य कार्यालयावरून अदानी समूहाला खुलासा करणं भाग पडलं आहे. माध्यमांमध्ये वृत्त पसरल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटण्यास सुरुवात झाली होती.
4 वर्षांपूर्वी -
तरुणांनो, सरकारच्या मध केंद्र योजनेचा फायदा घेण्यासाठी मंडळाकडे अर्ज कसा कराल? - वाचा माहिती
मध केंद्र योजना करिता अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळच्या वतीने करण्यात आले आहे. शेती करत असतांना केवळ शेतीच्या भरवशावर अवलंबून राहिलात तर शेतीमध्ये नुकसान होण्याची शक्यात असते त्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय केला तर नक्कीच शेती फायद्याची होऊ शकते. शेतकरी बंधुंनो शेतीपूरक व्यवसाय म्हटले कि लगेच आपल्या डोळ्यासमोर दुग्धव्यवसाय किंवा कुक्कुटपालन योजना विषयी चित्र निर्माण होते. मित्रांनो दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन किंवा शेळीपालन हे व्यवसाय फायद्याचे असले तरी देखील इतरजन करतात म्हणून आपणही तोच व्यवसाय करावा हि काही मोठी बाब नाही.
4 वर्षांपूर्वी -
उद्योजक व्हायचंय? | तब्बल 40% मार्जिन देणाऱ्या Generic Aadhaar'ची फ्रेंचायजी कशी घ्याल? - वाचा सविस्तर
मागील काही वर्षांपासून Generic औषधांना प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच सामान्य जनतेचा कलही Generic औषधे घेण्यामागे वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. सामान्य औषधांच्या क्षेत्रात आताच्या घडीला मोठी स्पर्धा नसल्याचे दिसून येत आहे. यातच आता Generic Aadhaar या कंपनीची फ्रेंचायजी सुरु करून चांगले पैसे कमावता येऊ शकतात. मेडिकल चालवणाऱ्या व्यवसायिकांनाही Generic Aadhaar ची फ्रेंचायजी सुरु करता येते. विशेष म्हणजे अन्य औषध कंपन्यांच्या फ्रेंचायजीसमध्ये तुम्हाला १५ ते २० टक्के मार्जिन मिळते.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईचे अहमदाबाद करण्याचे काम सुरू आहे | त्यापेक्षा अहमदाबादला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या - विनायक राऊत
मुंबई विमानतळाच्या मुख्यालयाच्या वादावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. मुंबईचे अहमदाबाद करण्याचे हे काम सुरू आहे. मुंबई विमानतळाचे महत्व कमी करून अहमदाबादचे महत्व वाढवण्याचे हे काम आहे. त्यापेक्षा अहमदाबादला स्वतंत्र स्टेट्सचा दर्जा देऊन त्याचं महत्व वाढावा. आयजीच्या जिवावर बायजीचा उद्धार आणि सासूच्या जीवावर जावई सुभेदार अशी वागणूक केंद्र सरकारच्या माध्यमातून केली जातेय. शिवसेना हे सहन करणार नाही.
4 वर्षांपूर्वी -
इंधनाचे दर, महागाई, बेरोजगारीवर भाष्य न करणारे पंतप्रधान म्हणाले, केंद्र सरकारच्या कामाबद्दल लोकांना सांगा
संसदेच्या पावसाळी अधिवेशनचा आज दुसरा दिवस आहे. हेरगिरी प्रकरणातील विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभा 2 वाजेपर्यंत तर राज्यसभेचा कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाची बैठक झाली.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईचं गुजरातीकरण? | अदानी एअर पोर्ट होल्डिंगचं मुख्यालय मुंबईत नव्हे तर अहमदाबादमध्ये असेल
गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाने मुंबई विमानतळाचा कारभार हातात घेतला आहे. गौतम अदानी यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. मुंबई विमानतळाची शान आणखी वाढवणे हे आमचे आश्वासन आहे आणि ते आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करु, असे अदानी यांनी ट्विटमध्ये म्हटले. या माध्यमातून देशभरात मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा दावाही गौतम अदानी यांनी केला आहे. त्यामुळे भविष्यात का बदल होतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
नवीन उद्योजकांसाठी मोफत MSME उद्यम ऑनलाईन नोंदणी अशी कराल - वाचा सविस्तर
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग(एमएसएमई) मंत्रालयाने यापूर्वीच 26 जून 2020 च्या अधिसूचनेद्वारे जाहीर केल्यानुसार 1 जुलै 2020 पासून उद्योगांचे वर्गीकरण आणि नोंदणी यासाठी नवी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत एखादा उद्योग उद्यम म्हणून ओळखला जाईल आणि त्याच्या नोंदणी प्रक्रियेला उद्यम रजिस्ट्रेशन म्हटले जाते.
4 वर्षांपूर्वी -
न्यूज पोर्टल 'न्यूज क्लिक'ला परदेशातून 30 हजार कोटीचं फंडिंग | संबित पात्रांचा हास्यास्पद आरोप
न्यूज पोर्टल ‘न्यूज क्लिक’वर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी जोरदार निशाना साधला आहे. त्यांनी या पोर्टलवर परदेशातून निधी घेऊन देशाची बदनामी करण्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, देशात जेंव्हा काही चांगले घडते तेंव्हा यांच्याकडून हे कार्यक्रम खराब करण्याचा प्रयत्न केला जातो.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | मोदी सरकारमधील मंत्री, न्यायाधीश आणि पत्रकारांचे फोन टॅप | भाजपा खासदाराच्या दाव्याने खळबळ
देशातील मोदी सरकारमधील काही मंत्री, RSS, न्यायाधीश आणि काही पत्रकारांचे फोन टॅप केले जात असल्याचा धक्कादायक दावा भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केल्याने खळबळ माजली आहे. सुब्रमण्यम यांच्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | मुंबई विमानतळ गुजरातने टेकओव्हर केल्याने एरपोर्टवर आनंदोत्सव | हर्ष गोएंका यांचं धक्कादायक ट्विट
गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाने मुंबई विमानतळाचा कारभार हातात घेतला आहे. गौतम अदानी यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. मुंबई विमानतळाची शान आणखी वाढवणे हे आमचे आश्वासन आहे आणि ते आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करु, असे अदानी यांनी ट्विटमध्ये म्हटले. या माध्यमातून देशभरात मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा दावाही गौतम अदानी यांनी केला आहे. त्यामुळे भविष्यात का बदल होतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
गडकरींच्या राज्यात चाललंय काय? | धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पूल खचला, २ वर्षांतच महामार्गाची दुर्दशा
बहुचर्चित राष्ट्रीय महामार्गाचे अवघ्या काही महिन्यांतच पितळ उघडे पडले आहे. पहिल्याच अल्पशा पावसाने पूल खचणे, रस्त्यावर पाणी साचून अपघातास निमंत्रण देणे, कठडे वाहून जाणे, खचून जाणे, रस्त्यालगत असलेले संरक्षक बेल्ट मुळासह वाहून जाणे आदी प्रकार बघावयास मिळाल्याने वाहनचालकांना या महामार्गावरून सांभाळून वाहने चालवावी लागत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
TCS, Infosys And Wipro | कोरोनाकाळात विक्रमी नफा | मोठ्या नोकरभरतीचे संकेत
कोरोना साथीच्या काळात देशात नोकरीची त्सुनामी येणार आहे. देशातील तीन मोठ्या आयटी कंपन्यांनी त्यांचा पहिला तिमाहीचा (एप्रिल-जून) कॉर्पोरेट निकाल जाहीर केला आहे. टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो यांना 17,446 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. अशा परिस्थितीत या कंपन्यांनी मार्च 2021 ते एप्रिल 2022 या चालू आर्थिक वर्षात 1 लाख 5 हजार फ्रेशर्सना नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची सायकल रॅली | राज्यपालांकडे विविध मागण्याचे निवेदन दिले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात इंधन दरवाढीविरोधात मुंबईत सायकल रॅली काढण्यात आली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाई जगताप आणि आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईतील हँगिंग गार्डन ते राजभवनापर्यंत सायकल चालवत राज्यपालांना निवेदन देण्यासाठी काँग्रेस नेते सायकलवरून राजभवनात गेले होते. यावेळी काँग्रेसतर्फे राज्यपालांना इंधन दरवाढीविरोधात निवेदन देण्यात आलं.
4 वर्षांपूर्वी -
कंपनीत कर्मचारी आहात? | EPF कापला जातो, मग बँक डिटेल्स अशी ऑनलाईन अपडेट करा - स्टेप्स वाचा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आपल्या खातेधारकांना घरी बसून बँक डिटेल्स अपडेट करण्याची सुविधा देत आहे. त्यामुळे तुम्ही पीएफ अकाउंटसह आपले बँक अकाउंट सहजरित्या अपडेट करू शकता. बँक अकाउंटची माहिती अपडेट केली नाही, तर तुम्ही आपल्या पीएफ अकाउंटतून पैसे काढू शकणार नाही.
4 वर्षांपूर्वी -
महत्वाचं | SBI बँकेत खात असेल तर मिळतील 2 लाख रुपये फक्त या शेतकऱ्यांसाठी - वाचा आणि फायदा घ्या
तुमच्याकडे SBI चं हे खातं असेल तर मिळेल 2 लाखापर्यंतचा लाभ योजना काय आहे आणि कसा मिळणार लाभ याची सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्ही जर एसबीआयचे (SBI) चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्राच्या एका महत्त्वाच्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ बँक ग्राहकांना मिळवता येतो.
4 वर्षांपूर्वी -
मोदी है तो मुमकिन है | मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह ४ विमानतळांचं नियंत्रण अदानी समूहाकडे
गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाने अखेर मुंबई विमानतळाचा कारभार हातात घेतला आहे. गौतम अदानी यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. मुंबई विमानतळाची शान आणखी वाढवणे हे आमचे आश्वासन आहे आणि ते आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करु, असे अदानी यांनी ट्विटमध्ये म्हटले. या माध्यमातून देशभरात मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा दावाही गौतम अदानी यांनी केला आहे. त्यामुळे भविष्यात का बदल होतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी है तो मुमकिन है | आज मध्यरात्रीपासून CNG, घरगुती पाईपलाईन गॅसच्या दरात मोठी वाढ जाहीर
देशभरात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये विक्रमी वाढ झाल्याने सर्व सामान्य माणूस पोळलेला असताना आता सीएनजी आणि घरगुती पाईपलाईन गॅसच्या दरात देखील मोठी वाढ होणार आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
नोकरी बदलली किंवा सोडल्यानंतर PF Account ट्रान्सफर न केल्यास काय होतं? - वाचा अन्यथा
PF हा प्रत्येक नोकरदार व्यक्तीसाठी रिटायरमेंट फंड असतो त्याच्यामध्ये निवृत्तीनंतर आर्थिक पुंजीची ठेव असते. आता नोकरदार व्यक्तींसाठी पीएफ अकाऊंटसमध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. तुमच्या पीएफ अकाऊंट्सचा पूर्णपणे फायदा मिळवता यावा यासाठी काही गोष्टी कटाक्षाने पाळणं गरजेचे आहे. तुम्ही निवृत्त होत असाल किंवा नोकरी बदलत असाल तर विशेष दक्ष राहणं गरजेचे आहे नोकरी बदलताना अनेक नोकरदार एक चूक करतात ती म्हणजे नोकरी बदलताना अकाऊंट ट्रान्सफर न करणं. मग पहा तुम्ही 58 वर्षांपूर्वी निवृत्ती घेण्याचा किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुमच्या पीएफ अकाऊंट सोबत काय होतं?
4 वर्षांपूर्वी